आजचं मार्केट – १९ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १९ मार्च २०२०

आज क्रूड US $ २५.०६ प्रती बॅरल ते US $ २६.२० प्रती बॅरल,रुपया US $ १= Rs ७४.७९ ते US $१=Rs ७५.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक १००.८२ तर VIX ७३.१० वर होते.

आता डेली चार्टचा फारसा उपयोग होत नाही. कारण VIX ७३ वर पोहोचला आहे. मार्केटमध्ये अस्थिरता खूप आहे त्यामुळे मंथली चार्ट बघा. २०० महिन्यांचे MA ७७५० वर आहे. मॉनेटरी स्टिम्युलस, क्वांटिटेटिव्ह इजिंग, यांचा काही फायदा होत नाही. कोरोना टॉप आऊट होईल तेव्हा मार्केट बॉटम आऊट होईल.

ITC चा शेअर १५ च्या P/E वर आहे. ITC ने त्याची लाभांश पॉलिसी बदलली आहे. प्रॉफिटच्या ८०% ते ८५ % लाभांश जाहीर केला जाईल. यात स्पेशल लाभांश इंटरिम लाभांश, अंतिम लाभांश यांचा समावेश असेल. या बातमीनंतर ITC चा शेअर वाढला.

ICMR ( इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च) ने जाहीर केले की कोठेही कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड दिसत नाही.

कल्पतरू पॉवरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २४ मार्च २०२० रोजी शेअर्स बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

सेबीने कंपन्यांना त्यांचे Q-४ रिझल्ट जाहीर करण्यासाठी जून २०२० पर्यंत मुदत दिली. इतर डिस्क्लोजर नॉर्म्समध्येही सूट दिली जाण्याची शक्यता आहे.

येस बँकेच्या नवीन कर्ज देण्यावर किंवा इतर बाबतीत मोरॅटोरियम उठवल्यानंतर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत असे RBI ने जाहीर केले.

MSME ला वर्षभरासाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. MSME GST चे पेमेंट FY २१ च्या पहिल्या तिमाही पर्यंत करू शकते. कमी केलेल्या किंवा काढून टाकलेल्या कर्मचाऱयांचा पगार आदी खर्च सरकार करेल.

इमामी Rs ३०० प्रति शेअर या भावाने ६४.७० लाख शेअर्स बाय बॅक करेल.

रेल्वेने १५५ बाहेरगावी जाणार्या गाड्या रद्द केल्याने आज IRCTC च्या शेअरला लोअर सर्किट लागले. आज पर्यटन, हॉटेल्स, एविएशन, मेटल्स, रिअल इस्टेट या क्षेत्रातील शेअर्समध्ये मंदी होती.

निफ्टी चार्ट पाहिल्यास शॉर्ट टर्म मुविंग ऍव्हरेजने लॉन्ग टर्म मुविंग ऍव्हरेजला खालच्या दिशेनी क्रॉस केले. त्यामुळे डेथ क्रॉस झाला मार्केट आणखी काही काळ पडत राहील असा तद्न्यांचा अंदाज आहे.

पीडिलाइट, कॅडीला हेल्थकेअर, डिव्हीज लॅब, भारती एअरटेल आणि D-मार्ट हे शेअर्स अजूनही २०० DMA च्या वर आहेत.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स २८२८८ NSE निर्देशांक निफ्टी ८२६३ बँक निफ्टी २००८३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १९ मार्च २०२०

 1. Jayant M Patil

  Hi Madam, Good morning

  What is Monetary stimulus & Quantitative eging, kindly clarify,

  Thanks & Regards
  Jayant Patil
  9930202877

  Reply
  1. surendraphatak

   जयंत पाटील– तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आजचा ब्लॉग वाचा

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.