आजचं मार्केट – ०८ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०८ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६८. ५९ प्रती बॅरल ते US $ ६९. २४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.८४ ते US $१=Rs ७२.०६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२० होता. तर VIX १५. ३० होता.

EIN -AL -ASAD हा बगदादमध्ये USA चा मिलिटरी बेस आहे. यावर इराणने जवळजवळ डझनभर मिसाईल्स डागली. हम भी कुछ काम नही हे दाखवण्याचा उद्देश होता. इराणमध्ये न्यूक्लिअर प्लांट जवळ ४.९ शक्तीचा भूकंप झाला. या हल्ल्यामध्ये किती अमेरिकन मारले गेले यावर पुढे काय होईल हे अवलंबून राहील. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सने आपली इराणला जाणारी उड्डाणे स्थगित ठेवली. शेजारच्या घरी भांडण होते त्याचा परिणाम आपल्यालाही सोसावा लागतो. FAA (फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन) नी इराण इराक ओमान खाडीच्या वरून जाण्यासाठी बंदी केली.

सिप्लाच्या पाताळगंगा प्लांटसाठी रेझोल्यूशन प्लानला USFDA ने मंजुरी दिली. USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या होत्या.
गायत्री प्रोजेक्टने सांगितले की आर्बिट्रेशनमधून मिळालेल्या Rs ९०० कोटींचा उपयोग कर्जफेडीसाठी करण्यात येईल.
सरकार नीलांचल इस्पात मधील आपला १००% स्टेक विकणार आहे . या कंपनीमध्ये MMTC चा ४९.०८ % तर NMDC चा १०. ०% स्टेक आहे.

सरकारने कोल मायनिंगमध्ये कमर्शियल कोल मायनिंग सुरु केले. आतापर्यंत काही विशिष्ट क्षेत्रातील कंपन्यांसाठी ओपन असलेले क्षेत्र खाण उद्योगातील इतर कंपन्यांसाठीही ओपन केले. यामुळे कोल इंडियाची मक्तेदारी संपली असे वाटल्यामुळे कोल इंडियाचा शेअर पडला.

SEZ आनि SEZ मध्ये बिझिनेस करणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणाऱ्या कर सवलतीत मुदतवाढ दिली जाईल. तसेच टॅक्स हॉलिडे, आणि इतर सवलती दिल्या जातील.

भारती एअरटेल Rs ४५२ प्रती शेअर या भावाने Rs १५००० कोटींचा QIP आणणार आहे. ICICI बँक, GIC, तमासेक, प्रुडेन्शियल या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले.

VGF ( व्हायाबिलिटी गॅप फंडिंग) स्कीमची मर्यादा वाढवून PPP योजनेखाली शाळा कॉलेजीस हॉस्पिटल्स सुरु करता येतील. खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सबसिडी दिली जाईल.

LT फूड्स ही कंपनी ‘कारी कारी’ या नावाने स्नॅकचा ब्रँड लाँच करेल. कंपनीने ‘दावत कामेडा’ या नावाने JV बनवले. यासाठी सोनेपतमध्ये प्लांट सुरु केला .

SBI ने सांगितले की ऑइल गॅस सोलार आणि रोड सेक्टरमध्ये क्रेडिटसाठी मागणी वाढेल. तिसऱ्या तिमाहीमध्ये क्रेडिट ग्रोथ चांगली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सद्य परिस्थितीशी तुलना करता GDP ग्रोथ रेटचे अनुमान थोडे कमी वाटते.
गायत्री प्रोजेक्ट्स Rs ८३ कोटी, HCC ने Rs २७७ कोटींचा सुझलॉनने Rs ७२५६ कोटींचा आणि JAYPEE इंफ्राने Rs ६७२१ कोटींचा लोन डिफाल्ट केला.

आज केमिकल क्षेत्रातील हिमाद्री, थिरुमलाई केमिकल्स, नोसिल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. सिमेंटचे भाव वाढवल्यामुळे सिमेंट उत्पादक कंपन्यांमध्ये तेजी होती. IT, फार्मा सेक्टरमध्ये तेजी होती. मिडकॅप आनि स्माल कॅपमध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०८१७ NSE निर्देशांक निफ्टी १२०२५ बँक निफ्टी ३१३७३ वर बंद झाले भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ०८ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.