Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २९ मे २०२०
आज क्रूड US $ ३४.१३ प्रती बॅरल ते US $ ३५.११ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७५.५९ ते US $१= Rs ७५.७२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४१ तर VIX ३०.०२ होते. PCR १.५५ होता.
चीनने हॉन्गकॉन्ग मधील नवीन रुल्सना मंजुरी दिली. त्यामुळे चीन आणि USA मधील तणाव वाढला. USA मधील बेरोजगारांची संख्या २१ लाखांनी वाढली.
जूनमध्ये लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था बर्याच प्रमाणात ओपन होईल असा अंदाज आल्यामुळे मार्केटने ‘HOPE’ हा थीम पकडून आज ऑटो, ऑटो अँसिलिअरी, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी केली. कालच्या शॉर्टकव्हरिंगनंतर झालेली खरेदी मार्केटचा आशावादी दृष्टिकोन दाखवते.
आता लॉकडाऊन ५ होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. पण या लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था ओपन होण्यासाठी किती सवलती मिळतील याची मार्केट वाट पाहात आहे. बऱ्याच राज्यात अर्थव्यवस्था ओपन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. केंद्र सरकारने देशांतर्गत विमानवाहतूक २६ मे २०२० पासून सुरु केली आहे. कर्नाटक राज्य सरकारने कर्नाटकात अर्थव्यवस्था ओपन करण्याच्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात रब्बीचा हंगाम संपला आहे. सरकारने खूपच त्वरेने धान्य खरेदी केल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला आहे. त्यामुळे प्रथम ट्रॅक्टर्स, टू व्हिलर्स आणि नंतर ४ व्हिलर्स या क्रमाने ग्रामीण भागात विक्री वाढेल.
सरकारने आपल्या देशात API चा तुटवडा पडू नये म्हणून २६ API च्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यातबंदी सरकारने उठवली. त्यामुळे पॅरासिटामोल बनवणार्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. उदा ग्रनुअल्स, कॅडीला हेल्थ.
कॅडीला हेल्थच्या बद्दी युनिटला USFDA ने EIR दिला.
MSCI मधील बदल आजपासून लागू होतील. बायोकॉन ज्युबिलण्ट फूड्स, IGL, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस या शेअर्सचा समावेश होईल. तर अशोक लेलँड, M &M फायनान्स, इत्यादी शेअर्स या निर्देशांकाबाहेर होतील.
इन्फोसिसच्या Rs ९.५० लाभांशाची आज एक्सडेट होईल.
‘टेनॅक्स’ या कंपनीमध्ये पीडिलाइट इंडस्ट्रीजने ७०% स्टेक खरेदी केला.
ITC AMWAY मार्फत आणखी काही उत्पादने विकेल. ‘B NATURAL प्लस’ या उत्पादनाला ग्रामीण क्षेत्रात चांगली मागणी आहे असे कंपनीने सांगितले.
‘THIERRY DELAPORATE’ यांची विप्रोचे M D आणि CEO म्हणून नेमणूक केली. ते ६ जुलै २०२० पासून कंपनीचा चार्ज घेतील. या बातमीनंतर विप्रोच्या शेअरमध्ये तेजी आली.
फायझर या कंपनीने जाहीर केले की ऑक्टोबर २०२० अखेर कोरोना प्रतिबंधक लस तयार होईल. या बातमीनंतर फायझरच्या शेअरमध्ये तेजी आली.
स्पाईसजेट या कंपनीला E-कॉमर्स आणि मेडिकल डिलिव्हरीसाठी ड्रोनचा उपयोग करण्यासाठी एव्हिएशन अथॉरिटीज ने परवानगी दिली.
भारताची FY २० च्या चोथ्या तिमाहीतील GDP ग्रोथ ३.१% होती.
FSDC च्या बैठकीत FDI वाढवण्यावर आणि शेअर मार्केटमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यावर विचार झाला.
सन फार्माच्या ‘NAFAMOSTAT’ या औषधाला कोरोनावरील औषध म्हणून क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी मिळाली.
सिम्फनी या कुलर बनवणार्या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs ४ कोटींवरून Rs ४० कोटी झाले. उत्पन्न Rs २३५ कोटींवरून Rs २४९ कोटी झाला. कंपनीला Rs ४ कोटी वन टाईमलॉस झाला.
रेन इंडस्ट्रीज, हायडलबर्ग सिमेंट, सिएट, मजेस्को या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ल्युपिन या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
वोल्टासच्या प्रॉफीटमध्ये २७% घट झाली. उत्पन्न १.३४ % वाढले. कंपनीने Rs ४ प्रती लाभांश जाहीर केला.
KEC इंटरनॅशनल चे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.
सुंदरम क्लेटनचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
१ जून रोजी ऑटोविक्रीचे आकडे येतील. मे २०२० महिन्यात काही ऑटो कंपन्यांच्या डिलरशिप ओपन झाल्यामुळे थोड्या प्रमाणावर ऑटोविक्री झाली असण्याची शक्यता आहे.
२ जून रोजी ब्रिटानिया, इंडिगो, मदर्सनसुमी या कंपन्यांचे निकाल येतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२४२४ NSE निर्देशांक निफ्टी ९५८० बँक निफ्टी १९२९७ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!