Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!
आजचं मार्केट – २८ फेब्रुवारी २०२०
आज क्रूड US $ ५०.७६ प्रती बॅरल ते US $ ५१.०१ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.८७ ते US $१=Rs ७२.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५० आणि VIX २०.६९ ते २३.४२ या दरम्यान होते. क्रूडसाठी असलेलेई मागणी कमी झाल्यामुळे क्रूड आज US $ ५० प्रती बॅरल पर्यंत खाली आले.
चीनमधून निघालेले कोरोना व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. रोज लागण झालेल्या आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत आहे. या एक प्रकारच्या अस्मानी संकटामुळे जगभर भीती पसरली आहे. जगभरातील शेअर मार्केट्सवर या संकटाची दाट छाया पसरत आहे. भारतातील शेअरमार्केट याला अपवाद कसे असेल. आज मार्केटमध्ये मंदी(ऑगस्ट २०१५ नंतर सर्वात मोठी इंट्राडे मंदी आणि गेल्या ११ वर्षात १ आठवड्यात झालेली कमाल मंदी ) आणि वोलतालीटी निर्देशांक VIX २३ वर गेला. मार्केटमध्ये सार्वत्रिक मंदी होती. आतापर्यंत असलेली केमिकल,पेंट, सिमेंट क्षेत्रातील तेजीही जाऊन मंदी आली. ही मंदी अजून काही दिवस राहील असे तद्न्यांचे मत आहे.जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येत आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या मंदीमध्ये ज्या कंपन्यांना लागणारा कच्चा माल आणि त्यांच्या पक्क्या मालाच्या मागणीसाठी परदेशावर अवलंबून नाहीत अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा. ज्या कंपन्या या मंदीतही आपला भाव टिकवून आहेत आणि फंडामेंटली मजबूत आहेत अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा. खरेदी केली तरी छोट्या लॉटमध्ये करा. म्हणजे मार्केट पडत राहिले तर तुम्हाला शेअर अधिकाधिक स्वस्त भावाला मिळू शकतील.
NTPC ने बिहारमधील बरौनी येथी २५० MW चा थर्मल पॉवर प्लांट सुरु केला.
व्होडाफोन आयडियाच्या AGR संबंधित अर्जावर ६ मार्च २०२० रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. ही सुनावनि वन टाइम स्पेक्ट्रम चार्जेस संबंधात होईल.
‘TOTAL SA’ या फ्रेंच कंपनीने अडानी गॅसमध्ये २८.५% स्टेक खरेदी केला.
सरकार TCIL मधील आपल्या स्टेकपैकी १०% स्टेक IPO दवारा विकणार आहे.
हेरिटेज फूड्स ही त्यांच्या पंजाब युनिटचे ऍसेट्स Rs २१.६ कोटींना विकणार आहेत.
आजपासून PFC एक्स लाभांश झाली.
वेदांताने Rs ३.९० प्रती शेअर, PVR ने Rs ४ प्रती शेअर , अपार इंडस्ट्रीजने Rs ९.५० प्रती शेअर, सुप्रीम इंडस्ट्रीजने Rs १० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
AGR ड्यूज संबंधी DCC (डिजिटल कम्युनिकेशन कमिशन) ची बैठक झाली ही बैठक याच प्रश्नावर विचार करण्यासाठी पुन्हा होईल.
DR रेड्डीजच्या बच्चूपल्ली प्लांटच्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवलया आणि फॉर्म नंबर ४८३ दिला.
आज MSCI निर्देशांकाचे रिबॅलन्सिंग झाले. काही शेअर्सचे वेटीज वाढवले तर काही शेअर्सचे वेटेज कमी केले. CHALET हॉटेल हा शेअर निर्देशांकातून वगळला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२९७ NSE निर्देशांक निफ्टी ११२०१ बँक निफ्टी २९१४७ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!