आजचं मार्केट – १६ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६४.१८ प्रति बॅरल ते US $ ६४.५२ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.७७ ते US $१= ७०.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२० होता आणि VIX १३.२० होते.

चीन आणि USA यांच्यात ऐतिहासिक ट्रेड अग्रीमेंट झाले. चीन आयात वस्तूंबरोबर त्यांच्या तंत्रज्ञानासाठी अमेरिकन कंपन्यांवर दबाव आणणार नाही. USA चीनकडून जास्त शेतमाल आयात करेल. पूर्वी USA ज्या पद्धतीने टॅरीफ लावत असे ,त्या पद्धतीने चीन आपल्या युआन या त्यांच्या चलनात बदल करत असे त्यामुळे टॅरीफ लावण्याचा उद्देश साध्य होत नव्हता पण आता या करारानुसार चीन चलनाच्या विनिमय दरात कृत्रिमरित्या बदल करणार नाही.

सरकार BEML मधील प्रथम २८% स्टेक विकणार होते पण आता पूर्ण स्टेक विकण्याचा विचार करत आहे.परिणामी ओपन ऑफर आणावी लागेल. सरकारची ५४% हिस्सेदारी आहे.

सरकार ITDC मध्ये सुद्धा डायव्हेस्टमेन्ट करणार आहे. NBCC प्रगती मैदानात मोठे हॉटेल बांधणार आहे. हे हॉटेल ITDC ला चालवायला दिले जाईल.

सरकारी कंपन्यांकडे लक्ष द्या. BEML ही संरक्षण क्षेत्रातील कंपनी असल्याने या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडे लक्ष द्या. उदा BEL, अँड्रयू यूल, ITI, भारत डायनामिक्स, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, STC, SCI, काँकॉर, तसेच सरकारी कंपन्यांकडे सरकारने Rs १९००० कोटी लाभांशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे वरील कंपन्यांबरोबर SJVN, NHPC, EIL, NMDC या कंपन्यांकडेही लक्ष ठेवावे.

येत्या अंदाजपत्रकात ‘स्वच्छ भारत’ योजनेवर भर असेल.सॉलिड WASTE आणि लिक्विड WASTE यासंबंधात सरकार योजना बनवत आहे. नद्यांमधील गाळ काढणे इत्यादी, त्यामुळे वॉटर ट्रीटमेंट करणाऱ्या, कचरा रिसायकल व्यवस्थापन करणाऱ्या, सिविल इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. यात ION एक्स्चेंज, सिमेन्स, ABB, VHA टेक वा बाग , ड्रेजिंग कॉर्पोरेशन, व्होल्टास यांचा समावेश असेल.

अंदाजपत्रकात LTCG, DDT या करांमध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे.

येस बँकेने सिकल लॉजिस्टिक या कंपनीमधील तारण म्हणून ठेवलेले ६० लाख शेअर्स (१०.५%) ACQUIRE केले.
NINL ( नीलांचल इस्पात निगम) मधील आपला १००% स्टेक विकण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या सल्लागारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया वेगात सुरु केली. २४ जानेवारी २०२० रोजी १ वाजेपर्यंत बीड स्वीकारण्यात येतील. आणि या बीड दुपारी ३ वाजेपर्यंत उघडण्यात येतील.

GMR इन्फ्रा आपला एअरपोर्ट बिझिनेसमधील ४९% स्टेक विकणार आहे. टाटा कॉन्सॉरशियम आणि सिंगापूर कॉन्सोर्शियम हा स्टेक विकत घेणार आहेत.

गोव्यामधील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामावरील स्टे सुप्रीम कोटाने उठवला. काही जादा अटींवर बांधकाम सुरु ठेवण्यास परवानगी दिली. याचा फायदा GMR इन्फ्रा आनि डेल्टा कॉर्प यांना होईल.

ग्रॅन्युअल्स कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बाय बॅक ऑफ शेअर्सवर विचार करण्यासाठी २१ जानेवारी २०२० रोजी बैठक बोलावली आहे.

अंदाजपत्रकाच्या आधी सरकार स्क्रॅपेज पॉलिसी अमलात आणण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस ट्रेडिंग हब बनवण्यासाठी एक प्रस्ताव मंत्रिमंडळाला पाठवला आहे. मागणीनुसार गॅस विकण्याची दिली सवलत जाईल. त्यामुळे बर्याच सेक्टरना स्वस्त गॅस उपलब्ध होईल.

गेल आपला पाईपलाईन बिझिनेस वेगळा काढणार आहे. यासाठी एक वेगळी सबसिडीअरी बनवली जाईल.
IOC ने सांगितले की काही ऍसेट्स विकण्याचा कंपनी विचार करत आहे.

WOCKHARDT च्या त्वचा रोगांवरील दोन अँटिबायोटिक्सना भारतात परवानगी मिळाली. गोव्यामध्ये आयर्न ओअर मायनिंग विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने खारीज केली. याचा फायदा वेदांताला होईल.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात गोणीमागे Rs २५ दर वाढवण्याचा निर्णय, सिमेंटला मागणी नसल्यामुळे , सिमेन्ट उत्पादक कंपन्यांनी पुढे ढकलला.

अंदाजपत्रकाच्या आधी सरकारचा कर्ज वाढवण्याचा विचार नाही. जरूर पडली तर अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सरकार नवीन कर्ज घेण्याचा विचार करू शकेल.

अंदाजपत्रकात बँक रिकॅपिटलायझेशनसाठी Rs १०००० कोटींची तरतूद करणार आहे. वित्तीय वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या बँक मर्जरसाठी हे जरुरी आहे.

आज निफ्टीमध्ये स्पिनिंग टॉप/डोजी कँडल स्टिक पॅटर्न तयार झाला हा पॅटर्न पुढील ट्रेंडविषयी अनिश्चितता दर्शवतो. नेमके हेच आज दिवसभर घडले. प्राईस एक्शन इंडेक्समध्ये अगदीच थोडी होती. निफ्टी १२३८९ चा हाय आणि १२३१५ चा लो पाईंट होता. १२३५५ ला मार्केट क्लोज झाले इंट्राडेमध्ये मार्केट निगेटिव्हसुद्धा झाले होते. पुढील ट्रेंड समजेपर्यंत लॉन्ग पोझिशन घेणे हिताचे ठरणार नाही. त्याचप्रमाणे शॉर्ट पोझिशन घेणेही योग्य नव्हे. ट्रेंलिंग स्टॉपलॉसचा वापर करून पोझिशन होल्ड करता येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१९३२ NSE निर्देशांक निफ्टी १२३५५ बँक निफ्टी ३१८५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.