Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३० एप्रिल २०२०
आज क्रूड US $ २३.९१ प्रती बॅरल ते US $ २४.९५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.९७ ते US $१=Rs ७५.६८ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९९.६० आणि VIX ३३.५० होती..
USA मध्ये क्रूडचे उत्पादन कमी झाले आहे. रशियाने सुद्धा उत्पादनात १३% कपात केली आहे. त्यामुळे आणि काही देशात अर्थव्यवस्था ओपन होत असल्यामुळे क्रुडमध्ये तेजी आली.
GILEAD सायन्सेस या कंपनीने ‘REMDESIVIR’ च्या ट्रायलचे रिझल्ट सकारात्मक आले असे सांगितले. अँटीव्हायरस औषधाच्या (API आणि फॉर्म्युलेशन) च्या क्लिनिकल ट्रायलला DGCA ने परवानगी दिली.ग्लेनमार्क फार्मा, सिप्ला, DR रेड्डीज यांनी GILEAD सायन्सेस बरोबर ‘REMDESIVIR’ या औषधाच्या जनरिक व्हर्जनसाठी करार केला.
ल्युपिनच्या पीठमपुर प्लांटसाठी USFDA ने VAI स्टेटस दिला.
टाटा मोटर्स च्या JLR च्या उत्पादनात चीनमध्ये ७५% सुधारणा झाली. आज टाटा मोटर्सला २०% चे अपर सर्किट लागले.
बँकांच्या बाबतीत प्रमोटर्स होल्डिंग नॉर्म्सच्या संबंधित नियमात RBI सवलत देण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कोटक महिंद्रा बँक आणि बंधन बँक या दोन बँकांवर होईल.
M & M फायनान्स ने त्यांचा AMC बिझिनेस विकण्याची तयारी सुरु केली आहे.
स्ट्राईड फार्माने ‘FAVIPIRAVIR’ टॅब्लेट्स डेव्हलप केल्या आहेत आणि आता ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करत आहे. यामुळे COVID १९ च्या आजाराचा काळ कमी होतो आणि फुफ्फुसांच्या परिस्थितीत सुधारणा होते.
SIDBI ने ५ कोटींपेक्षा कमी कर्ज घेतलेल्या MSME साठी इमर्जन्सी क्रेडिट लाईनचा प्लान तयार केला आहे. वर्किंग कॅपिटल लोनच्या १०% ते १५% रक्कम इमर्जन्सी लोन म्हणून दिली जाईल. या इमर्जन्सी लोनचा उपयोग कर्मचारी आणि कामगारांचा पगार देण्याकरता करावा लागेल. या लोनसाठी सरकार गॅरंटी देईल.
कॅडीला हेल्थकेअरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने WINDLAS हेल्थकेअरमधील ४९ % स्टेक विकायला परवानगी दिली.
स्पाईस जेट या कंपनीने सांगितले की ते कोणत्याही कामगाराला नोकरीवरून काढणार नाहीत. सर्व कामगारांना अंशतः पगाराचे पेमेंट केले जाईल.
हिरो मोटो कॉर्प या कंपनीने आपल्या डिलर्ससाठी एक रिलीफ पॅकेज तयार केले आहे.
जस्ट डायल या कंपनीने जास्तीतजास्त Rs ७०० प्रती शेअर या भावाने Rs २२० कोटींचा शेअर बायबॅक जाहीर केला.
LAURAS लॅबचे चौथ्या तिमाहीचे निकाल आले. विक्री Rs ८४० कोटी ( Rs ६६० कोटी) तर प्रॉफिट Rs ११० कोटी ( Rs ४३.१०) कोटी होते. LAURAS लॅबने आपल्या १ शेअर्सचे विभाजन ५ शेअर्समध्ये करायला मंजुरी दिली. आज ONGC आणि HCL TECH या कंपन्यांच्या शेअर्सना १०% चे अपर सर्किट लागले.
आज HUL या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट Rs १५१९ कोटी झाले. रेव्हेन्यू Rs ९९४५ कोटीवरून Rs ९०११ कोटी झाले. EBIT Rs २३२१ कोटींवरून Rs २०६५ कोटी एवढे झाले. EBIT मार्जिन २३.३% वरून २२.९% एवढे झाले( YOY) .
टेक महिंद्रा चे इन्कम Rs ९४९० कोटी झाले. US $ इन्कम US $ १२९.४६ कोटी झाले. प्रॉफिट Rs ८०३.४६ कोटी झाले EBIT मार्जिन १०% होते. ऍट्रीशन रेट १०% कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे चौथ्या तिमाहीचे निकाल आले. कंपनीने तुमच्याजवळ असलेल्या १५ शेअर्समागे १ राईट्स शेअर या प्रमाणात Rs १२५७ प्रति शेअर या भावाने Rs ५४००० कोटींचा राईट्स इशू जाहीर केला. कंपनीने Rs ६.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीला Rs ४२६७ कोटी वन टाइम लॉस झाला. रिलायन्स जिओला फायदा Rs २३३१ कोटी झाला.उत्पन्न Rs १४८३५ कोटी. EBITDA Rs ६२०६ कोटी,EBITDA मार्जिन ४१.८% .होते. पेटकेम उत्पन्न कमी होऊन Rs ३२२०६ कोटी झाली. पेटकेम EBIT कमी होऊन Rs ४५५३ कोटी. मार्जिन १४.१ % राहिले. OIL आणि गॅस चे उत्पन्न कमी होऊन Rs ६२५ कोटी EBIT – Rs ४८५ कोटी, मार्जिन – ७७.६% राहिले रीफाईनिंग उत्पन्न कमी होऊन Rs ८४८५४ कोटी. EBIT Rs ५७०६ कोटी. रिलायन्स इंडस्ट्रीजचा कन्सॉलिडिटेड नफा Rs ६३४८ कोटी, सेल्स Rs १.३६ लाख कोटी, EBITDA Rs २१७८२ कोटी, मार्जिन १६% राहिले.अडजस्टेड प्रॉफिट Rs १०६१५ कोटी. रिलायन्स रिटेल उत्पन्न कमी होऊन Rs ३८२११ कोटी, EBIT Rs २०६२ कोटी, EBIT मार्जिन ५.४% अन्य उत्पन्न Rs ४१३३ कोटी. GRM कमी होऊन US $ ८.९ /बॅरल.
आज मार्केटमध्ये तेजी टिकून राहिली आणि तेजीचा ट्रेंड मजबूत होता. आज एप्रिल एक्स्पायरी मार्केटने चांगली साजरी केली. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३७१७ NSE निर्देशांक निफ्टी ९८५९ बँक निफ्टी २१५३४ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!