आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

आज US $ ६४.३० प्रती बॅरल ते US $ ६४.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८६ ते US $१=Rs ७०.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३४ होता तर VIX १३.९१ होते.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड डील फेज १ वर आज सह्या होतील. ह्या अग्रीमेंटचा सध्या लावलेल्या टॅरिफवर परिणाम होणार नाही असे USA ने जाहीर केले.

लेमन ट्री हॉटेल्सने ऋषिकेश येथे ६५ रूमचे हॉटेल सुरु केले.

भारती एअरटेलच्या QIP इशूची किंमत Rs ४४५ प्रती शेअर निश्चित केली आहे. या इशूद्वारे कंपनीने Rs १४४०० कोटी उभारले.

येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ७ फेब्रुवारी २०२० रोजी ऑथोराइझ्ड कॅपिटलमध्ये वाढ करण्यासाठी बोलावली आहे. येस बँकेने रोसा पॉवरचे तारण म्हणून ठेवलेले २७.९७ % शेअर्स विकले. येस बँक F & O बॅनमधून बाहेर आली.

ऑइल PSU कडून सरकारने Rs १९००० कोटी लाभांशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. यात IOC ने मात्र आमचे प्रॉफिट कमी झाले आहे तर गेलने आपल्याला विस्तार करण्यासाठी पैश्याची जरुरी असल्यामुळे अधिक कर्ज काढावे लागेल असे सांगितले.

‘क्रेडिट सुईस’ चा रिपोर्ट आला. त्यांनी गॅस शेअर्सवर भर दिला. त्यामुळे गॅस वितरक आणि गॅस उत्पादक (गेल आणि पेट्रोनेट LNG) करणाऱ्याकंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. याचा फायदा गुजरात गॅस, महानगर गॅस, इंद्रप्रस्थ गॅस, अडानी गॅस या कंपन्यांना होईल.

PNGRB ने सांगितले की तुम्ही सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनसाठी बीड करत असाल तर LNG साठीही बीड करावे लागेल गॅस सगळ्यांना पुरवायचा असेल तर पाइप्सची मागणी वाढेल. याचा फायदा जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस पाईप्स, मान इंडस्ट्रीज, वेलस्पन कॉर्प या पाईप पुरवणाऱ्या कंपन्यांना होईल. निती आयोगाने सांगितले की नैसर्गिक गॅस साठवता येत नाही. नैसर्गिक वायूचा पुरवठा भरपूर आहे त्यामुळे किंमत वाढत नाही पण मागणी भरपूर आहे. गॅसबेस्ड खतांच्या प्लान्टकडून नैसर्गिक गॅसला भरपूर मागणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गॅसच्या किमती कमी होत आहेत.
इंडसइंड बँकेने कर्ज दिलेली एक हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि एक ट्रॅव्हल कंपनी यांच्यात फ्रॉड झाला असे जाहीर केले.

सुंदरम फायनान्स इक्विफॅक्स मधील पूर्ण स्टेक Rs ६७.४३ प्रती शेअर या दराने विकेल.

L & T इन्फोटेक या कंपनीचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ऍव्हेन्यू सुपरमार्केट पुढल्या महिन्यात Rs ६२०० कोटींचा QIP आणणार आहे. हा QIP प्रमोटर्सचा स्टेक ७५% पेक्षा कमी करण्यासाठी आणण्यात येत आहे

इंडिया बुल्स व्हेंचरचा टेंडर ऑफर पद्धतीने शेअर बाय बॅक सुरु झाला.

NBFC चा लिक्विडीटीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत्या अंदाजपत्रकात SPV ( स्पेशल पर्पज व्हेईकल) च्या धर्तीवर एंटीटी स्थापन करेल. यामध्ये आपल्याकडील SUUTI मधील Rs ३३००० कोटी व्हॅल्यूच्या शेअर्सची गुंतवणूक करेल. ही SPV आपल्या गुंतवणुकीच्या तिप्पट कर्ज उभारेल. म्हणजे Rs १००००० कोटी सिस्टिममध्ये आणले जातील. यातून NBFC ना लोन दिले जाईल. कोणत्या NBFC ना कर्ज द्यायचे हे RBI ठरवेल.

आजपासून सोन्याचे १४ कॅरेट, १८ कॅरेट, २२ कॅरेट या तीन प्रकारात हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आपल्याकडील सोन्याच्या स्टॉकचे हॉलमार्किंग करण्यासाठी ज्युवेलर्सना एक वर्षांची मुदत दिली आहे.सरकार ८९२ ASSAYING आणि हॉल मार्किंग केंद्र सुरु करतील.

CSB बँकेला नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी मिळाली.

कॅनरा बँकेने जाहीर केले की आता कॅनरा बँक त्यांच्या ‘कॅन फिन होम्स’ या सब्सिडीयरीतील स्टेक विकणार नाही.
BSE आता ब्रेन्ट क्रूड ऑइल मध्ये F & O कॉन्ट्रॅक्ट लाँच करणार आहे.

दोन तीन दिवस CDSL चा शेअर वाढत आहे. येणाऱ्या २० IPO मुळे डिमॅट अकौन्ट वाढतील आणि CDSL चे उत्पन्न वाढेल.

आज निफ्टी १२३४३ वर ड्रॅगनफ्लाय डोजी हा कँडलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला. हा POTENTIAL REVERSAL दर्शवतो म्हणजेच आधी तेजी असेल तर मंदी आणि आधी मंदी असेल तर तेजी होते. हाय, ओपन आणि क्लोज प्राईस साधारणतः सारखी असते. लॉन्ग लोअर शॅडो असते.आज असेच घडले. हाय पाईंटला मार्केट उघडले नंतर जवळ जवळ ३०० पाईंट्स मार्केट पडले. पण बुल रन असल्यामुळे साईडलाईनला असलेल्या बायर्सनी खरेदी केली आणि दिवस अखेर पुन्हा मार्केट पूर्ववत झाले. उद्याच्या (गुरुवारच्या) कॅण्डलवरून ट्रेण्ड रिव्हर्सल होणार कां याचे कन्फर्मेशन मिळेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१८७२ NSE निर्देशांक निफ्टी १२३४३ बँक निफ्टी ३१८२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

 1. Dhananjay

  I have bought sbi shares last weak. Recently I got to know about sbi card ipo. After sbi card listed on nse can I get its shares.

  Reply
  1. surendraphatak

   तुम्हाला sbi कार्ड चे share फ्री मिळणार नाहीत ipo चा फॉर्म भरावाच लागेल फक्त sbi चे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्याच्यासाठी वेगळे फॉर्म आहेत

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.