आजचं मार्केट – १७ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६४.५८ प्रती बॅरल ते US $ ६५.०२ प्रती बॅरल या दरम्यान तर US $१= Rs ७०.९६ ते US $ १=Rs ७१.०७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३२ तर VIX १२.२० होता.

सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांनी AGR ड्यूज विषयी दाखल केलेली याचिका रद्द केली. त्यामुळे आता भारती एअरटेलला Rs ३५५०० कोटी तर वोडाफोन आयडियाला Rs ५३००० कोटी तर टाटा टेलीला Rs १३००० कोटी AGR ड्यूज भरावे लागतील. हे पैसे भरण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे. याचा परिणाम या कंपन्यांवर झालाच पण टेलिकॉम क्षेत्राला ज्या बँकांनी कर्ज दिली आहेत त्यांच्या शेअर्समध्येही मंदी आली. टेलिकॉम क्षेत्राला बँकिंग सिस्टीमचे Rs १.३० लाख कोटी एक्स्पोजर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया Rs ३७३३० कोटी, HDFC बँक Rs २४५१४ कोटी, ऍक्सिस बँक Rs.१४०१५ कोटी, BOB Rs १३९५५ कोटी, PNB Rs ७३१८ कोटी. या बरोबरच इंडसइंड बँक, IDFC १ST बँक, येस बँकेचे ही एक्स्पोजर आहे. भारती एअरटेलने ही रक्कम देण्यासाठी QIP इशू द्वारे पैसे उभे केले. वोडाफोन आयडियापुढे मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय इंफ्राटेलच्य उत्पन्नावर या समस्येमुळे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या कंपनीचे उत्पन्न मुख्यतः टॉवर रेंटमधून येते.

जयश्री टी या कंपनीने पूर्व आफ्रिकेमधील २ चहाचे मळे Rs ७० कोटींना बेल्जीयन कंपनीला विकले. हे डील १४ फेब्रुवारी पर्यंत पुरे होईल.

श्री कलाहस्ती पाईपच्या ९ MVA फेरो ऍलॉईज युनिट मध्ये काम सुरु झाले .

आता विनती ऑर्गनिक्स या कंपनीविषयी. ही केमिकल क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी आहे. ही DEBT फ्री कंपनी आहे. प्रमोटर्सचा स्टेक ७५% आहे. EPS Rs ७५ ते Rs ८० आहे. ATBS आणि IBB मध्ये काम करते. ATBS उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. ब्यूटाईल फेनॉल चा प्लांट सुरु करत आहे. ही कंपनी आपल्या शेअर्सचे २:१ या प्रमाणात स्प्लिट करणार आहे . ६ फेब्रुवारी २०२० ही या स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट आहे ( शेअर स्प्लिट या आणि इतर कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे.)

अंदाजपत्रकात सरकार जवळजवळ २५० आयात उत्पादनांवर इम्पोर्ट ड्युटी लावून भारतीय उद्योगांना संरक्षण देण्याची शक्यता आहे. यात पेपर, टायर्स, केमिकल्स, सोलर सेल्स मोड्यूल्स यांचा समावेश असण्याची शक्यता आहे त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती.

DFM फूड्स या कंपनीच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेला २४.७५% स्टेक (शेअर्स) सोडवले. JSW स्टील या कंपनीच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले ६० लाख शेअर्स सोडवले.

सोलर ऍक्टिव्ह फार्मा बरोबरच्या स्ट्राइड्स केमिकल्सच्या मर्जरला NCLT ने मंजुरी दिली.

सेबीने आज कमोडिटीजमध्ये ऑप्शन ट्रेड करायला परवानगी दिली.

पिरामल इंटरप्रायझेसने आपला हेल्थकेअर ( इन्साईट्स आणि अनॅलिटीक्स) बिझिनेस CLAIVATE या कंपनीला Rs ७००० कोटींना विकला.

कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येत आहेत –

हैथवे, डेन नेट्वर्कस, TV १८ ब्रॉडकास्टींग, रॅलीज इंडिया, L &T टेक्नॉलॉजी यांचे निकाल चांगले आले.
HCL टेकचे उत्पन्न १५.५५ ने वाढून Rs १८१४० कोटी, प्रॉफिट १६.३१% नी वाढून Rs ३०३७ कोटी, मार्जिन २०.२% राहिले. या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट २७ जानेवारी २०२० आहे.

TCS चे तिसऱ्या तिमाहीचे उत्पन्न Rs ३९८५४ कोटी, प्रॉफिट Rs ८११८ कोटी,मार्जिन २५% होते. ऍट्रिशन रेट १२.२% होता. कंपनीचा कॅश फ्लो रेकॉर्ड स्तरावर होता.मार्जिन २५% होते. कंपनीने Rs ५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. निकाल चांगला होता.

ICICI लोम्बार्ड या कंपनीच्या प्रीमियम उत्पन्नात, प्रॉफीटमध्ये चांगली वाढ झाली. निकाल चांगले आले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिसर्या तिमाहीचे निकाल आले. फायदा १३.५% ने वाढून Rs ११६४० कोटी झाला. उत्पन्न २.४% वाढून Rs १.५३ लाख कोटी होते.

रिलायन्स JIO च्या ग्राहकांची संख्या ३६ कोटींवर गेली. ARPU Rs १२८.४ होता. जिओचे EBITDA मार्जिन ४०.१% राहिले रिलायन्स रिटेलचा निकाल चांगला आला. १७.६कोटी ग्राहकांनी रिलायन्स रिटेलला प्रतिसाद दिला. रिलायंसचा पेटकेमचे निकाल सर्वसाधारण राहिले. GRM US $ ९.२/BBL राहिले.

BSE निर्देशांक सेंसेक्स ४१९४५ NSE निर्देशांक निफ्टी १२३५२ बँक निफ्टी ३१५९० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १७ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.