आजचं मार्केट – २५ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ मार्च २०२०

आज क्रूड US $ २७.६८ प्रती बॅरल ते US $ २७.९९ प्रती बॅरल, आज करन्सी मार्केट बंद असल्यामुळे रुपयाचा विनिमय दर US $१=Rs ७५.८८ वर स्थिर होता. US $ निर्देशांक १०१.५२ आणि VIX ७८ ते ८० च्या दरम्यान होता.

आज USA च्या काँग्रेसने US $ २ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. ऑस्ट्रेलिया जर्मनीने आपण बाजारातून बॉण्ड्स खरेदी करू असे जाहीर केले. आज भारत सरकारनेही कोरोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा ज्या उद्योगांवर परिणाम होणार आहे त्या उद्योगांसाठी स्टिम्युलस पॅकेज जाहीर करण्याची शक्यता होती. उद्या मंथली किंवा २०१९ -२०२० या वर्षातील शेवटची एक्स्पायरी असल्यामुळे शॉर्ट कव्हरिंगची सुरुवात, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेली ब्लॉक डील यामुळे आजतरी मार्केटमध्ये सुंदर तेजी होती. अशा प्रकारे मार्केटने नवीन वर्षांचा प्रारंभ तेजीची उंच गुढी उभारून वर्षातील साडे तीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा दिमाखात साजरा केला. मुहूर्त तरी चांगला झाला.

लॉन्ग टर्म ऍव्हरेजच्या खाली व्हॅल्युएशन गेले की लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर्स मार्केट मध्ये शिरतात. भूतकाळात ग्लोबल फायनान्सियल क्रायसिस मध्ये मार्केटकॅप /GDP रेशियो जेवढा होता त्यापेक्षाही हा रेशियो खालच्या स्तरावर गेला होता. मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे का अंडरव्हॅल्यूड आहे हे समजण्यासाठी या रेशियोचा उपयोग होतो.

क्रूडसाठी असलेली मागणी कमी होत आहे. त्यामुळे यांच्याशीसंबंधी शेअर्सवर परिणाम झाला. भारतात जाहीर झालेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन मुळे भारताच्या GDP वर ६०% परिणाम होईल. एप्रिल २०२०-जून २०२० या पहिल्या तिमाहीत हे परिणाम प्रकर्षाने जाणवतील.

येस बँक, वोडाफोन, PVR, NCC, अडाणी एंटरप्रायझेस आणि PNB आज F &O बॅनमध्ये होते.

फेडरल बँकेच्या CEO श्रीनिवासन यांनी १९.१० लाख शेअर्स विकले. ही शेअर्सची विक्री ESOP लोनच्या संबंधित होती.

२० मार्च २०२० रोजी JSPL च्या प्रमोटर्सनी १५ लाख शेअर्स तारण ठेवले.

केंद्र सरकारने राज्य सरकारला फूड प्रोसेसिंग युनिट्स बंद करू नका अशी सूचना केली.

लॉकडाऊनच्या काळात डिस्क्रिशनरी स्पेंडिंग ( ऐच्छिक खर्च) कमी होईल. त्यामुळे बाटा, एशियन पेंट्स, ITC, इनॉक्स लिजर, PVR, पीडिलाइट, शॉपर्स स्टॉप, वोल्टास यांच्या विक्रीवर परिणाम होईल.

सरकारने हैड्रॉक्सी क्लोरोकवीन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा परिणाम इप्का लॅब्स, नाटको फार्मा, कॅडीला हेल्थकेअर या कंपन्यांवर होईल.

दिल्ली मध्ये इथेनॉलबेस्ड सॅनिटायझर बनवण्यास ३० जूनपर्यंत परवानगी दिली. प्राज इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकॉल
गारमेंट निर्यातीवर मिळणाऱ्या टॅक्स सुटीची मर्यादा वाढवली ही सूट आता १ एप्रिल २०२० नंतरही सुरु राहील.उदा रेमंड, बॉम्बे डाईंग, अरविंद, सेंच्युरी

भारत सरकारने एव्हिएशन उद्योगाला एव्हीएशन इन्फ्रा हे पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे .त्यामुळे इंडिगो आणि स्पाईस जेटच्या शेअर्समध्ये तेजी आली. आज हॉटेल आणि पर्यटन उद्योगाला काही सवलती मिळतील अशी मार्केटची आशा असल्याने हॉटेल्सचे शेअर्स वाढत होते. उदा ताज GVK, EIH, रॉयल ऑर्चिड इंडियन हॉटेल्स

फेसबुक रिलायन्स JIOमध्ये १०% स्टेक घेणार आहे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये १.१६ कोटी शेअर्सचे ब्लॉक डील झाले. रिलायन्सच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

आज फार्मा रिटेल, IT, बँकाच्या शेअरमध्ये खरेदी होती. आज मार्केटमध्ये आलेली तेजी टिकाऊ आहे की क्षणभंगुर आहे हे उद्याच कळेल. मार्केटमधील ट्रेण्ड कन्फर्म झाल्याशिवाय मार्केटमध्ये काही व्यवहार फार काळजीपूर्वक आणि सावधानतेने करावेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८५३५ NSE निर्देशांक निफ्टी ८३१७ बँक निफ्टी १८४८१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.