आजचं मार्केट – २७ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ मार्च २०२०

आज US $ ७४.३० प्रती बॅरल ते US $ ७५.३८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs २६.२५ ते US $१=Rs २६.६६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.०६ तर VIX ६६.६० ते ७१.२५ दरम्यान होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्या जगात वाढत आहे, भारतही त्याला अपवाद नाही. भारताने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली योग्य कारवाई केल्याने ही संख्या कमी आहे.

मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताच्या FY २० मधील GDP ग्रोथ चे अनुमान २.५% तर २०२१ मधील GDP ग्रोथचे अनुमान ५.८% केले. G -२० देशांसाठी FY २० साठी GDP ग्रोथचे अनुमान -०.५% आणि FY २०२१ साठी ३.८% केले.
USA मध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या हा आकडा ३० लाखांवर आहे.

सध्या सर्वजण बहुतेक सर्व व्यवहार डिजिटल फॉर्ममध्ये करत आहेत. लोकांना डिजिटल व्यवहाराचे महत्व पटलेले आहे. त्यामुळे APTECH, NIIT LTD, हे शेअर्स तेजीत होते. कोरोना व्हायरसचा उपाय आणि प्रतिबंधक लस शोधण्यासाठी जगातील सर्व फार्मास्युटिकल कंपन्या आटोकाट प्रयत्न करत आहेत. USA मध्येही फार्मा शेअर्स तेजीत होते. काळात भारतातही फार्मा शेअर्सना मागणी आहे कोरोनाच्या उपचारात उपयोगी किट्स BOSCH ने तयार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तपासणीचा निकाल सॅम्पल्स लॅबमध्ये न पाठवता २.३० तासात कळेल. BEL सुद्धा मेडिकल उपकरणे तयार करणार आहे.सिमेन्सही कंपनीसुद्धा ही उपकरणे तयार करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आज फार्मा आणि हायजिन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होतीउदा P &G हायजिन . SIS या कंपनीच्या शेअरमध्येही लक्षणीय वाढ झाली.

ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद येथील युनिट नंबर ८ ला USFDA ने क्लीन चिट दिली.

१४ एप्रिल २०२० रोजी रात्री १२ वाजल्यापासून ज्या रेलगाड्या सुटतील त्या गाड्यांसाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. त्यामुळे IRCTC तसेच रेल्वेशी संबंधित इतर शेअर्समध्ये (RVNL राईट्स,) तेजी होती.

मजेस्को ही कंपनी विमा कंपन्यांसाठी IT संबंधित काम करते या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी होती.

स्टॅंडर्ड लाईफने HDFC लाईफ मधील १.७५% स्टेक (३.५३ कोटी शेअर्स) Rs ४३१ ते Rs ४४८ दरम्यान विकले. त्यामुळे HDFC लाईफमध्ये किंचित मंदी आली

WABCO या कंपनीचे ZF बरोबर मर्जर होणार आहे. या मर्जरमध्ये WABCO च्या शेअर्स साठी Rs ७००० प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणली जाईल. हे मर्जर जून २०२० पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे.

टाटा स्टील आणि JSW स्टीलचे उत्पादन ७०% ने कमी झाले आहे.

NTPC ही सरकारी कंपनी THDC मधील ७५% स्टेक खरेदी करणार आहे.

१ एप्रिलला गॅस किमतीचा रिव्ह्यू घेतला जातो. तसेच BSVI अनेबल्ड कार्सची सुरुवात होईल.

अरविंद फॅशन या कंपनीने आपला राईट्स इशू पुढे ढकलला.

कोरोनाच्या संकटकाळात FMCG, फार्मा, हेल्थकेअर या क्षेत्रात तेजी होती.

टाटा मोटर्स आपला EV बिझिनेस वेगळ्या सबसिडीअरीत ट्रान्स्फर करेल. शैलेशचंद्र यांची EV आणि PV डिव्हिजनचे प्रेसिडंट म्हणून नेमणूक केली आहे.

आज RBI ने एक आठवडा आधी आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. त्यातील बाबी पुढील प्रमाणे :-
रेपोरेट ०.७५% ने कमी करून ४.४०% तर रिव्हर्स रेपोरेट ०.९०% ने कमी करून ४% केला.
लिक्विडीटी अडजस्टमेन्ट फॅसिलिटी रेट ४% केला.

२८ मार्च २०२० पासून सर्व बँकांकरता एक वर्षांकरता CRR ४% वरून ३% केला. यामुळे बँकांकडे Rs १.४७ लाख कोटी रिलीज होतील.

MSF ( मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी) २% ऑफ SLR वरून ३% ऑफ SLR केली. त्यामुळे Rs १.३७ लाख कोटी फंड्स रिलीज होतील.

लिक्विडीटी वाढवण्यासाठी येत्या ३ वर्षेपर्यंत RBI Rs १.०० लाख कोटींचे LTRO करेल.

१ मार्च २०२० रोजी बाकी असलेल्या आणि कोणत्याही प्रकारच्या लेन्डिंग इन्स्टिटयूटने दिलेल्या ( यात बँका, NBFC, हौसिंग फायनान्स कंपन्या, स्मॉल फायनान्स बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या यांचा समावेश असेल) कोणत्याही मुदतीच्या (टर्म लोन) कर्जाचे मासिक हप्ते फेडण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल.

१ मार्च २०२० रोजी बाकी असलेल्या वर्किंग कॅपिटल लोनवरील व्याजाच्या पेमेंटसाठी ३ महिने मुदतवाढ दिली जाईल.
वर्किंग कॅपिटल क्रेडिट फॅसिलिटी ‘कॅश क्रेडिट’साठी कर्ज देणाऱ्या संस्था मार्जिन रिक्वायरमेंट कमी करून जास्त ड्रॉईंग पॉवर कर्जदारांना उपलब्ध करून देऊ शकतात.

या सर्व सवलती घेतल्या तरी याचा ऍसेट वर्गीकरण आणि क्रेडिट स्कोअर ( हिस्टरी) वर परिणाम होणार नाही. या सर्व सवलतींमुळे आता GDP च्या ३.२% एवढ्या रकमेचे रिलीफ पॅकेज RBI आणि सरकारने मिळून रिलीज केले.

RBI गव्हर्नरनी सांगितले की भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तसेच भारतीय बँकिंग सिस्टिम सुरक्षित आणि साऊंड आहे. भारताची फिस्कल पोझिशन ठीक आहे. पण कोरोना व्हायरसच्या अचानक उद्भवलेल्या आणि अर्थव्यवस्थेवर अनिश्चित कालपर्यंत परिणाम करणाऱ्या संकटामुळे परिस्थिती अस्थिर झाली आहे. त्यामुळे RBI ने GDP ग्रोथ, महागाईचा दर या विषयीचे अनुमान केलेले नाही. RBI चा आऊटलुक अकोमोडेटिव्ह असून जरूर भासल्यास रेटकटसकट इतर उपायांचा अवलंब करू शकेल. RBI च्या या वित्तीय धोरणाच्या घोषणेनंतर बँका, आणि फायनान्सियल्स मध्ये तेजी आली. क्रेडिट ग्रोथसाठी उपलब्ध असलेल्या पैशात वाढ आणि तीन महिन्यांसाठी NPA च्या फ्रेश स्लीपेजिस पासून मुक्तता असा बँकांचा दुहेरी फायदा होणार आहे. कॅश क्रेडिट लोनवरील मार्जिन रिकवायरमेंट कमी करायला परवानगी दिल्यामुळे MSME ना आता जास्त वर्किंग कॅपिटल उपलब्ध होईल.

आता बँकांनी आपल्या कर्जावरील दर कमी करून RBI च्या या पॅकेजला प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच क्रेडिट ग्रोथ मध्ये सहभागी झाले पाहिजे. कर्जासाठी आपण होऊन मागणी येत नसली तर बँकांनी संशोधन करून ती तयार केली पाहिजे.
कालच्या आणि आजच्या पॅकेजीस मुळे बँकांकडे लिक्विडीटी भरपूर उपलब्ध असेल. फक्त अर्थव्यवस्थेला उपकारक होईल अशा रीतीने तिचा वापर बँका आणि इतर कर्ज देणार्या संस्थानीं केला पाहिजे.

मार्केटने या पॅकेजचे स्वागत केले. नंतर थोडे प्रॉफिट बुकिंग झाले. पण आज मार्केटमध्ये एकूण तेजी होती. फार्मा, FMCG, PSU, बँका यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

आता सर्व कोरोनाच्या प्रादुर्भावावर अवलंबून आहे . त्यासाठी औषध, प्रतिबंधक लस मिळाली तर उत्तमच पण त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण तरी कमी व्हायला पाहिजे. तरच मार्केटमधील ही तेजी टिकून वाढत जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९८१५ NSE निर्दशांक निफ्टी ८६६० बँक निफ्टी १९९६९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.