आजचं मार्केट – २२ मे २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ मे २०२०

आज क्रूड US $ ३४.०१ प्रती बॅरल ते US $ ३४.७१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७५.७६ ते US $१= ७५.९५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.५९ होते. VIX ३२.२० होते.

अर्थव्यवस्था ओपन होताच अंदाजानुसार कोरोनाचा कहर वेगाने वाढत आहे. ब्राझीलमध्ये संक्रमण झपाट्याने वाढत आहे.. चीन, पाकिस्तान आणि आता नेपाळने सीमावाद उकरून काढला आहे. हॉन्गकॉन्ग वरून पुन्हा रण माजले आहे. हॉन्गकॉन्गची स्वायत्तता आणि मानवाधिकार यांची जपणूक USA करेल असे ट्रम्पनी सांगितले तर हॉन्गकॉन्गसाठी चीन नवा करार करेल असे चीनचे म्हणणे आहे. ट्रम्पना यावर्षअखेरीस निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे राजकारण चालू आहे.

DOW फ्युचर्सकडे सध्या मार्केटचे लक्ष असते . DOW कसे क्लोजिंग देत आहे त्यावरून मार्केट आपला पवित्रा ठरवत असते.आज एशियन मार्केट्समध्ये मंदी होती. प्रथम मार्केट थोडेसे तेजीत होते. RBI त्यांच्या १० वाजता होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीतरी दिलासा देईल अशा अपेक्षेने मार्केट पवित्र्यात होते. पण RBI ने निराशा केली. RBI ने ०.४० % रेटकट केल्यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स सुधारू लागले. दिवसअखेरीस मार्केट पुन्हा ९००० च्यावर बंद होण्यात यशस्वी झाले.

१० वाजता RBI ची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे

  • RBI ने ०.४०% ची रेपोरेटमध्ये कपात केली. आता रेपोरेट ४.०० % झाला. रिव्हर्स रेपोरेट ३.३५% राहील.
  • RBI ने सिडबीला Rs १५००० कोटींच्या स्पेशल रिफायनान्स फॅसिलिटीची मुदत ३ महिन्यानी वाढवली.
  • प्रीशिपमेंट आणि पोस्टशिपमेंट फायनान्सची मुदत १ वर्षांऐवजी १५ महिने केली.
  • इंपोर्टसाठी पेमेंट करण्याची मुदत शिपमेंट डेट पासून ६ महिन्यांऐवजी १२ महिने केली.
  • मोरॅटोरियमसंबंधित सर्व तरतुदींची मुदत तीन महिने म्हणजे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवली.
  • वर्किंग कॅपिटल असेसमेंटसाठी कमी केलेली मार्जिन्सची मुदत मार्च २०२१ पर्यंत वाढवली.
  • वर्किंग कॅपिटलवरील सहा महिन्यांसाठी व्याज वर्किंग कॅपिटल टर्म लोनमध्ये परिवर्तित केले जाईल. हे वर्किंग कॅपिटल टर्म लोन ३१ मार्च २०२१ पर्यंत पेड करायचे आहे.
  • बँकांसाठी ग्रुप एक्स्पोजरची मर्यादा २५% वरून ३०% केली.
  • २०२०च्या पहिल्या सहामाहीमध्ये महागाई थोडी अधिक राहील. पण दुसर्या सहामाहीमध्ये महागाईचा रेट ४% च्या खाली राहील असा अंदाज RBI ने व्यक्त केला.
  • GDP मधील निगेटिव्ह ग्रोथ ही आमची मोठी चिंता आहे असे सांगितले.

या सर्व तरतुदी ऐकताच बँकांना चांगले दिवस येण्याची शक्यता मावळली. त्यासरशी बँकांच्या शेअर्समध्ये मंदी आली.

LIC ने हिरोमोटोमधील आपला स्टेक २% वरून ७.१% पर्यंत वाढवला.

ऍव्हेन्यू सुपरमार्केट हा हा शेअर T टू T ग्रुपमधून बाहेर पडला.

NIIT टेकचा बायबॅक इशू २९ मेला ओपन होईल.

महाराष्ट्र राज्य सरकारने ट्रीटमेंटचे दर नियंत्रित केले. ह्याचा परिणाम अपोलो हॉस्पिटल, WOCHKARDT, फोर्टिस हेल्थकेअर यांच्यावर होईल.

VST इंडस्ट्रीजचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs १०३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.हा लाभांश AGM मध्ये मंजूर झाल्यावर ३० दिवसाच्या आत पेड केला जाईल.

मारुतीने सुपरकॅरीचे BSVI व्हर्शन Rs ५.०७ लाख किमतीला लाँच केली.

सुप्रीम इंडस्ट्रीजच्या चौथ्या तिमाहीच्या उत्पन्न,प्रॉफिट यात थोडी घट झाली. मार्जिनमध्ये मात्र सुधारणा झाली.
BOSCH च्या उत्पन्नात, प्रॉफीटमध्ये लक्षणीय घट झाली. कंपनीला Rs २९७ कोटी वन टाइम लॉस झाला. कंपनीने Rs १०५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

इन्फोसिस विरुद्धची क्लास एक्शन सूट डिसमिस झाली.

रशिया आणि चीन मधून आयात होणाऱ्या कार्बन ब्लॅकवरील ऍन्टीडम्पिंग ड्युटीची मुदत वाढवली. याचा फायदा गोवा कार्बन, फिलिप्स कार्बन, हिमाद्री केमिकल्सला होईल

.KKR ने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये Rs ११३६७ कोटींना २.३२% स्टेक खरेदी केला. एशियामधील ही मोठी गुंतवणूक आहे. १ महिन्यात रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममधे Rs ७८५३२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

JSW स्टईलचे प्रॉफिट ८६% ने कमी झाले. RITES ने IRSDC (इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) मध्ये २४% स्टेक Rs ४८ कोटींना घेण्यासाठी करार केला.

UPL चा चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट १४७% वाढले. Rs २५० कोटींवरून Rs ६१७ कोटी झाले. कंपनीने Rs ६ प्रति शेअर लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०६७२ NSE निर्देशांक निफ्टी ९०३९ बँक निफ्टी १७२७८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.