आजचं मार्केट – १७ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ मार्च २०२०

आज क्रूड US $ २९.८१ प्रती बॅरल ते US $ ३०.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.९५ ते US $१=Rs ७४.२१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६० तर VIX ६१.७८ होता.

श्रीलंका, दुबई या देशांनी बाहेरील देशातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगात सर्वत्र घबराट आणि भीती पसरली आहे. प्रत्येक देश आपल्या देशातील या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.

भारत सरकारने अफगाणिस्थान, मलेशिया, थायलंड, फिलिपाइन्स या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली.

सन फार्मा ही कंपनी Rs ४२५ प्रती शेअर्स या भावाने ४ कोटी शेअर्स बायबॅक करण्यासाठी Rs १७०० कोटी खर्च करेल.
मूडीज या रेटिंग एजन्सीने येस बँकेचे रेटिंग पॉझिटिव्ह केले.

CCI ने ग्रासिमला Rs ३०२ कोटींचा दंड केला.

आयात मांस आणी डेअरी प्रॉडक्टसची FSSAI जास्त कसून तपासणी करेल. आयात फ्रोझन मांस आणि डेअरी प्रॉडक्टस आधी शिजवून मगच खावीत. यामुळे वेंकीज अवंती फीड्स सारख्या कंपन्यांवर परिणाम होईल.

डेल्टा कॉर्पचा सिक्कीममधील कॅसिनो कोरोना व्हायरसच्या कारणामुळे १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

LIC येस बँकेमध्ये Rs १० प्रती शेअर या भावाने १.३५ कोटी शेअर्स खरेदी करेल. आता LIC चा येस बँकेत ८.०६% स्टेक आहे. हे शेअर्स खरेदी केल्यावरही LIC चा येस बँकेमधील स्टेक १०% पेक्षा कमी राहील.

ब्ल्यू स्टार या कंपनीने आपला FY २१ साठी गायडन्स १५% ते २०% वरून १०% ते १५% केला.

सरकार डोमेस्टिक विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना ATC आणि एअरोनॉटिकल चार्जेस आणि जेट फ्युएल टॅक्समध्ये सूट देण्याची शक्यता आहे.

IT क्षेत्रातील कंपन्यांसाठी FY २१ जिकिरीचे असण्याची शक्यता आहे. US $ ३०० कोटीच्या आऊटसोअर्सिंग ऑर्डर्स स्थगित होऊ शकतात ऑपरेटिंग मार्जिनवर परिणाम होईल. त्यामुळे खरे पाहता Rs चा विनिमय दर US $ १=Rs ७४ च्या खाली गेल्याचा फायदा  IT कंपन्यांना मिळत नाही असे दिसते. कोरोनाच्या धक्क्यातून सावरायला या कंपन्यांना FY २१ ची तिसरी तिमाही एवढा वेळ लागेल.

आज मार्केटमध्ये VIX ६१.७८ होते. त्यामुळे मार्केटमध्ये वाइल्ड स्विंग येत होते. पण प्रत्येक स्विंगनंतर मार्केट मात्र खाली खाली जात होते. अखेर निफ्टी ९००० च्या खाली गेला. बँक निफ्टीमध्येही २२१५५ ची पातळी गाठली. मार्केटच्या या गनिमी काव्याचा सामना करणे फार कठीण आहे. कधी तेजी आणि कधी मंदी मार्केटचा ताबा आळीपाळीने घेत होत्या.

ONGC ने आज Rs ५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०५७९ NSE निर्देशांक निफ्टी ८९६७ बँक निफ्टी २२१५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १७ मार्च २०२०

    1. surendraphatak

      सुहास– Bluestar ने guidance 10% केला म्हणजे पुढील वर्षी कंपनीची प्रगती 10% होण्याची शक्यता व्यक्त केली

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.