Monthly Archives: March 2020

आजचं मार्केट – १६ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ मार्च २०२०

आज क्रूड US $ ३१.२६ प्रती बॅरल ते US $ ३२.६४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७४.०६ ते US $१= Rs ७४.३१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२० तर VIX ५८.६१ या कमाल स्तरावर होते.

आज USA ची सेंट्रल बँक फेडने व्याज दरात १% कपात केली. आता हा दर ०.०० ते ०.२५% या दरम्यान असेल. US $ ७०० बिलियनचे पॅकेज जाहीर केले.या सर्व गोष्टींचा जो परिणाम व्हायला पाहिजे तो झाला नाही. USA वर एवढे असे काय संकट आले की व्याजाचे दर ०.००% करण्याची वेळ आली असे वाटून USA चे मार्केट पडले. न्यूयॉर्क शहरात सिनेमा थिएटर्स, नाईट क्लब, कॉन्सर्ट व्हेन्यू बंद केले.

बँक ऑफ जपानने एक वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाईल अशी घोषणा केली. तसेच कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये २ लाख कोटी येनची गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेत लिक्विडीटी इंजेकट करेल.

साऊथ कोरियाच्या सेंट्रल बँकेने रेट कट केला.

चीन दक्षिण कोरिया इटली स्पेन यांनी शॉर्ट सेलिंगवर बंदी घातली. चीनमध्ये इंडस्ट्रियल उत्पादन ३०% ने कमी झाले.
भारत सरकारने ज्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असेल त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी डिक्लरेशन, अनिवार्य केले. आणि १४ दिवस क्वारनटाईनमध्ये राहणे अनिवार्य केले.

सर्व जगामध्ये माल प्रवासी यांची वाहतूक कमी झाल्याने क्रूडसाठी असलेली मागणी कमी झाली.

क्रूडचा भाव US $ ३२ प्रती बॅरलच्या खाली गेला. चीनची अर्थव्यवस्था कमजोर झाल्यामुळे मेटल्ससाठी मागणी कमी झाली त्यामुळे मेटल क्षेत्रातील शेअर्स पडले.

आज GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये मोबाइल्सवरील GST १२% वरून १८% केला. त्यामुळे मोबाईल्स महाग होतील. याचा परिणाम डिक्सन टेकनॉलॉजि, रेड्डींग्टन यांच्या वर होईल. इमामी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची शेअर बाय बॅक वर विचार करण्यासाठी गुरुवार १९ मार्च २०२० रोजी बैठक होईल.

आज SBI कार्ड्सच्या शेअर्सचे IPO प्राईसच्या १३% डिस्काऊंटवर म्हणजे Rs ६६१ वर लिस्टिंग झाले. हा शेअर नंतर Rs ७४० पर्यंत वाढला होता.

अँटनी वेस्टचा IPO पुरेसे सब्स्क्रिप्शन न झाल्यामुळे मागे घेतला गेला.

GHCL चा टेक्सटाईल कारभार डीमर्ज करायला मंजुरी मिळाली. GHCL ने Rs ३, कॅडीला हेल्थ केअरने Rs ३.५०, लुमॅक्स ने Rs १७.५०, HAL ने Rs ३३.२५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

TCS च्या Rs १२ प्रती अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट २०मार्च २०२० आहे आणि आपल्या खात्यामध्ये २४ मार्च २०२०ला जमा होईल.

बजाज ऑटोने आपल्या BSVI, BSIV बाईकवर Rs २०००, हीरोमोटोनी Rs २००० तर TVS मोटर्सने Rs ५००० सूट जाहीर केली.

आज वोडाफोन आयडियाने AGR ड्यूज प्रती Rs ३३५२ कोटी भरले. सरकार सुप्रीम कोर्टात टेलिकॉम कंपन्यांना AGR ड्यूज भरण्यासाठी २० वर्षांची मुदतवाढ द्यावी असा अर्ज करणार आहे. या बातमीनंतर वोडाफोन आयडिया, भारती एअरटेल, IDFC १ST, इंडसइंड बँक यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

फेब्रुवारी २०२० महिन्यासाठी WPI २.२६% ( जानेवारी २०२० मध्ये ३.१%) होते. खाद्यपदार्थ भाज्या प्रायमरी आर्टिकल्स यांच्या किमती कमी झाल्या.

येस बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा खराब आले.SBI आणि इतर बँकांनी स्टेक घेण्याचे ठरवल्यामुळे हे रिकन्स्ट्रक्शन प्रत्यक्षात आले. आता येस बँक निफ्टीमधून १९ मार्चला बाहेर पडेल. १९ मार्च २०२० पासून येस बँक मॉरिटोरियम मधून बाहेर पडेल. १६ मार्च पासून खरेदी केलेल्या शेअर्सपैकी ७५% शेअर्सला तीन वर्षांचा लॉक -इन पिरियड अँप्लिकेबल होईल. म्हणजेच आज नंतर आपण खरेदी केलेल्या १०० शेअर्सपैकी ७५ शेअर्स आपण ३ वर्षेपर्यंत विकू शकणार नाही.
RBI ने स्पष्ट केले की २३ मार्चपासून US $/रूपी सेल /पर्चेस स्वॅप ऑपरेशन्स सुरु करेल. RBI लवकरच LTRO लॉन्ग टर्म रेपो ऑपरेशन्स सुरु करेल.

RBI ने रेटकट न केल्याने लोकांची निराशा होईल. RBI रेटकट करणार नाही अशी मार्केटला कल्पना आल्यामुळे मार्केट शेवटपर्यंत पडतच राहिले. उद्या फक्त USA च्या मार्केटमधील घडामोडिंचा परिणाम दिसेल. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्केटमध्ये आणखी काही काळ मंदी राहण्याची शक्यता आहे. मार्केटमधील वोलतालीटी कमाल स्तरावर असल्याने कोणताही ट्रेण्ड जास्त वेळ टिकत नाही. आपल्याला ट्रेंड बदलण्याची वेळ साधता आली तर प्रॉफिट होईल पण जर ही वेळ चुकली तर मात्र मोठे नुकसान होऊ शकते. फार सावधानतेने मार्केटमध्ये व्यवहार करायची जरूर आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१३९० NSE निर्देशांक निफ्टी ९१९७ बँक निफ्टी २३१०१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १३ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १३ मार्च २०२०

आज क्रूड US $ ३२.७१ प्रती बॅरल ते US $ ३५.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.८१ ते US $ ७४.४५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५० तर VIX ५९ होते.

दक्षिण कोरियाने शॉर्ट सेलिंगवर ६ महिन्यांसाठी बंदी घातली. चीनच्या सेंट्रलबँक PBOC ने रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशियो काही बँकांसाठी ५० ते १०० बेसीस पाईंट्स कमी केला. ही बातमी आल्यावर मेटलसंबंधीत शेअर्समध्ये खरेदी झाली.
कोरोना व्हायरसची भीती आता जगातल्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. एकामागून एक देश प्रतिबंधक उपाय योजत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.त्यामुळे जगातील बहुतेक देशातील शेअरमार्केटमध्ये मंदी होती.

आज भारतामध्ये शेअरमार्केट खूपच पडली. निफ्टी आणि बँक निफ्टी १० % चे लोअर सर्किट लागले. NSE वरील ट्रेडिंग ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात आले. पुन्हा एकदा प्रीओपन सेशन घेतले गेले. आणि त्यानंतर ‘उंच माझा झोका’ च्या स्टाइलमध्ये मार्केट वर वर जात राहिले. आणि वोलतालीटी हा काय प्रकार आहे हे मार्केटने आज समजावून घेतले. VIX आज ५९ पर्यंत पोहोचले. या वोलतालीटीने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मार्केटमधील परिस्थिती प्रवाही आहे कधीही आपला प्रवाह, दिशा, वेग बदलू शकते. प्रवाहाबरोबर जाण्याची, त्याचा दिशा वेग ओळखण्याची आपल्यात शक्ती असेल तरच प्रवाहात उडी घ्या. अन्यथा मार्केट स्थिरावू द्या आणि मगच उडी घ्या.

येस बँकेची रिकन्स्ट्रक्शन स्कीम आज मंत्रिमंडळाने मंजूर केली. याप्रमाणे SBI Rs १० प्रति शेअर भावाने ७२५ कोटी शेअर्स एवढी गुंतवणूक करेल. SBI चे दोन डायरेक्टर येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असतील. SBI गुंतवणुकीपैकी २६% गुंतवणुकीला ३ वर्षांचा लॉक-इन- पिरियड असेल. LIC आणि इतर संस्थाच्या गुंतवणुकीपैकी ७५% गुंतवणुकीला ३ वर्षांचा लॉक-इन -पीरियड असेल. रिकन्स्ट्रक्शन स्कीम नोटिफाय झाल्यावर ३ दिवसाच्या आत मोरॅटोरियम संपुष्टात येईल. तसेच ७ दिवसांच्या आत येस बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स स्थापन केले जाईल. येस बँकेची ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल Rs ६२०० कोटीपर्यंत वाढवले जाईल.

निर्यातदारांसाठी RODTEP ही सर्व स्थानिक करांचा रिफंड देणारी योजना अमलात येईल.

टाटा सन्स ही टाटा ग्रुपची कंपनी पडत्या मार्केटमध्ये आपल्या ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहे.टाटा सन्सने टाटा पॉवरचे १.३८ कोटी तर इंडियन हॉटेल्सचे १.६५ कोटी शेअर्स खरेदी केले.

अलकेम लॅबच्या बद्दी युनिटच्या १७ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० च्या दरम्यान USFDA ने केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

DGCA ने आज सर्व आंतरराष्ट्रीय भारतीय विमान वाहतूक कंपन्यांना हवाई प्रवासाच्या तिकिटाचे कॅन्सलेशन चार्जेस रद्द करण्यास सांगितले.

२०१४ मध्ये आणलेली न्यू प्राइसिंग स्कीम मंत्रिमंडळाने रद्द करण्यास मंजुरी दिली. ३० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या खत उत्पादन करणाऱ्या प्लान्टला आता Rs ३५० प्रती टन सबसिडी दिली जाईल. तसेच वर्तमान प्लांटचे गॅसबेस्ड प्लान्टमध्ये रूपांतर करण्यासाठी Rs १५० प्रती टन सबसिडी मिळेल.

कर्नाटक राज्यात सर्व मॉल, शाळा तसेच विवाह समारंभ एक आठवड्यासाठी रद्द केले.

GSK कंझ्युमर बरोबरचे डील येत्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

आयकर विभागाने KRBL ची आयकर डिमांड Rs १२७० कोटींवरून Rs १०१.५० कोटी एवढी कमी केली. त्यामुळे शेअर वाढला.

सरकारने टेलिकॉम कंपन्यांना AGR ड्यूज भरण्यासाठी १५ वर्षांची मुदत दिली. त्यामुळे आज टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरमध्ये स्थिरता होती.

फेब्रुवारी २०२० महिन्यासाठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ६.५८ % ( ७.५९% जानेवारी २०२०मध्ये) होता.
जानेवारी २०२० साठी IIP २.०० होता.

आज BPCL ने Rs १६.५० प्रती शेअर, IOC ने Rs ४.२५ प्रती शेअर, CYIENT ने Rs ९ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

आपण SBI कार्डसच्या IPO मध्ये अर्ज केला असला तर linkintime च्या साईटवर जाऊन आपला PAN नंबर,किंवा शेअरअप्लिकेशन नंबर किंवा आपली DPID टाकून आपल्या अर्जाचा अलॉटमेंट स्टॅटस पाहू शकता. सोमवार तारीख १६ मार्च रोजी या शेअरचे लिस्टिंग होईल.शेअर विकायच्या आधी अलॉटेड शेअर्स आपल्या डिमॅट खात्यामध्ये जमा झाले आहेत याचि खात्री करून घ्या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४१०३ NSE निर्देशांक निफ्टी १००२३ बँक निफ्टी २५३४६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १२ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १२ मार्च २०२०

आज क्रूड US $ ३३.५९ प्रति बॅरल ते US $ ३४.२८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.६५ ते US $ १=Rs ७४.२५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०९ तर VIX ४२ होते.

आज USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी UK सोडून यूरोपातील इतर देशातील लोकांना USA मध्ये येण्यावर १ महिन्यासाठी बंदी घातली. जगातील निरनिराळ्या देशातील सरकारांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी पॅकेजिस जाहीर केली.
WHO ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ने कोरोना व्हायरसला ‘महामारी ( पँडेमिक) जाहीर केले. भारत सरकारने इशू केलेले सर्व व्हिसा १ महिन्यासाठी स्थगित ठेवले. भारत सरकारने या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब केला आहे. देशात १५ नवीन टेस्टिंग लॅब सुरु केल्या.

जगात सर्वत्र चालू असलेल्या प्रतिबंधक उपायांना दाद न देता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेअरमार्केटने ह्या सर्व परिस्थतीचा धसका घेतला आणि भीतीने आपली जबरदस्त पकड मार्केटवर बसवली. त्यातच FII सतत विक्री करत आहेत. त्यामुळे मार्केट गॅप डाऊन उघडले आणी नंतर पडतच राहिले. सर्व क्षेत्रातील, सर्व प्रकारचे (लार्जकॅप,मिडकॅप, स्माल कॅप,) शेअर्स आपापल्या किमान किमतीकडे वाटचाल करत होते. IT सेक्टर, मेटल सेक्टर, एव्हिएशन, फायनान्सियल सेक्टर आणि ज्या कंपन्यांचा आयात निर्यात व्यापाराशी संबंध आहे अशा सर्व कंपन्यांचे शेअर पडले. ज्या कंपन्यांचे शेअर्स कोणत्याही ट्रिगरशिवाय प्रमाणाबाहेर वाढत होते त्याची प्रमाणाबाहेर वाढलेली किंमत प्रथम या मंदीचे लक्ष्य ठरली.

आज वोलतालीटीच्या निर्देशांकाने म्हणजेच VIX ने ४२ ची मर्यादा ओलांडली. हा मार्केटने इन्व्हेस्टर, ट्रेडर्स यांना दिलेला इशारा आहे. मार्केटमध्ये एक विशिष्ट ट्रेण्ड निश्चित होईपर्यंत सावध रहा. मार्केट कधीही दिशा आणि वेग बदलू शकते.
आपणही मार्केट पडत आहे म्हणून खरेदी करण्याची घाई करू नका. मार्केट सतत इंट्राडे लोअर हाय आणि लोअर लो बनवत राहिले. हा मार्केटचा ट्रेंड थोडातरी स्लो झाला पाहिजे. आपल्याजवळील फंडामेंटली स्ट्रॉन्ग शेअर विकू नका. तसेच स्वस्तात मिळत आहेत म्हणून कोणतेही शेअर्स पदरात बांधून घेऊ नका. ज्या कंपन्यांना खूप प्रमाणात कर्ज आहे किंवा ज्यांचे शेअर्स तारण म्हणून ठेवले आहेत अशा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे टाळा. स्वस्थ रहा निरीक्षण करा आणि आणि फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स विकत घ्या. छोट्या छोट्या लॉटमध्ये विकत घ्या. म्हणजे शेअर पडत राहिला तरी तुम्हाला खालच्या लेव्हलवर खरेदी करण्यासाठी पैसे राहतील. आपल्या स्वतःच्या पैशातूनच खरेदी करा.मार्जिन फंडिंग किंवा लिव्हरेज करू नका. कारण ही मंदी किती दिवस टिकेल आणि किती मर्यादेपर्यंत जाईल हे सांगणे कठीण आहे असे तद्न्यांचे मत आहे. आपला पोर्टफोलिओ घडवण्यासाठी हा योग्य समय आहे. जे शेअर्स आपल्या ऐपतीच्याबाहेर आहेत असे वाटत होते ते आता खरेदी करणे आपल्याला शक्य होईल.

क्रूडचा कमी होणारा दर पेंट्स, केमीकल उद्योग, स्पेशालिटी केमिकल्स आदी क्षेत्राना फायदेशीर आहे या क्षेत्रातील कंपन्यांवर लक्ष ठेवा. क्रूडच्या कमी होणाऱ्या दराचा फायदा मिळण्यासाठी रुपयांची होणारी घसरण थांबली पाहिजे.
स्पाईस जेट या कंपनीने डोमेस्टिक प्रवास आणि आतंरराष्ट्रीय प्रवास यासाठी Rs ९८७ आणि Rs ३६९९ मध्ये ऑफर दिली आहे. फक्त याचे बुकिंग १२ मार्च २०२० ते १५ मार्च २०२० दरम्यान झालेले असले पाहिजे.

शनिवारी GST कौन्सिलची मीटिंग आहे. यात मोबाईल, फुटवेअर यावरील GST चा विचार केला जाईल.

मार्केटकडे सरकार आणि RBI चे लक्ष आहे. सरकार ज्या उद्योगांची सप्लाय चेन संकटात आहे अशा उद्योगांना मदत करण्याची शक्यता आहे. परतफेडीचे नियम सोपे करण्याची शक्यता आहे. MSME सेक्टरला मदत करण्यावर जास्त भर दिला जाईल. RBI आणि सरकार लिक्विडीटी इंजेक्ट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

भारत फोर्ज या कंपनीने १० वर्ष सर्व्हिस झालेल्या लोकांसाठी VRS जाहीर केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२७७८ NSE निर्देशांक निफ्टी ९५९० बँक निफ्टी २३९७१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ११ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ११ मार्च २०२०

आज क्रूड US $ ३८.५३ प्रती बॅरल ते US $ ३८.८७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.६४ ते US $ ७३.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०० तर VIX ३२.४० होता.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पे रोल करात सवलत देण्याची घोषणा केली.

इटली, USA,UK, ऑस्ट्रेलिया या देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे.

रशियाने सौदी अरेबिया आणि ओपेक + देशांशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली.

आता क्रूडचे उत्पादन US $ १३ मिलियन एवढे होईल. यामुळे क्रूडच्या दरात वाढ होण्याची शक्यता मावळली .

बँक ऑफ ईंग्लंड आपल्या दरात ०.५०% कपात केली. आता या बँकेचा व्याजाचा दर ०.२५% एवढा राहील. SME साठी नवीन फंडिंग स्कीम आणि सवलती जाहीर केल्या.

२००८ मध्ये एवढ्या प्रमाणावर मार्केट पडायला ९ महिने लागले होते. या वेळी फक्त २५ सेशन्स लागले. यावेळी मार्केट पडायचा वेग खूप होता. ही पडझड १०२०० ते १०००० या दरम्यान थांबेल असा तद्न्यांचा अंदाज आहे.

येस बँकेत स्टेट बॅंकेसकट इक्विटी फंड्स, P. E . फंड्स, HDFC ग्रुप आणि ICICI ग्रुप ,राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमाणी इत्यादी गुंतवणूकदार Rs ५००० ते Rs ७००० कोटींची गुंतवणूक करतील.

टाटा मोटर्स,मारुती, महिंद्रा यांनी आपल्या मॉडेल्सवर सूट देण्यास सुरुवात केली.

श्रीराम ट्रान्सपोर्टला ED ने वॉरंट इशू संबंधात दंड केला.

HBL पॉवर सिस्टिम्सला त्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी Rs १९० कोटींची काँट्रॅक्टस मिळाली.

कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी वॉन्डरेला हॉलिडेजचे पार्क बंद राहतील.

वेगवेगळ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी प्रीमियममध्ये १० % वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा ICICI लोंबार्ड, न्यू इंडिया अशुअरंस यांना होईल.

कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी ट्रॅव्हल अडवायझरीज जाहीर केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून हवाई प्रवास करणार्याची संख्या कमी होत आहे. त्यामुळे कमी होणारे क्रूडचे दर आणि कमी होणारी प्रवाशांची संख्या यांचे परस्पर विरोधी परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांवर होतील. उदाहरणार्थ स्पाईसजेट,इंडिगो .
विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना क्रूड दर कमी होण्याचा किती फायदा होईल हे ठरवण्यासाठी लोड फॅक्टर आणि क्रूडचा दर या दोन्हींचाही विचार करावा लागेल. ७३% च्यापेक्षा लोड फॅक्टर कमी झाला तर क्रूडमधील मंदीचा उपयोग या कंपन्यांना होणार नाही.

नारायण हृदयालयाने आपले बंगलोर युनिट बंद केले.

ABB इंडिया आपला सोलर इन्व्हर्टर बिझिनेस विकणार आहे.

ONGC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आता लाभांशावर विचार करण्यासाठी १६ मार्च २०२० रोजी होईल.

BARING इंडिया ने मन्नापुरम फायनान्स मधील आपली हिस्सेदारी कमी केली.

बजाज ऑटोने DOMINAR २५० हे मॉडेल लाँच केले.

PI इंडस्ट्रीजने आपल्या गुजरात युनिटचे काम सुरू केले.

बंधन बँकेने १५ राज्यात १२५ शाखा उघडल्या.

आयचर मोटर्सने Rs १२५, टी सी एस ने Rs १२, तर सुंदरम क्लेटन ने Rs ३१ अंतरिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६९७ NSE निर्देशांक निफ्टी १०४५८ बँक निफ्टी २६४८७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ९ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ९ मार्च २०२०

आज क्रूड US $ ३३.०० प्रती बॅरल ते US $ ३६.२२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.९५ ते US $ १ =Rs ७४.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.२५ तर VIX ३२.३० होता.

आज USA मध्ये कोरोना व्हायरस पसरल्याची, इटलीने आपल्या देशाचा उत्तर भाग पूर्णपणे क्वारंटाईन केला अशी बातमी आली. भारतातही केरळमध्ये ३ नव्या केसेस आढळून आल्या.

NSE नी सर्व ब्रोकर्सना त्यांनी मार्जिन साठी दिलेल्या येस बँकेच्या मुदत ठेवी, गॅरंटी, शेअर्स इत्यादीच्या ऐवजी दुसर्या सिक्युरिटीज द्यायला सांगितल्या.

ओपेक+ मध्ये रशिया आणि अरब देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे तेलाच्या उत्पादनात कपात करण्यावर एकमत होऊ शकले नाही. ओपेक+ ने १५ लाख बॅरल कपातीचा प्रस्ताव दिला होता. रशियाने उत्पादनात कपात करायला नकार दिला. सौदी अरेबियाची कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन कमी असल्यामुळे त्यांनी क्रूडच्या किमतीमध्ये डिस्काउंट द्यायला सुरुवात केली. सौदी अरेबिया एप्रिल २०२० मध्ये उत्पादनात वाढ करून १० MBPD उत्पादन करेल. या सर्व घटनाक्रमामुळे आज क्रूड US $ ३२ प्रती बॅरल एवढे कमी झाले.

YES बँकेत स्टेट बँक ऑफ इंडिया Rs १० प्रती (कमीतकमी किंमत) शेअर या किमतीला ४९% स्टेक घेईल. येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे पुनर्गठन केले जाईल. यावर दोन SBI आणि एक RBI पुरस्कृत डायरेक्टर असेल. येस बँकेच्या ऍडमिनिस्ट्रेटरने सांगितले की या शनिवारपासून येस बँकेच्या शाखामध्ये पूर्ववत कामकाज सुरु होईल. विथड्रॉव्हलवर घातलेली Rs ५०००० ची मर्यादाही उठवली जाईल. स्टेट बँकेचे इतर गुंतवणूकदार शोधण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत. डिपॉझिट धारकांचे डिपॉझिट पूर्णपणे सुरक्षित राहील असे सांगितले.

याच बरोबर येस बँकेच्या माजी प्रमोटरच्या चालू असलेलया चौकशीच्या प्रगतीच्याही बातम्या येत होत्या. येस बँकेमध्ये शेअर्सच्या स्वरूपात, टायर १ टायर II बॉण्ड्सच्या स्वरूपात वेगवेगळ्या बँकांचे, इन्शुअरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड याचे एक्स्पोजर आहे. यामध्ये इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स मॅक्स फायनान्शियल, SBI PF, HDFC लाईफ यांचा समावेश आहे.
या सर्व उलटसुलट ( काही चांगल्या काही वाईट) बातम्यांमुळे मार्केट पडतच गेले. जणू काही प्रलय जवळ आला आहे अशा भीतीने प्रॉफिट बुकिंग झाले. यात सर्वात जास्त नुकसान बँक निफ्टीमध्ये झाले. सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका , खाजगी बँका या मुख्यतः पडझडीच्या वाटेकरी होत्या. आज वोलतालीटी निर्देशांक VIX कमाल स्तरावर होता.
आणि मग सर्वच क्षेत्रात ही पडझड पोहोचली. बँक नीफटीमध्ये सुरू झालेली पडझड सर्व क्षेत्रांना व्यापून राहिली. कोणताही अपवाद राहिला नाही.

इंडसइंड बँकेची टायर १ बॉण्ड्स इशूवर विचार करण्यासाठी बैठक होती. पण मार्केटमधील वातावरण बघता इंडस इंड बँकेने ही मीटिंग पुढे ढकलली.

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये बॉण्ड्सच्या स्वरूपात Rs ८३० कोटींची भांडवली गुंतवणूक करेल.
कॅडीला हेल्थ केअरच्या बद्दी युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

अमर राजा बॅटरी Rs ५ प्रती शेअर, AIA इंजिनीअरिंग Rs २७ प्रती शेअर, वेस्ट कोस्ट पेपर Rs ५ प्रती अंतरिम लाभांश जाहीर केला.

लक्ष्मी विलास बँक घेण्यात कोटक महिंद्रा बँकेला स्वारस्य आहे. त्यांनी RBI कडे या बाबतीत आपला प्रस्ताव पाठवला आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६३४ NSE निर्देशांक निफ्टी १०४५१ बँक निफ्टी २६४६२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ६ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ६ मार्च २०२०

आज क्रूड US $ ४९.०२ प्रती बॅरल ते US $ ४९.४९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.७० ते US $१=Rs ७४.०५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०५ तर VIX २६.०९ होते.

आज RBI ने येस बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सस्पेंड केले आणि व्यवस्थापन ऍडमिनिस्ट्रेटरकडे सोपवले. स्टेट बँकेचे CFO या मार्केट सेगमेंट मधून बाहेर होईल. बेजबाबदार कर्ज वाटप, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उल्लंघन आणि अपुरे भांडवल, वाढते NPA ही कारणे यामागे होती. ३ एप्रिल २०२० पर्यंत कॅश विथड्रॉलवर Rs ५०००० ची मर्यादा घातली. या नियमित Rs ५०००० बरोबर जर मुलांच्या शिक्षणासाठी, लग्न,आजारपण यासारखे मोठे खर्च निघाले तर अर्ज करून Rs ५०००००/- पर्यंत पैसे मिळतील असे जाहीर केले.  येस बँकेसारख्या ४ नंबरवर असलेल्या खाजगी बँकेमध्ये RBI ने ही कारवाई केल्यावर मार्केटमध्ये हाहाकार माजला. येस बँकेच्या शेअरला खालची सर्किट लागायला सुरुवात झाली. बँक निफ्टीच्या मेम्बर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने बँक निफ्टी सपाटून पडली. इतरही निफ्टी शेअर्समध्ये विक्री सुरु झाल्यानं निफ्टी १०८५० पर्यंत खाली आला. परंतु मार्केट चालू असतानाच बातमी आली की केंद्र सरकार आणि RBI यांचे बँकेच्या रेझोल्यूशन प्लानवर काम सुरु आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दोन तीन दिवसात हा रेझोल्यूशन प्लॅन RBI जाहीर करेल. या प्लॅननुसार SBI आणि LIC प्रेफरंशियल अलॉटमेंटच्या रूटने प्रत्येकी २४.५% स्टेक येस बँकेमध्ये सेबीच्या नियमानुसार ठरवलेल्या किमतीवर घेईल. यानंतर येस बँकेचा राईट्स इशू आणला जाईल आणि SBI आणि LIC बरोबरच इतर गुंतवणूकदारांनाही इशूमध्ये सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन केले जाईल. यामध्ये ओपन ऑफर आणण्याची आवश्यकता असणार नाही.

या बातमीनंतर मार्केटमध्ये पुन्हा खरेदी व्हायला सुरुवात झाली. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी मार्केटची फाल्गुनमासात अवस्था झाली. कोरोना व्हायरसची भीती थोडी मागे टाकायला सुरुवात केली असतानाच येस बँकेचे संकट उद्भवले.

आज मार्केट संपल्यानंतर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येस बँकेच्या डिपॉझिटर्सना दिलासा दिला की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. RBI ने बनवलेला रेझोयुशन प्लॅन ३ एप्रिल २०२० पर्यंत अमलात आणला जाईल. बँकेचे दैनिक काम सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल.

मॅक्स फायनान्सियल या कंपनीचे येस बँकेमध्ये टायर II बॉण्ड्सच्या स्वरूपात Rs २००० कोटींचे एक्स्पोजर आहे. त्यामुळे हा शेअर खूपच पडला.

अडानी पोर्ट्सचा दिघी पोर्टसाठी रेझोल्यूशन प्लान NCLT नी मंजूर केला.

आज टेलिकॉम कंपन्यांनी AGR ड्यूजची सेल्फअसेसमेंट डॉटला सादर केली. त्यानुसार व्होडाफोन आयडियाची AGR ड्यूजची बाकी Rs २१५३३ कोटी असून बाकी त्यावरील व्याज आणि दंड आहे असे कंपनीने डॉटला कळवले.

आज सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या मर्जरचे स्वॅप रेशियो जाहीर झाले

  • युनियन बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक – आंध्र बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १०००  शेअर्सला युनियन बँकेचे Rs १० दर्शनी किमतीचे ३२५ शेअर्स मिळतील. कॉर्पोरेशन बँकेच्या Rs २ दर्शनी किमतीच्या १००० शेअरला युनियन बँकेचे Rs १० दर्शनी किमतीचे ३३० शेअर्स
  • PNB युनायटेड बँक आणि OBC – OBC च्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअर्सला PNB चे Rs २ दर्शनी किमतीचे ११५० शेअर्स. युनायटेड बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअर्सला PNB चे Rs २ दर्शनी किमतीचे १२१ शेअर्स.
  • कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक – सिंडिकेट बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअर्सना  कॅनरा बँकेचे Rs १० दर्शनी किमतीचे १५८ शेअर्स.
  • अलाहाबाद आणि इंडियन बँक – अलाहाबाद बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअर्सला इंडियन बँकेचे Rs १० दर्शनी किमतीचे ११५ शेअर्स.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने Rs ५.९६ प्रति शेअर तर हॅवेल्सने Rs ४ प्रती शेअर्स अंतरिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५७६ NSE निर्देशांक निफ्टी १०९८९ बँक निफ्टी २७८०१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ५ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ५ मार्च २०२०

आज क्रूड US $ ५०.७९ प्रती बॅरल ते US $ ५१.९४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.१६ ते US $१= Rs ७३.४४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.१५ आणि VIX २३.९० वर होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन युनियन संमेलनाला भेट देण्याचे रद्द केले. हे संमेलन बेल्जीयममधील ब्रुसेल्स येथे होणार होते.

USA सरकार N-९५ प्रकारचे ५० कोटी मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ज खरेदी करणार असल्याची शक्यता आहे . त्यामुळे या मास्कशी संबंधित ३M इंडिया आणि हनीवेल ऑटोमेशन या शेअर्समध्ये तेजी आली. कॅलिफोर्नियामध्ये इमर्जन्सी जाहीर केली.

इंटरनॅशनल मॉनेटरी फंड कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करण्यासाठी गरजू देशांना Rs ५००० कोटींची मदत जाहीर केली.

स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेमध्ये स्टेक विकत घेणार आहे. स्टेट बँक आणि LIC येस बँकेमध्ये Rs ६००० कोटींचा स्टेक घेऊ शकते. स्टेट बँकेने सांगितले की हि गुंतवणूक आम्ही फायनान्सियल इन्व्हेस्टमेंट म्हणून करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ४९% पेक्षा जास्त स्टेक घेणार नाही. सरकारने SBI ला यासाठी कन्सॉरशियम बनवायला सांगितले आहे. SBI च्या रेस्क्यू प्लानला सरकार मंजुरी देण्याची शक्यता आहे. सरकारच्या मते या प्लॅननुसार येस बँकेच्या डिपॉझिटर्सच्या हिताचे रक्षण होईल. SBI Rs ४९० कोटींचे Rs २ प्रती शेअर या भावाने प्रेफरंशियल शेअर्स घेईल. स्टेट बँकेला ओपन ऑफर आणण्यापासून सूट मिळण्याची शक्यता आहे.

ICRA ने JSW स्टीलचे रेटिंग AA वरून AA- केले.

SBI ने Rs ५८० कोटींचे ३५ NPA तर युनायटेड बँक ऑफ इंडियाने Rs १३३४ कोटीचे २२ NPA विकण्यासाठी बोली मागवल्या आहेत.

टाटा पॉवरचा मुंद्रा प्लांट विजेचे दर न वाढलामुळे गेली ७ वर्षे तोट्यात चालत आहे. टाटा पॉवर विजेचे दर वाढवण्यासाठी आणि कॉमन PPA करण्यासाठी ५ राज्यांबरोबर बोलणी करत आहे. टाटा पॉवर त्यांची परदेशातील मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे.

ROSHA ACTEMRA या कोरोना व्हायरसवरील औषधाला चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने मंजुरी दिली. हे औषध भारतात सिप्ला विकते.

अडानी पोर्टने Rs ३.२० प्रती शेअर तर प्राज इंडस्ट्रीजने Rs २.७० प्रति शेअर, गॉडफ्रे फिलीप्सने Rs २४ प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

JLR आणि टाटा पॉवर यांच्यात EV चार्जिंग स्टेशनसाठी करार झाला.

कर्नाटक सरकारने भारतात बनणाऱ्या परदेशीय मद्यार्कावर जादाची एकसाईझ ड्युटी लावली.

HDB फायनान्सियल सर्व्हिस या HDFC च्या सबसिडीअरीचा IPO लवकरच आणण्यात येईल.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी ०६/०३/२०२० रोजी बैठक आहे. या अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट १७ मार्च २०२० आहे.

झायडस वेलनेसने कीडनी रिप्लेसमेंटचे नवीन औषध शोधले. हे औषध नॉनअल्कोहोलिक रुग्णाला उपयोगी पडेल.

निरव मोदींची काही आर्टस् कलेक्शन तसेच कार्स आदी मालमत्ता विकून आलेला पैसा PNB च्या कर्जफेडीसाठी उपयोगात आणला जाईल.

SBI कार्ड्सचा IPO २६.२२ वेळेला ओव्हर सबस्क्राईब झाला. रिटेलर्स कोटा २,४९ पट ओव्हर सबस्क्राईब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८४७० NSE निर्देशांक निफ्टी ११२६९ बँक निफ्टी २८८१५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ४ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ४ मार्च २०२०

आज क्रूड US $ ५१.६७ प्रती बॅरल ते US $ ५२.७५ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९० ते US $१= ७३.४६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२२ तर VIX २५.४८ होते.

आज USA ची सेंट्रल बँक फेडने आपल्या दरात ०.५०% ची कपात केली. आता हे दर १% -१.२५% या दरम्यान असतील. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेला निर्माण झालेला धोका आणि अर्थव्यवस्थेत लिक्विडीटी इंजेकट करण्याची जरुरी आहे असे मत फेडने व्यक्त केले. त्याच बरोबर USA मध्ये आयकरातही सवलत दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे USA च्या मार्केट्स मध्ये तेजी होती.

हॉन्गकॉन्गच्या HKMA (हॉन्गकॉन्ग मॉनेटरी ऑथॉरिटी) ने ०.५०% रेटकटची घोषणा केली. आता हा रेट १.५०% राहील. या पाठोपाठ UK, फ्रांस, जर्मनी या देशांनीही या संबंधात विचार करण्यासाठी अनुकूलता दाखवली.

सतत कमी होत असलेल्या क्रूडच्या दरावर उपाययोजना करण्यासाठी ओपेक+ देशांची व्हिएन्ना मध्ये उद्या मिटींग आहे .
जगभरात १२ कंपन्या कोरोना व्हायरससाठी औषध आणि लस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

चीन मध्ये उत्पादन बंद झाल्यामुळे ऑटो, फार्मा , इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अडचणी उत्पन्न होण्याची शक्यता आहे . चीनचा सर्व्हिस PMI फेब्रुवारी २०२० महिन्यासाठी २६.५% ( जानेवारीत ५१.८%) झाला. चीनमधील ऑटोविक्री ८०% कमी झाली.
दक्षिण कोरियाने US $ ९.८ बिलियनचे लिक्विडिटी पॅकेज जाहीर केले.

वर्ल्ड बँकेने प्रगतीशील देशांकरता कोरोनाचा सामना करण्याकरता US $ १२०० कोटींचे पॅकेज जाहीर केले.

एकूणच काय कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करण्याकरता जग सिद्ध होत आहे. भारतानेही आपापल्या परीने कोरोना संकटाचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. सिंगापूर, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात येईल. दक्षिण कोरिया, इटली, जपान,चीन, हॉन्गकॉन्ग या देशात शक्यतो प्रवास करू नये. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक सेल्फडिक्लरेशन देणे अनिवार्य केले.

सरकारने API चे आपल्या देशातीळ उत्पादन वाढवण्यासाठी Rs ३००० कोटींचे पॅकेज जाहीर केले.

प्रत्यक्ष कराचे कलेक्शन आतापर्यंत Rs ७.५२लाख कोटी झाले.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे चार बँकांमध्ये मर्जरला मंजुरी देण्यात आली. ही मर्जर्स १ एप्रिल २०२० पासून अमलात आणण्यात येतील.

डोमेस्टिक भारतीय कंपन्यांचे परदेशी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग होऊ शकेल.

एअर इंडियामध्ये १००% FDI परवानगी दिली. एअर इंडियाच्या विक्रीआड येणाऱ्या अटी सोप्या केल्या.

भारतातील सर्व्हिस PMI ५५.५० वरून ५७.५० इतका वाढला.

कंपनी लॉ मधील क्रिमिनल रेस्पॉन्सिबिलिटीज निश्चित करणाऱ्या कलमात सुधारणा मंजूर केल्या.

HAL या कंपनीला इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कमिटीकडून REUG ऐरोस्पेस या कंपनीबरोबरच्या अग्रीमेंटच्या अटींचे उल्लंघन कारण्यासाठी US $ २१९ कोटीची नोटीस मिळाली.

२७ मार्च २०२० पासून गोदरेज प्रॉपर्टीज F & O मार्केटमध्ये समाविष्ट होईल.

IRB इंफ्राच्या प्रमोटर्सनी १०% शेअर्स तारण म्हणून ठेवले.

झी एंटरटेनमेंट ला कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संबंधात सेबीकडून नोटीस मिळाली.

BASF या कंपनीला कर्नाटक आयकर विभागाकडून Rs २६० कोटींची नोटीस मिळाली. कंपनीने आम्ही या विरुद्ध अपील करणार आहोत असे सांगितले.

सन फार्माच्या प्रमोटर्सनी कंपनीचे २० लाख शेअर्स खरेदी केले. सन फार्माला सॅन्डोज या कंपनीला प्राईस फ़िक्सिन्ग बाबतीतील केसच्या संदर्भात US $ ९.५ कोटी द्यायचे आहेत.

NCLT ने NBCC ला जे पी इन्फ्रा खरेदी कारण्याची परवानगी दिली. (रेझोल्यूशन प्लान मंजूर केला.)

टाटा मोटर्सची फेब्रुवारी महिन्याची JLR USA विक्री ११३३२ युनिट्स ( ११६१६) झाली.

जॅग्वार USA विक्री २७३९ युनिट्स झाली ( ३४६५), तर लँडरोव्हरची USA विक्री ८५९३ युनिट्स झाली ( ८१५१) कंसातील आकडे आधीच्या महिन्याचे आहेत.

ONGC च्या डायरेक्टर्सची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी मीटिंग ११ मार्च २०२० रोजी होईल.

चंबळ फर्टिलायझर्सने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. अपोलो टायर्स आणि एक्झाईड आजपासून एक्स डिव्हिडंड झाले.

टाटा ग्लोबल बिव्हरेजीसला आपला कन्झ्युमर बिझिनेस ट्रान्स्फर केल्यानंतर आज टाटा केमिकल्सचे रिलिस्टिंग झाले. टाटा केमिकल्सच्या १ शेअरमागे टाटा ग्लोबल बिव्हरेजीसचा १.४ शेअर टाटा केमिकल्सच्या शेअर होल्डर्सना मिळेल.

मार्केटमध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या बातम्या येत असतात. वाईट बातमी आल्यावर शेअरमध्ये विक्रीचा दबाव येणे साहजिक आहे .पण चांगली बातमी येऊन शेअर वाढला तरी सेल ऑन राईज या तत्वाप्रमाणे विक्री झाल्यामुळे शेअर आणखी पडतो. आता याला फंडामेंटलीं मजबूत शेअर्सचा अपवादही राहिला नाही. जेथे प्रॉफिट होत असेल तेथे भीतीमुळे लोक शेअर्स विकत आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८४०९ NSE निर्देशांक निफ्टी ११२५१ बँक निफ्टी २८६५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३ मार्च २०२०

आज क्रूड US $ ५२.४१ प्रती बॅरल ते US $ ५३.०९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= ७२.६१ ते US $१=Rs ७३.०९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४१ तर VIX २५.४० होते.

G-७ देशांच्या बैठकीत कोरोना व्हायरस आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम यांच्या बाबतीत विचार विमर्श केला जाईल. यात या देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकांचे प्रमुख हजार असतील. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी फेडला जास्त रेटकट करायला सांगितले आहे.

भारतातही कोरोना व्हायरस हळू हळू पाय पसरायला लागला आहे. भारताने ४ देशांकरता ट्रॅव्हल अडवायझरी जाहीर केली आहे. DGFT ने २६ API ( ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटस) च्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यात पॅरासेटामॉल, व्हिटामिन B १, B६ आणि B १२ तसेच TRINIDAZOL आणि METRONIDAZOL या औषधांचा समावेश आहे. या निर्यात बंदीचा तोटा फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जीन वर होईल. कारण डोमेस्टिक विक्रिमध्ये निर्यातीएवढे मार्जिन नसते. याचा परिणाम DR रेडीज. ल्युपिन, विनती ऑर्गनिक्स, ग्रनुअल्स, JB केमिकल्स यांच्या वर होईल.

फायझर या कंपनीने आपल्याला एक नवीन कंपाऊंड अलग करण्यात यश आले असून ते कोरोना व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी उपयोगी ठरेल अशी शक्यता आहे असे सांगितले. कंपनीने R & D साठी थर्ड पार्टी बरोबर करार केला आहे. या महिन्याअखेर याबाबतीत निर्णय होऊ शकेल. या बातमीनंतर फायझरचा शेअर ब्ल्यू स्काय टेरीटरीत गेला.

SBI कार्ड्सच्या IPO वर एकंदर मार्केटमधील वातावरणाचा प्रभाव दिसून आला. दुसर्या दिवशीपर्यंत हा IPO ८८% भरला. ग्रे मार्केटमधील प्रीमियमही कमी झाला. कोरोना व्हायरसच्या बाबतीत चिंता वाढत आहे अशावेळी आपण थोडी वाट पाहून IPO ला मिळत असलेल्या प्रतिसादावर लक्ष ठेवून ५ मार्च २०२० ह्या रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव ठेवलेल्या दिवशी
अर्ज करावा.

आज सेबीने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, IRFC, आणि होम फर्स्ट फायनान्स कंपनी यांच्या IPO ला मंजुरी दिली.
वोडाफोन आयडियाने Rs ३०४३ कोटी डिफर्ड स्पेक्ट्रम ड्यूज भरले. टाटा कम्युनिकेशनने Rs २००० कोटी AGR ड्यूज भरले. रिलायन्स JIO ने जानेवारी २०२० पर्यंतचे Rs १९५ कोटी AGR ड्यूज भरले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६२३ NSE निर्देशांक निफ्टी ११३०३ बँक निफ्टी २९१७७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ मार्च २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २ मार्च २०२०

आज क्रूड US $ ५१.२४ प्रती बॅरल ते US $ ५१.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.२१ ते US $१=Rs ७२.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६० होता तर VIX २६.१२ होते.

कोरोना व्हायरस ६३ देशात पसरला. चीनपेक्षा इतर देशात या व्हायरसचा प्रादुर्भाव आता जास्त झाला आहे. पण बघता बघता कोरोना व्हायरसचे संकट आपल्या देशाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. भारतात तीन केसेस पॉझिटिव्ह आढळल्या भारत सरकारनेही इराण, इटली, कोरिया, सिंगापूर या देशात अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा अशी ट्रॅव्हल अडवायझरी जाहीर केली.

सकाळी USA ची सेंट्रल बँक फेडने येत्या वित्तीय वर्षात एक जादा रेटकटचा विचार केला जाईल असे जाहीर केल्यामुळे USA ची मार्केट्स वाढली. त्याचप्रमाणे चीनची सेंट्रल बँक PBOC आणि जगभरातल्या सेंट्रल बँकांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडीटी इंजेकट करू असे सांगितल्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्येही तेजी आली. पण मार्केटच्या वेळेमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह केसेस मिळाल्या अशी बातमी आल्यामुळे मार्केटने पुन्हा घुमजाव केले आणि मार्केट सपाटून पडले. जशी कोरोना व्हायरस दिल्लीला पोहोचल्याची बातमी आली तसे सेन्सेक्स ९३९ पाईंट कोसळले.

ऊर्जा मंत्रालयाने पॉवर ग्रीड, NTPC, PFC या कंपन्यांमधील सरकारी स्टेक विकण्यास नकार दिला. अर्थ मंत्रालयानी ऊर्जा मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला.

GST चे मासिक कलेक्शन गेले तीन महिने Rs १ लाख कोटींवर होते.

RBI नी इंडिया बुल्स व्हेंचरला क्लीन चिट दिली.

एशियन ग्रॅनाइट्स ८ कंटेनर भरून टाईल्स निर्यात करेल.

आज पासून SBI कार्ड्सचा IPO ओपन झाला. मार्केटचा मूड बिघडल्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. IPO पहिल्या दिवशी ३९% भरला.

अटोनी वेस्ट हँडलिंग सेल कंपनीचा Rs २०६ कोटींचा IPO ४ मार्च २०२० रोजी ओपन होऊन ६ मार्चला बंद होईल. IPO चा प्राईस बँड Rs २९५ ते Rs ३०० असून मिनिमम लॉट ५० शेअर्स असेल. ही कंपनी गेल्या १७ वर्षात म्युनिसिपल WASTE मॅनेजमेंट कार्यरत आहे. ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे.

तिसऱ्या तिमाहीमध्ये GDP ग्रोथ रेट ७ वर्षाच्या किमान स्तरावर म्हणजे ४.७ % वर होता.

मार्केट्मध्ये आपण व्यवहार करत असाल तर सावधगिरी बाळगा. मार्केट्मध्ये वोलतालीटी खूप आहे. काही दिवस ट्रेडिंगपेक्षा गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केल्यास बरे. मार्केट पडत असताना जसे चांगल्या कंपन्यांचे शेअर छोट्या छोट्या लॉटमध्ये स्वस्तात खरेदी करावेत. तसेच जर तुमच्या पोर्टफोलिओत चांगल्या कंपनीचे शेअर्स असतील तर ते या शेअर्सची किंमत कमी झाली तरी विकू नका.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८१४४ NSE निर्देशांक निफ्टी १११३२ बँक निफ्टी २८८६८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!