Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३० जून २०२०
आज क्रूड US $ ४१.६प्रति बॅरल ते US $ ४१.५७ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.५० ते US $ १= ७५.५८ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.४४,VIX- २८.९१ PCR-१.३० होता. USA मध्ये होम सेल्सचे आकडे चांगले आले.त्यामुळे USA मधील मार्केट तेजीत होती. युरोपियन आणि एशियन मार्केटही तेजीत होती. त्यामुळे आपलीही मार्केट तेजीत ओपन झाली. पण दिवसभरात ही तेजी टिकली नाही.
सरकारने चीनच्या ५९ apps वर बंदी घातली.
क्सिस बँक , टाटा पॉवर या कपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची फंड रेझिंगवर विचार करण्यासाठी २जुलै २०२० रोजी बैठक आहे.
सरकारने अनलॉक 2 ची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली.
पेरू आणि चिली या देशातून होणाऱ्या पुरवठ्यात अडचणी आल्यामुळे आणि चीनची इंडस्ट्री ओपन झाल्यामुळे मेटलसाठी मागणी वाढली आहे. स्टीलचे भाव वाढले टाटा स्टील च्या युरोप business मध्ये सुधारणा झाली त्यामुळे टाटा स्टीलचा शेअर तेजीत होता
NMDC ने आयर्न ओअरच्या किमती ₹२०० प्रती टन वाढवल्या
भारत डायनामिक्स,BEL, इंगरसोल रँड, वेलस्पन इंडिया टाटा स्टील यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. (७)SJVN, नोसिल, पेट्रोनेट LNG, यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.
GIC हौसिंग,रेमंड, फोर्स मोटर्स,NCLइंडिया,ongc,sera सॅनिटरी वेअर्स,BGR एनर्जी, सेंट्रल बँक, J & K बँक, पंजाब आणि सिंध बँक, JBM ऑटो या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटी लोकांना जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ५ kg गहू किंवा ५ kg तांदूळ आणि १ kg चणाडाळ देण्यात येईल अशी घोषणा केली. यासाठी ₹९०००० कोटी सरकार खर्च करेल असे सांगितले.
RBI 2 जुलै रोजी ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून १०० बिलियनचे ९ ते १३ वर्ष मुदतीचे बॉण्ड खरेदी करणार आहे आणि तेव्हढ्याच रकमेची ६ ते १२ महिने मुदतीची ट्रेझरी बिले विकणार आहे
BSEनिर्देशांक सेन्सेक्स-३४९१५ NSE निर्देशांक निफ्टी-१०३०२ बँक निफ्टी -२१३७०वर बंद झाले
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!