आजचं मार्केट – २० जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६५.३१ प्रती बॅरल ते US $ ६५.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०८ ते US $१=Rs ७१.१३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६४ तर VIX १४ होते.

लिबियामध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. २ ऑइल फिल्ड्स मधील उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे क्रुडमध्ये तेजी आली.

HUL ने आपल्या काही उत्पादनाच्या किमतीत बदल केले. छोट्या शाम्पूच्या युनिटची किंमत १३.३% ने कमी केली. शाम्पूच्या मोठ्या युनिटची किंमत ४.७% ने वाढवल्या.किसान जामची किंमत ३.३% नं वाढवली.

डिसेंबर २०१९ मध्ये हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या २.६% ने वाढून १.३० कोटी झाली. इंडिगोचा मार्केटशेअर कायम राहिला तर स्पाईस जेट च्या मार्केट शेअर मध्ये १०% वाढ झाली.

सरकारने २३ जानेवारी २०२० पासून CPSE ETF मधून IOC आणि PFC या कंपन्यांचे शेअर्स वगळून कोची शिपयार्ड, NHPC, NMDC, पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश करण्याचे ठरवले आहे . यामुळे पॉवर ग्रीडमध्ये Rs २१०० कोटी कोची शिपयार्डमध्ये Rs ७५ कोटी NMDC मध्ये Rs ५९० कोटी ,आणी NHPC Rs ३०० कोटी एवढी खरेदी होईल. आणि IOC मध्ये Rs १९७० कोटी आणि PFC मध्ये Rs ८४० कोटींची विक्री होईल. पूर्वी ज्या कंपन्यांमध्ये सरकारचा स्टेक ५१.५% असेल त्यांचा समावेश CPSEITF मध्ये होत होता. पण आता ५१% सरकारचा स्टेक असलेल्या कंपन्यांचा समावेश CPSEITF मध्ये होईल. त्यामुळे हा बदल करण्यात येईल.

कोटक महिंद्रा बँकेचा तिसर्या तिमाहीचा निकाल आला. प्रॉफिट Rs १५९६ कोटी, NPA मध्ये मामुली वाढ झाली. GNPA २.४६% तर NNPA ०.८९% होते. NIM ४.६९% होते. स्लीपेजिस Rs १०६२ कोटी होते. लोन ग्रोथ १०% होती. NII रस ३४३० कोटी होती. लोन ग्रोथमधील कमी वाढ आणि स्लीपेजिसमुळे मार्केटला हे निकाल तितकेसे पसंद पडले नाहीत. त्यामुळे शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक टर्नराउंड झाली. बँकेला तिसऱ्या तिमाहीत Rs १४० कोटींचा नफा झाला. GNPA आणि NNPA मध्ये मामूली सुधारणा झाली. NII Rs ११८६ कोटी होते. प्रोव्हिजन Rs ९२० कोटी केली.
फेडरल बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट Rs ४४१ कोटी, NII Rs ११५५ कोटी तर स्लीपेजिस Rs १९३ कोटींवरून Rs ३२१ कोटी झाली.( YOY). GNPA अणे NNPA मध्ये मामूली सुधारणा झाली.

KEI इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ICICI सिक्युरिटीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ३६% ने वाढून Rs १३७ कोटी झाले.
मार्केट आता भविष्याकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे लोन ग्रोथ, फ्रेश स्लिपेजिस, आणि टेलिकॉम सेक्टरला असलेले बँकेचे एक्स्पोजर आणि कमर्शियल व्हेईकल पोर्टफोलिओमधील WEAKNESS याकडे मार्केटने जास्त लक्ष दिले. त्याचमुळे श्रीराम ट्रान्सपोर्टचा शेअर पडला.

ITI या सरकारी कंपनीचा Rs १६०० कोटींचा फॉलोऑन पब्लिक इशू शुक्रवार २४ जानेवारी २०२० पासून ओपन होऊन २८ जानेवारी २०२०पर्यंत ओपन राहील. ह्या इशूत QIB ना ७५% नॉन इन्स्टिट्यूशनल बिडर्ससाठी १५% आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी १०% आरक्षण असेल.

JSPL, हिंदुस्थान झिंक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल साधारण आले.

महाराष्ट्र राज्य सरकारनी हॉटेल्स, मॉल्स, दुकाने २४X ७ उघडी ठेवायला परवानगी दिली. यामुळे पर्यटनाला उत्तेजन मिळेल असा राज्य सरकारचा होरा आहे. या निर्णयाचा फायदा वेस्टलाइफ, ज्युबिलण्ट फूड्स, ट्रेन्ट, GRAUER & WEIL , हॉटेल्स, D -मार्ट, फ्युचर ग्रुप यांना होईल.

आज भारती एअरटेलच्या QIP इशूचा लॉक-इन पिरियड संपला. पण शेअरमध्ये विक्री झाली नाही. त्याउलट भारती एअरटेलच्या शेअरमध्ये खरेदी झाली.

MOIL मधील ६.४% आपला स्टेक विकणार आहे.

आता थोडे तांत्रिक विश्लेषणाविषयी

आज मार्केट उघडल्याबरोबर निफ्टी १२४३० हा ऑल टा

इम हायचा पाईंट मार्केटने गाठला. त्यानंतर मात्र दिवसभर मार्केट्मध्ये मंदी होती. ही मंदीची कँडल गेल्या आठवड्यातील सर्व तेजीच्या कँडल्सना एनगल्फ ( झाकून टाकणारी) होती. म्हणूनच बेअरिश एनगलफिंग पॅटर्न डेली आणि साप्ताहिक चार्टवर तयार झाला. त्याचप्रमाणे बेअरिश मारूबोझू पॅटर्न तयार झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१५२८ NSE निर्देशांक निफ्टी १२२२४ बँक निफ्टी ३१०८० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.