Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३१ जुलै २०२०
आज क्रूड US $ ४३.१० प्रति बॅरल ते US $ ४३.४३ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७४.७२ ते US $ १= ७४.८६ दरम्यान,US $ निर्देशांक ९२.६५ ,VIX- २४.५६, PCR-१.६९ होता.
अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने contract होत आहे अशी शंका येण्यासारखी स्थिती झाली 1947 नंतर प्रथमच GDP growth 32.9% कमी झाली त्यांचे बेरोजगारीचे आकडे आले ते 1.43 m झाले हे आकडे 25 जुलै रोजी संपलेल्या आठवड्याचे आहेत बेरोजगारी भत्ता लवकर देण्याची गरज निर्माण झाली पण फेसबुक, गुगल,अँपल, अमेझॉन यांचे result चांगले आले
ऑगस्ट महिन्यात मार्केटमध्ये voltality जास्त असेल मार्केट तेजीत असेल तेव्हा कमजोर quality चे शेअर विका आणि करेक्शनची वाट पहा नंतर quality शेअर खरेदी करा सध्या रिस्क रिवॉर्ड रेशो buyerसाठी योग्य नाही
MPC(मोनेटरी पॉलिसी कमिटी)ची मिटींग 4 ऑगस्टला सुरू होईल त्याचा निर्णय 6ऑगस्टला जाहीर केला जाईल रेट कट करण्याची शक्यता नाही आणि गरजही नाही कारण सिस्टीम मध्यें liqidity भरपूर आहे unconventional उपायांचा विचार होईल असे दिसते
सेबीने कॅश सेगमेंट मध्ये up front margin घेण्याची अट 1 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली त्यामुळे थोडा दिलासा मिळाला
टाटा कॅपिटलनी Biocon Biologics मध्ये 0.85 % स्टेक 30 मिलियन डॉलरला घेतला आता biocon कडे 95.25 % स्टेक आहे
BSIV वाहनांचे कोर्टाची पुढील ऑर्डर मिळेपर्यंत रजिस्ट्रेशन होणार नाही असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.कोर्टाने मार्च २०२० नंतर विकलेल्या गाड्यांची माहिती मागवली.
PNB ही बँक PNB हौसिंग या कंपनीत QIP/राईट्स इशुद्वारा ₹६०० कोटी गुंतवणार आहे.
CAPRI ग्लोबल कॅपिटल ही कंपनी स्मॉल फायनान्स बँक लायसेन्ससाठी अर्ज करणार आहे.
आज अर्थमंत्र्यांनी सांगितले की RBI बरोबर लोन रिस्ट्रक्चरिंग,moratorium वाढवण्यावर, तसेच हॉस्पिटॅलिटी सेक्टर लोन रिकास्ट करण्यावर चर्चा चालू आहे.
टोरंट्स फार्मा,रेन इंडस्ट्रीज, Essel propack, टाटा कम्युनिकेशन,GMR(Q4), झायडस वेलनेस,दीपक फर्टिलायझर (प्रॉफिट ₹९.९ कोटींवरून ₹१२० कोटी झाले), स्टेट बँक ऑफ इंडिया (डिपॉझिट १६% ,ऍडव्हान्स ६.६%वाढले , NII ₹२६६४१.६० कोटी, moratorium ९.५%, GNPA ५.४४%,NNPA१.८६% नेट प्रॉफिट ₹४१९० कोटी,₹ १५३९.७० वन टाइम उत्पन्न,), लाल पाथ लॅब,यूको बँक( तोट्यातून फायद्यात,) या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
Linde इंडिया,वेस्टलाईफ डेव्हलपमेंट,लक्ष्मी विलास बँक,केसोराम,वेल्सपन,टाटा स्टील BSL, धामपूर शुगर, JSW एनर्जी, जस्ट डायल,टीमलीज, IOC,सन फार्मा, यांचे निकाल कमकुवत होते.
NIIT,महिंद्रा लॉजीस्टिक्स,ब्लु dart या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
Concor ची divestment लांबणीवर गेली कारण त्याच्याकडे असणारी जमीन रेल्वेची आहे ती जमीन उपयोगात आणणे, भाडे तत्वावर देणे या बाबतीत मतभेद आहेत.
उद्या ऑटो विक्रीचे आकडे येतील Escorts चे विक्रीचे आकडे चांगले येण्याची शक्यता आहे
BSE निर्देशांक सेन्सेक्स -३७६०६, NSE निर्देशांक निफ्टी- ११०७३ बँक निफ्टी – २१६४० वर बंद झाले
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!