आजचं मार्केट – ०७ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०७ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६८.१० प्रती बॅरल ते US $ ६८.७२ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७० ते US $१= ७१.८२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६५ तर VIX १४.६१ होते.

काल इराण, इराक यांचा संताप कमी झाल्यावर तणाव कमी करण्याच्या दृष्टीने विचार झाला. सौदी अरेबिया एक डेलिगेशन घेऊन USA ला जाईल. आणि या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करील. ही बातमी आल्याबरोबर रुपया सुधारला, क्रूडचाही दर कमी झाला.

ITI चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

HDFC बँकेने जी आकडेवारी जाहीर केली त्याप्रमाणे CASA RATIO , लोन ग्रोथ, डिपॉझिट ग्रोथ चांगली दिसते. त्यामुळे आज या बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

ब्राझीलमध्ये एथनॉल ब्लेंडींगचे प्रमाण वाढवले. ब्राझीलमधून जी RAW साखर निर्यात होती तिच्यात घट होण्याची शक्यता आहे.RAW साखरेच्या किमती वाढत आहेत. मावाना, त्रिवेणी, KCP, उगार, दालमिया भारत, द्वारिकेश शुगर ,बलरामपूर चिनी, EID पॅरी, अप्पर गँजेस, इंडिया ग्लायकॉल, प्राज इंडस्ट्रीज,अवध, उत्तम, या साखर उत्पादक कंपन्या किंवा साखर उद्योगाशी निगडीत कंपन्या यांच्या शेअर मध्ये तेजी होती.

जिओ पोलिटिकल ताणतणावामुळे BTST किंवा STBT करणे योग्य ठरणार नाही. जागतिक परिस्थीतीत काही अचानक उलथापालथ झाली तर त्याचा मार्केटवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. डे ट्रेड करा किंवा पोझिशनल ट्रेड करा. शेअर्सची संख्या आणि पर्यायाने ट्रेड ची रक्कम मर्यादित ठेवा.

गोदरेज कन्झ्युमरने सांगितले की त्यांनी जी नवी प्रॉडक्टस लाँच केले होते त्यांचे रिझल्ट चांगले आहेत.

ASTAR DM या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बाय बॅक वर विचार करण्यासाठी बैठक आहे.
सरकारने असे स्पष्ट केले आहे की BPCL मधेही स्टेकच्या विक्रीमध्ये भाग घेण्यासाठी PSU ( IOC,HPCL, ONGC) यांना बोलीमध्ये मंत्रिमंडळाची परवानगी लागेल.

आज HCC ला दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून Rs ४८९ कोटींची ऑर्डर मिळाली. यात HCC चा वाटा Rs ३६७ कोटींचा आहे.

कॅन्सरवरच्या औषधांच्या किमती सरकार नियंत्रित करणार आहे त्यामुळे बायोकॉनचा शेअर पडला

वित्तीय वर्ष २०२१ मध्ये सरकार एल आय सी चा IPO आणण्याचा विचार करत आहे.

स्क्रॅप आयात थांबवण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी २.५% वरून ७.५% करण्याचा सरकार विचार करत आहे. याचा फायदा अल्युमिनियम उद्योगाला होईल.

अडानी पोर्टने जाहीर केले की FY २० मधील ९ महिन्यात कार्गो व्हॉल्यूममध्ये ८% ग्रोथ झाली.

दोनीमलाई खाणीच्या लिलावावर सरकारने स्टे आणला. त्यामुळे आता NMDC ला मुदतवाढ नक्की मिळेल. या खाणीत आता NMDC ने काम सुरु केले आहे.

ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंटने कॅम्लिन फाईन मध्ये १.५% स्टेक खरेदी केला.

आज एअर इंडियाच्या डायव्हेस्टमेन्ट वर विचार करण्यासाठी GOM ची अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत EOI ( एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) चा ड्राफ्ट मंजूर केला.

वित्तीय वर्ष २०२० साठी GDP चे अनुमान ५% केले आहे.

तिसरी तिमाही डिसेंबर ३१ २०१९ ला संपली. विविध कंपन्या त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
काही महत्वाच्या निकालांच्या तारखा पुढील प्रमाणे – १० जानेवारी २०२० इन्फोसिस, १४ जानेवारी २०२० विप्रो, इंडसइंड बँक, १७ जानेवारी २०२० HCL टेक, १८ जानेवारी २०२० HDFC बँक, २२ जानेवारी २०२० एक्सिस बँक २५ जानेवारी २०२० ICICI बँक, ३० जानेवारी २०२० बजाज ऑटो, कोलगेट, डाबर १३ फेब्रुवारी नेस्ले .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०८६९ NSE निर्देशांक निफ्टी १२०५२ बँक निफ्टी ३१३९९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.