आजचं मार्केट – ०९ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०९ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६५.४२ प्रती बॅरल ते US $ ६५.९३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३९ ते US $ १=Rs ७१.४३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४८ तर VIX १४.२० होते.

आज मार्केटमध्ये उत्सवाचे वातावरण होते. कारण इराण आणि USA ची कुस्ती निकाली सुटली. युद्धाचे ढग सध्यातरी गेले. त्याबरोबर क्रूडच्या दरामध्ये नरमी आली. सोन्याच्या किमतीमधील वाढ कमी झाली. आता सर्वांचे लक्ष पुन्हा बजेटवर असेल. इराण आणि USA या दोघांनीही सांगितले की आम्हाला युद्ध नको, शांती हवी आहे असे सांगत तलवारी म्यान केल्या.

भारताने इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड व्हिएतनाम येथून येणाऱ्या तांब्याच्या तारा, रॉड यावर ५ वर्षांसाठी ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावली.

स्टेटबँक ऑफ इंडिया आता बँक गॅरंटी आणि कर्जसुद्धा देईल ( होम बायर फायनान्स स्कीम) त्यामुळे घर मिळणार नाही पैसे अडकून पडतील, EMI भरत रहायचा घर मात्र मिळत नाही अशी अवस्था होणार नाही. सनटेक रिऍलिटीने प्रथमच या योजनेखाली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून असे लोन घेतले. सरकारनं शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स यांना PPP योजनेअंतर्गत परवानगी दिली. त्यामुळे आज NIIT टेक, अपटेक, करिअर पाईंट, SHALBY हॉस्पिटल्स, इंद्रप्रस्थ मेडिकल, नारायण हृदयालय, अपोलो हॉस्पिटल्स या शेअर्स मध्ये तेजी होती.

इनहेलरच्या किमती वाढवायला परवानगी दिल्यामुळे ग्लेनमार्क फार्मा, आणि सिप्ला यांना फायदा होईल.

गुजरात मधील अलेम्बिक फार्माच्या काराखाडी प्लाण्टला USFDA ने क्लीन चिट दिली.

बजेट अधिवेशन ३१ जानेवारीला सुरु होऊन ११ फेब्रुवारीला समाप्त होईल.

स्टील उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी ५ ते ६ राज्यांमध्ये सरकार इंटिग्रेटेड स्टील हब सुरु करणार आहे.

मास्टेकने मजेस्को (USA) मधेही स्टेक US $ १५.९ लाखाला विकला.

सरकारने रिफाईंड पाम ऑइलला रिस्ट्रिक्टेड कॅटेगरी मध्ये टाकले. याचा फायदा रुची सोयाला होईल.

टेलिकॉम कंपन्यांनी AGR संबंधात याचिकेची सुनावणी ओपन कोर्टात करावी असा केलेला अर्ज सुप्रीमकोर्टाने फेटाळला. पण सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिकेवर विचार करू असे सांगितले.

MTNL ची बिल्डिंग, टॉवर, फायबर ऍसेट्स आदी मालमता विकण्यासाठी शेअर होल्डर्सनी मंजुरी दिली.

इसरो गगनयान साठी टिटॅनियम अलॉय हे स्पेशल स्टील मिश्र धातू निगमने पुरवले.

देशामध्ये ऑफिस स्पेसची विक्री वाढत आहे.लिजिंग व्हॉल्युम चांगले आहेत. त्यामुळे कमर्शियल बांधकाम जे करतात त्यांना चांगले दिवस आहेत.

Rs २१० प्रती शेअर या ASTAR DM Rs २१० प्रती शेअर या भावाने Rs १२० कोटींचा शेअर बायबॅक करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१४५२ NSE निर्देशांक निफ्टी १२२५२ बँक निफ्टी ३२०९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.