आजचं मार्केट – २३ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ मार्च २०२०

आज क्रूड US $ २५.४४ प्रती बॅरल ते US $ २६.२९ प्रती बॅरल या दरम्यान, रुपया US $१= Rs ७५.१८ ते US $१=Rs ७६.०९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक १०२.३७ तर VIX ७२.६० होते.

USA मध्ये कोरोना व्हायरसची स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. इटलीमध्ये तर चीनपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. मुख्यतः युरोपातील देशात आणि UK या देशात याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. USA मध्ये बेकारी ३०% वाढते आहे. USA मधील काही राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. USA ची मार्केट्स झपाट्याने पडत आहेत.

या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने आणि काही राज्य सरकारांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे . जेथे जेथे म्हणून गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी स्थळे, ऍक्टिव्हिटी लॉक डाऊन करावयास सांगितल्या. अत्यावश्यक सेवा आणि आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उदा धान्य, दूध, बँका,सोडून इतर सर्व दुकाने, ऑफिसेस बंद ठेवायला सांगितली. रेल्वेच्या प्रवासी गाड्या रद्द केल्या. तसेच जे कर्मचारी रजेवर असतील त्यांचा पगार चालू ठेवायला सांगितले. कंपन्यांना त्यांच्या CSR ( कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) च्या पैशातून कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली.

सरकारने काही खाजगी लॅब्सना उदा लाल पाथ लॅब, मेट्रोपोलीस हेल्थ केअर, थायरो केअर कोरोनासाठी चाचण्या करण्यास परवानगी दिली. या चाचण्यांसाठी Rs ४५०० ची मर्यादा ठरवली.

लोकांना आवाहन केले की हे संकट दूर होईपर्यंत आपल्या घरातच राहा. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा देण्यास सांगितले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन दुकानदार, मॉल्स, कंपन्या यांनी आणि सर्व साधारण जनतेने सरकारला चांगली साथ दिली.

आज M & M नी आपले भुवनेश्वर, नागपूर येथील कारखाने बंद केले. मारुतीने आपला मानेसर येथील प्लांट बंद केला. हिरो मोटो कॉर्प या कंपनीने त्यांचे जगातील सर्व प्लांट बंद केले. भारत फोर्जने आपली ऑपरेशन्स बंद केली. श्री सिमेंटने राजस्थानमधील कामकाज बंद केले. HUL आणि इतर उत्पादकांनी सॅनिटायझरच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. रिलायन्स ट्रस्टनेही या संकटाशी मुकाबला करण्यासाठी हात पुढे केला आहे. टायटन २२ मार्च ते २९ मार्च २०२० पर्यंत आपली रिटेल स्टोअर्स बंद ठेवणार आहे.

USA मध्ये कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी क्लोरोक्वीन या औषधाचा उपयोग करण्यास परवानगी दिली आहे . इप्का लॅबच्या USA मधील दोन प्लांटवर USFDA ने बंदी घातली होती पण आता या प्लांटमध्ये या औषधाचे उत्पादन करायला परवानगी दिली. हे औषध कॅडीला, टॉरेन्ट फार्मा, मंगलम ड्रग्स या कंपन्याही बनवतात. .

स्टॉक एक्स्चेंज मात्र चालू आहेत. कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे शेअरमार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सर्व शेअर्समध्ये मंदी होती. आज मार्केटला (सेन्सेक्स २६९२४ झाल्यामुळे ) लोअर सर्किट लागले. ४५ मिनिटे मार्केट बंद राहून प्रीओपन सेशन होऊन मार्केट सुरु झाले. ( मार्केट सर्किट फिल्टर तसेच स्टॉक सर्किट फिल्टर या विषयी सविस्तर माहिती ‘ माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे ) पण पुन्हा मार्केट पडतच राहिले.! पडतच राहिले !

मार्केटला अनिश्चितता आवडत नाही. कोरोनाचे संकट किती वेळ चालू राहील याची काहीच निश्चिती नसल्याने मार्केटचा ताबा भीतीने घेतला.फिअर आणि ग्रीड मीटरने ४ चा स्तर गाठला. सतत आणि मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. आज ज्या किमतीला शेअर मिळत आहे त्यापेक्षा उद्या जास्त स्वस्त मिळेल असे वाटल्याने खरेदी होत नाही. VIX हा वोलतालीटी निर्देशांक १२ वर्षाच्या उच्च स्तरावर म्हणजे ७३.३६ होता.  खाजगी बँका, NBFC, सरकारी बँका, ऑटो आणी ऑटो अँसिलिअरी या क्षेत्रात जबरदस्त मंदी होती .

आज संसदेत फायनान्स बिल पास झाले. संसदेचे काम अनिश्चित काळापर्यंत स्थगित ठेवले गेले.

रामकृष्ण फोर्जिंग ने Rs २५० प्रती शेअर, दालमिया भारतने Rs ७०० प्रती शेअर, तर मोतीलाल ओस्वालने Rs ६५० प्रती शेअर बायबॅक जाहीर केला.

उद्या स्टरलाईट टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बायबॅक करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

आपण आपल्या जवळ शिल्लक कॅश असेल तर (सर्व गोष्टींसाठी प्रोव्हिजन करून) हळू हळू छोट्या छोट्या लॉटमध्ये ( ५, १०, १५ शेअर्स) खरेदी करायला सुरुवात करण्यास हरकत नाही, जे शेअर्स त्यांची किंमत जास्त असल्याने आपल्याला महाग वाटत होते असे ब्ल्यू चिप शेअर्स आता आपल्याला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.पण मार्केट सुधारण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही . तज्ज्ञांच्या मते जेवढा मार्केटच्या पडण्याचा वेग होता तेवढ्याच वेगाने मार्केट परत वर येईल. फक्त कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा उपाय सापडला पाहिजे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स २५९८१ NSE निर्देशांक निफ्टी ७६१० बँक निफ्टी १६९१७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.