आजचं मार्केट – २४ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ मार्च २०२०

वाचकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! आपण सर्वजण यादिवशी करोनाचा सामना जिद्दीने करण्याचा संकल्प करूया!!

आज क्रूड US $ २७.८१ प्रती बॅरल ते US $ २८.५० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७६.१५ ते US $१=Rs ७६.२० या दरम्यान होते. US $ निर्देशांक १०१.९३ तर VIX त्याच्या उच्च स्तरावर म्हणजे ८४.२७ वर होते.

जगात सगळीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच बरोबर शास्त्रीय आघाडीवर यांच्यावरचे उपाय तसेच प्रतिबंधक लस शोधण्या बरोबरच याचे जे आर्थिक परिणाम होतील त्याला सामोरे जाण्याची तयारी सर्व देश करत आहेत. USA ची सेंट्रल बँक फेडने जाहीर केले की ते आता बॉण्ड्स खरेदी करतील. या बातमीनंतर USA च्या मार्केटमध्ये तेजी आली.

जगातील बहुसंख्य देशात लॉकडाऊन असल्यामुळे डिझेल, पेट्रोल, ATF ( एअर टरबाइन फ्युएल) शिपिंग फ्युएल यासाठी मागणी खूपच कमी झाली आहे. त्यामुळे क्रूडचे दर खूपच कमी झाले आहेत. याचा परिणाम OMC (ऑइल मार्केटिंग कंपन्या), ऑइल सोर्सिंग कंपन्या, यांच्यावर होईल आणि त्यांच्या शेअर्सचे भाव कमी झाले.

भारतामध्ये लॉक डाऊन सुरु आहे. त्यानुसार शॉपर्स स्टॉपने आपली सगळी दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. GHCL ने आपले यार्न उत्पादन युनिट बंद केले. पेज इंडस्ट्रीजने आपले उत्पादन युनिट बंद केले. वेलस्पन कॉर्पने सर्व उत्पादक युनिट बंद केली. कोलगेटने आपले ऑफिस तर बजाज ऑटोने आपले चाकण आणि पंतनगर येथील प्लांट बंद केले.

HUL ने ग्लेनमार्क फार्माचा ‘V WASH’ हा ब्रँड खरेदी केला. त्यामुळे HUL चा शेअर वाढला.

स्टरलाईट टेक्नॉलॉजीज ने जास्तीतजास्त Rs १५० प्रती शेअर या भावाने Rs १४५ कोटींचा बायबॅक जाहीर केला. या बायबॅकच्या बातमीनंतर स्टरलाईट टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये तेजी आली.

इन्फोसिस विरुद्ध व्हिसलब्लोअरने केलेल्या तक्रारीत इन्फोसिसला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाले. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअरमध्ये तेजी आली.

आज दोन बातम्या आल्या. एक म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतील. दुसरी बातमी म्हणजे माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या २ वाजता पत्रकार परिषद घेतील. आर्थिक सवलतींच्या पॅकेजची अपेक्षा करणाऱ्या मार्केटने ह्या बातमीचा आधार घेतला आणि उघडल्यापासून पडत असलेले मार्केट सावरले.

माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बहुतेक सुधारणा जाहीर केल्या त्या कोरोनाच्या कारणामुळे प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करणाऱ्या होत्या. FY २०१८ -१९ चा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख आता जून ३० २०२० पर्यंत वाढवली.उशीर झाल्यामुळे आता पूर्वी आकारण्यात येणाऱ्या १२% ऐवजी ९% नी व्याज आकारले जाईल. उशीरा डिपॉझिट केलेल्या टीडीएस साठीही १२% ऐवजी ९% व्याज आकारले जाईल. आधार कार्डाबरोबर पॅन लिंक करण्याची मुदतही ३० जून पर्यंत वाढवली. मार्च एप्रिल मे २०२० साठी चे GST रिटर्न भरण्यासाठी मुदत जून २०२० पर्यंत वाढवली. ‘विवादसे विश्वास’ आणि ‘सबका विश्वास’ या दोन्ही स्कीमची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावण्यासाठीच्या मुदतीत ६० दिवसाची मुदतवाढ पुढील दोन तिमाहीसाठी दिली.

नवीन कंपन्यांना कमेन्समेंट ऑफ बिझिनेसचे डिक्लरेशन सादर करण्यासाठी मुदत ६ महिन्यांवरून १ वर्ष केली .३० जून २०२० पर्यंत कस्टम क्लिअरन्स २४X ७ चालू राहील. कंपनी डिपॉझीटच्या २०% रकमेची प्रोव्हिजन करण्याची तसेच मॅच्युअर होणाऱ्या डिबेंचर्सच्या रकमेची १५% रकम गुंतवणूक करण्याची तारीख ३० जून २०२० पर्यंत वाढवली.

IBC लागू करण्यासाठी कंपनीने केलेल्या डिफाल्ट ची मर्यादा Rs १ लाखापासून Rs १ कोटी केली. त्यामुळे MSME ला काहीसा रिलीफ मिळेल.

मच्छीमार व्यवसायासाठी SIP ( सॅनिटरी इंपोर्टस परमिट) SHRIMP ब्रूड आणि इतर अक्वाकलचर यांच्या आयातीसाठी लागते) ची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवली.

डेबिट कार्ड होल्डरने दुसर्या बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास ३० जून २०२० पर्यंत चार्जेस लागणार नाहीत. तसेच पुढील तीन महिन्यांसाठी किमान बॅलन्स ठेवण्याची अट राहणार नाही आणि त्यासाठी चार्जेसही लागणार नाहीत. तसेच माननीय अर्थमंत्रयांनी जाहीर केले की कोणत्याही योजनेची प्रक्रिया आणि त्यासाठी असलेली पात्रता यात बदल केले जातील. पण योजनेत बदल करणार नाही. माननीय अर्थमंत्र्यान्च्या प्रेस कॉन्फरन्सनंतर रिलीफ पॅकेजच्या खूपच अपेक्षा बाळगणाऱ्या मार्केटमध्ये याबाबतीत निराशा झाल्याने पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाले.

आज मार्केटमध्ये VIX ८४ वर पोहोचला. मार्केटमध्ये मंदीचे आणि तेजीचे स्विंग पाठोपाठ येत होते. निवडक शेअर्स उदा ब्रिटानिया, रिलायन्स सारख्या शेअरमध्ये परिस्थिती थोडी सुधारली.

लॉक डाऊन किती वेळापर्यंत चालू राहिल आणि त्याचे आर्थिक परिणाम पुढे किती काळापर्यंत अर्थव्यवस्थेवर होत राहतील याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सध्यातरी थांबा आणि वाट पहा हेच धोरण योग्य ठरेल. सावधानतेने आपल्या आर्थीक परिस्थितिच्या तब्येतीला रुचेल पचेल एवढीच गुंतवणुक सध्या शेअरमार्केटमध्ये करावी.

सर्व मार्केट आजच्या ८ वाजता होणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाहनाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.  BSE निर्देशांक सेन्सेक्स २६६७४ NSE निर्देशांक निफ्टी ७८०१ बँक निफ्टी १७१०७ वर बंद झाली.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.