Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३१ मार्च २०२०
आज क्रूड US $ २२.८७ प्रती बॅरल ते US $ २३.५३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७५.३५ ते US $१=Rs ७५..५९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.७० तर VIX ६५ होता.
USA मध्ये सोशल डिस्टंसिंग ३० एप्रिलपर्यंत वाढवले. प्रगत देशातील कोरोनाच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावाच्या तुलनेत भारतात वाढणारा प्रादुर्भाव तुलनात्मक रित्या कमी आहे. स्वास्थ्य मंत्रालयाने सांगितले की भारतात अजून कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही. याची मार्केटने नोंद घेतली म्हणून मार्केटमध्ये तेजी आली. कमी होत असलेला क्रूडचा दर ही भारतासाठी जमेची बाजू आहे.चीनमधील कोरोनाच्या केसेस किमान स्तरावर आहेत. चीनमध्ये PMI ५२ वर आहे. याचा अर्थ चीनमध्ये औद्योगिक गतिविधी चालू झाल्या आहेत. याचा परिणाम धातूंशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. उदा टाटा स्टील, हिंदाल्को, जिंदाल saw, मान इंडस्ट्रीज.
ज्या शेअर्सनी १३ मार्चचा लो तोडला नाही अशा शेअर्समध्ये तेजी येत आहे असे दिसते.आज VIX कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला. NSE ने F & O मार्केटमध्ये ऍडिशनल एक्स्पोजर मार्जिन वाढवले त्यामुळे शॉर्र्टिंगचे प्रमाण कमी होईल. रकारने युनिफॉर्म स्टॅम्प ड्युटी ऑन ट्रान्स्फर ऑफ कॅपिटल मार्केट इन्स्ट्रुमेंटची अमलबाजावणी १ जुलै २०२० पर्यंत पुढे ढकलली.
लॉजिस्टिक सर्व्हिसेस, टेक्सटाईल्स, मरीन, मोबाईल उत्पादन आणि विक्री या क्षेत्रातील उद्योगांना सरकार सवलती जाहीर करेल या अपेक्षेने या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढले.यापैकी लॉजिस्टिक आणि मोबाईल विक्री आणि उत्पादन क्षेत्र ह्यांचा समावेश आवश्यक सेवा क्षेत्र म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते उदा स्नोमॅन लॉजिस्टिक, VRL लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ब्ल्यू डार्ट, महिंद्रा लॉजिस्टिक्स, डिक्सन टेक्नॉलॉजी, रेंडिंग्टन, ITI, अंबर एंटरप्रायझेस, हनीवेल ऑटोमेशन
शाळांनी पुढील वर्षांसाठी फी भरायला सांगितले आहे. ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया केली जाईल. ऑन लाईन कोर्स सुरु केले आहेत. त्यामुळे नवनीत सारख्या शेअरवर कोरोनाचा वाईट परिणाम दिसला नाही. NIIT, APTECH ह्या कंपन्यांचे शेअर्स वाढले.
या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा जुलै २३ २०२१ ते ऑगस्ट ८ २०२१ रोजी होतील.
जॉन्सन आणि जॉन्सन ही कंपनी कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधक लस बनवण्यात जवळजवळ यशस्वी झाली आहे. ही लस मार्केटमध्ये जानेवारी २०२१ मध्ये येण्याची आशा आहे.
१ एप्रिल २०२० ला ओपेक+चा उत्पादन कपातीचा करार संपत आहे. आज क्रूड १८ वर्षांच्या किमान स्तरावर आहे. जर लॉकडाऊन आणखी काही काळ चालू राहिले तर क्रूडचा दर US $ १० पर्यंत होण्याची शक्यता आहे असे तद्न्यांचे मत आहे
फ्युचर रिटेल या कंपनीचे तारण म्हणून ठेवलेले शेअर्स IDBI ट्रस्ट आणि UBS ट्रस्टने विकण्यास कोर्टाने मनाई केली आहे.
FFSL च्या राईट्स इशूमध्ये फेडरल बँक Rs १४८ कोटी गुंतवेल.
हिरो मोटो ग्रुप ग्रामीण भागात टू व्हीलर अँब्युलन्स तसेच व्हेंटिलेटर आणि मास्क पुरवेल.
USFDA ने इप्का लॅबच्या HYDROXY CHLOROQUINE या मलेरियाच्या औषधाला मंजुरी दिली.
साखर उत्पादकांनी एथिल अल्कोहोल, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, आणि इथेनॉल यांचा प्राधान्याने पुरवठा करावा. असे सरकारने सांगितले ह्या गोष्टी हॅन्ड सॅनिटायझर बनवण्यासाठी उपयोगात येतात.
ITC ही कंपनी आपण १.२५ लाख लिटर सॅनिटायझर बनवेल. या कंपनीने त्यांच्या सावलॉन या सॅनिटायझरची किंमत कमी केली.
JSW एनर्जीच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले ९० लाख शेअर्स सोडवले.
IOC आसाममध्ये २१ नवीन तेलविहिरी खोदण्यासाठी Rs ८५० कोटी गुंतवेल. .
सध्या एक गोष्ट लक्षात घ्या. ‘प्रथम असे होईल’ अशी बातमी येते आणि सर्किट लागते. अफवेचे बातमीत रूपांतर होते तशी विक्री सुरू होते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये जसे चढणे आणि उतरणे म्हणजेच एन्ट्री आणि एक्झिट सध्याच्या मार्केटमध्ये घाईघाईने केले पाहिजे. कारण जेव्हा स्माल कॅप, मिडकॅप शेअर्समध्ये मंदी येते तेव्हा ओळीने ३-४ दिवस लोअर सर्किट लागतात. विकण्याची संधी मिळत नाही.
‘कठीण समय येता कोण कामास येतो’ तर FMCG आणि फार्मा. लोकांच्या खर्चाचा पॅटर्न लक्षात घेता गरजेच्या गोष्टींना आपण प्रथम प्राधान्य देतो नंतर चैनीची खरेदी करतो. आजारपणाचा खर्च सर्वप्रथम करतो त्यामुळे या क्षेत्रातल्या कंपन्या चांगल्या चालतात.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २९४६८ NSE निर्देशांक निफ्टी ८५९७ बँक निफ्टी १९१४४ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!