आजचं मार्केट – २१ मे २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ मे २०२०

आज क्रूड US $ ३५.९९ प्रती बॅरल ते US $ ३६.६० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७५.६० ते US $ ७५.७९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.४० तर VIX ३५.६१ होते. PCR १.१८ होते.

USA च्या सिनेटने ठराव पास केला की सर्व चिनी कंपन्यांचे शेअर्स (अंदाजे ८०० कंपन्या) USA च्या स्टॉक एक्सचेंजेसवरून डीलीस्ट होतील.

जेथे जेथे अर्थव्यवस्था ओपन करण्याचा प्रयत्न झाला तेथे तेथे कोरोनाचा प्रभाव वाढला. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इशारा दिला की अर्थव्यवस्था ओपन करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि हळू हळू ओपन करावी लागेल. अन्यथा याचे गम्भीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जपान AVIJEN ह्या कोरोनावर उपयोगी पडणाऱ्या औषधाची ट्रायल घेत आहे.

सरकारने भारतात देशांतर्गत विमान सेवा २५ मे २०२० पासून सुरु करायला परवानगी दिली.या बातमीमुळे स्पाईस जेट आणि इंडिगो या विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. GMR इंफ्राच्या शेअरमध्येही तेजी होती.
भारतीय रेल त्यांची कॅटरिंग सेवा, व्हेंडार सेवा सुरु करणार आहे. तसेच १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर ट्रेन तिकीट बुकिंग २-३ दिवसात सुरु होईल. तसेच भारतीय रेल २०० NON AC गाड्या सुरु करणार आहे. या बातमीमुळे IRCTC च्या शेअरला अपर सर्किट लागले.

सोनाटा सॉफ्टवेअरची सबसिडीअरी कंपनी USA च्या कंपनीमध्ये २४% स्टेक US $ १० लाखांमध्ये खरेदी करणार आहे.
कोटक महिंद्रा बँक लवकरच आपला QIP इशू आणेल. DII आणि FDI साठी बँकेनी रोड शोज सुरु केले आहेत.
DR रेडीजने सांगितली की USFDA कडून वेळेवर परवानगी मिळत आहेत. बहुतेक साईट्स प्लांट्स क्लिअर झाले आहेत. २५ ड्रॅग मंजुरीसाठी पाइपलाइनमध्ये आहेत.

उद्या माननीय अर्थमंत्र्याची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबर मीटिंग आहे. त्यात सध्या ३ महिने मोरॅटोरियमला दिलेली परवानगी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसेच बँकांना मोरॅटोरियमच्या रकमेसाठी १०% ऐवजी २०% प्रोव्हिजन करायला सांगण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ITC ने सांगितले की आम्ही आम्हाला लागणाऱ्या मालाची खरेदी खूप आधी करतो आणि यावेळी काही राज्यांनी APMC संबंधित अटी शिथिल केल्यामुळे प्राक्युअरमेंट करणे सोयीचे गेले.

TCS नी सांगितले की नव्या वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी TCS सज्ज आहे. आता शाळा,कॉलेजेस,असे प्रत्येक क्षेत्र ऑन लाईन मोडमध्ये शिफ्ट होत आहे. शेतकरी ऑन लाईन ऑर्डर घेऊन माल विकत आहेत. सध्या हे शिफ्टिंग ही गरज बनल्यामुळे ही शिफ्टिंग फार जलद आणि मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणजेच स्पीड आणि स्केल खूप आहे. यासाठी TCS तयार आहे. सुरुवातीला अडचणी येतील पण अडचणी दूर झाल्यावर प्रगती जलद गतीने होईल. ७५% लोक घरातून काम करू शकतील तर २५% कर्मचाऱ्यानाच ऑफिसमध्ये यावे लागेल. आम्हाला कोविद १९ संकटामुळे नव्या वाटा दिसत आहेत. आम्ही नेहेमीप्रमाणे बिझिनेस करत आहोत. संधीचा फायदा घेत आहोत. २०२५ साल डोळ्यासमोर ठेवून न्यू व्हिजन २५X २५ अमलात आणणार आहोत. सध्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठलेही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नसून हे कोरोनासाठी दाबलेले पॉज बटण आहे. त्यामुले अर्थव्यवस्था कोलमडली आहे पण IT सेक्टरवर याचा विपरीत परिणाम झाला नाही. उलट नवनवीन कल्पना सुचण्यासाठी ही संधी मिळाली आहे.

आज कोलगेटचे चौथ्या तिमाहीचे निकाल आले प्रॉफिट Rs २०४ कोटी, उत्पन्न Rs १०७० कोटी, EBITDA Rs २१२ कोटी, तर मार्जिन २४.५% होते. कंपनीने Rs १६ प्रती शेअर लाभाश जाहीर केला.व्हॉल्युम मध्ये ८% घट झाली.

हिंदुस्थान झिंक ला Rs १३४० कोटी फायदा झाला. उत्पन्न Rs ४३२१ कोटी आणि मार्जिन ४३.८% होते.

RIL ची राईट्स एंटायटलमेंट आजही तेजीत होती. या एंटायटलमेंटचा भाव Rs २५८ पर्यंत जाऊन Rs २३२ वर क्लोज झाला. ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट आणि ETF फंड्स विक्री करत होते तर ग्लोबल लॉन्ग ओन्ली फंड्स खरेदी करत होते.
राईट्स एंटायटलमेंटसाठी https://rights.kfintech.com या साईटवर माहिती मिळेल. राईट्स एंटायटलमेंट लेटर आणि ऍप्लिकेशन फॉर्म, ऑफर लेटर डाउनलोड करू शकता. मोबाईल नंबर आणि इमेल ऍड्रेस अपडेट करू शकता. याच साईटवर पेमेंटसाठी व्यवस्था केली आहे . किंवा अप्लिकेशनच्या फॉर्मचे प्रिंट आऊट घेऊन भरून तुम्ही ASBA करून जेथे तुमचा डिमॅट अकौंट असेल तेथे द्या. या राईट्ससाठी कोणत्याही पद्धतीने ऑन लाईन पेमेंट करू शकता.
बजाज फिनसर्व चे प्रॉफिट Rs १९४ कोटी ( कोविद १९ साठी कंपनीने Rs ९०० कोटींची प्रोव्हिजन केली आहे), उत्पन्न १३२९० कोटी झाले. टॅक्स खर्च Rs २५३ कोटी झाला.

अजंता फार्मा, JK लक्ष्मी सिमेंट, ज्युबिलण्ट फूड यांचे निकाल चांगले आले. ज्युबिलण्ट फूडचे व्यवस्थापन भविष्याविषयी आशावादी होते.

आज ऑटो, एव्हिएशन, सिमेंट सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

उद्या UPL, BOSCH, IDFC १ST बँकेचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०९३२ NSE निर्देशांक निफ्टी ९१०६ बँक निफ्टी १७७३५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.