आजचं मार्केट – १० जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६५.१४ प्रती बॅरल ते US $ ६५.३३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८८ ते US $१=Rs ७१.२१ या दरम्यान होते. US $ इंडेक्स ९७.४० तर VIX १३ होते.

पुढील आठवड्यात १५ जानेवारी २०२० रोजी USA आणि चीनमध्ये यांच्यातील ट्रेड अग्रीमेंटवर दोन्ही देश सह्या करतील.
इराण आणि USA यांच्यातील ताणतणाव कमी होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे धातूसंबंधीत शेअर्समध्ये तेजी आली. वेदांता, हिंदाल्को, नाल्को, टाटा स्टील, हिंदुस्थान झिंक, JSPL, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

मिडकॅप निर्देशांकातले व्हॉल्युम २ वर्षांनंतर प्रथमच वरच्या स्तरावर होते. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ सुधारेल अशी आशा आहे.

माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी प्रथमच सामान्य नागरिकांकडून अंदाजपत्रकासाठी प्रस्ताव मागवले आहेत. पंतप्रधान स्वतः या लोकांचे प्रस्ताव समजून घेत आहेत. अर्थात जर हे प्रस्ताव अंदाजपत्रकासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वात बसत असतील तरच ते स्वीकारले जातील. सरकारने अंदाजपत्रक आकर्षक ,५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी योग्य आणि ग्रोथला पोषक असे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या मंदीला आळा घालून ग्रोथ रेट वाढवण्यावर भर द्यावा लागेल. फिस्कल डेफिसिटला घाबरून चालणार नाही.

रेंटल हौसिंगसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतील त्यासाठी पुरेश्या कर्जासाठी, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा देण्यासाठी, आयकरात सवलत देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद अपेक्षित आहे.जर रेंटल हाऊसिंग प्रोजेक्ट असेल तर लॉँगटर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलत असेल. याचा परिणाम हाऊसिंग क्षेत्र,सिमेंट,पेंट,प्लायवूड, टाईल्स, पाईप्स या क्षेत्रातील कंपन्यांवर होईल. अजमेरा रिअल्टी, बॉम्बे डाईंग, गोदरेज प्रॉपर्टीज, ओबेराय रिअल्टीज, पूर्वानकारा DLF ओरिएन्ट बेल, नीटको, मुर्डेश्वर सिरॅमिक्स यांना होईल.

आता निर्देशांकातील शेअर्सकडे लक्ष देण्याऐवजी स्मॉल कॅप, मिडकॅप शेअर्सकडे लक्ष ठेवणे योग्य ठरेल. पण सावधगिरी बाळगा. हा संगीतखुर्चीचा खेळ आहे. एंट्री आणि एक्झिट पटापट करणे जमत असेल त्यांनी या वाटेने जावे. मिडकॅप आणि स्माल कॅप शेअर्स आता ६०% ते ७०% कमी भावाला उपलब्ध आहेत. त्यामुळे शेअरचे नाव दूरदर्शन वाहिनीवर, वर्तमान पत्रात घेतले गेले की शेअर्सच्या किमतीत १०% ते २०% वाढ होते. पण लक्षात ठेवा हा पूर आहे.जेवढ्या वेगाने पुराचे पाणी गावाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते तेवढ्याच वेगात ओसरते. नंतर उरतो तो चिखल आणि सोसावी लागते रोगराई ! याचे भान ठेवा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे मिडकॅप, स्माल कॅप शेअर्स असतील तर वाढलेल्या किमतीला विक्री करून सुटका करून घ्या. हे सर्व शेअर्स २०%, १०% सर्किटवाले असतात. लागोपाठ ३ ते ४ हायर सर्किट लागतात आणि नंतर तेवढीच लोअर सर्किट लागतात. जर तुम्ही योग्य वेळेला एक्झिट घेऊ शकला नाहीत तर मार्केट कमाल स्तरावर असताना महागाईचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत राहतात. यात फसण्याची शक्यता जास्त असते.

आज IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. उत्पन्न Rs २३०९२ कोटी, प्रॉफिट Rs ४४५७ कोटी, मार्जिन २१.९०% राहिले. कंपनीने मार्जिन गायडन्स २१% ते २३% दिला. ऍट्रिशन रेट २१.७% वरून कमी होऊन १९.६ झाला. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ९.५% राहिली. कंपनीने कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथसाठी गायडन्स १०% ते १०.५ % दिला. व्हिसलब्लोअरने केलेल्या तक्रारीबाबत नेमलेल्या ऑडिट कमिटीने तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले.
SEZ योजना आकर्षक बनवण्यासाठी बैठक झाली. बैठकीत बाबा कल्याणी समितीच्या शिफारसींवर विचार झाला.
JLR ची विक्री चीनमध्ये २६.३% वाढली तर यूरोपमध्ये कमी झाली. एकंदर विक्री ९.३% ने वाढली. या विक्रीच्या आकड्यांमुळे टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी आली.

GTPL हाथवे, इमामी पेपर, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

डेल्टा कॉर्पला नेपाळच्या मॅरियट हॉटेलमध्ये कॅसिनो चालवण्यासाठी लायसेन्स मिळाले.

१४ जानेवारीला बंधन बँक, इंडसइंड बँक माइंडट्री याकंपन्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
नोव्हेंबर २०१९ साठी IIP १.८% होते.

PMO ने कोळशावरील कार्बन टॅक्सवर US $ ६ प्रती टन सूट देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला आहे. अर्थमंत्रालय यावर विचार करत आहे.

ऑटो सेक्टरमधील साठलेल्या इन्व्हेंटरीजचा प्रश्न सुटल्यामुळे ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी आपण उत्पादन वाढवू असे सांगितले आहे. पर्यायाने ऑटो अँसिलिअरीजची डीमां वाढेल. त्यामुळे ऑटो अँसिलिअरीज उत्पादन करणाऱ्या कम्पन्यांच्या शेअर्समध्ये तेजी अपेक्षित आहे .

सुप्रीम कोर्टाने टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या केसमध्ये NCLAT ने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली.

टेलिकॉम कंपन्यांना 5G ट्रायलसाठी अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१५९९ NSE निर्देशांक निफ्टी १२२५६ बँक निफ्टी ३२०९७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.