आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०२०

आज क्रूड US $ ४३.०४ प्रति बॅरल ते US $ ४३.५४ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७४.८१ ते US $ १= ७५.०२ दरम्यान,US $ निर्देशांक ९३.४७,VIX- २४.१९, PCR-१.३१ होता. USA ची मार्केटस तेजीत होती.टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये तेजी होती .आता USA सुद्धा चीनच्या सॉफ्टवेअर उद्योगावर काही नियंत्रणे आणण्याचा विचार करत आहे. रशियात करोनावरील लस लाँच करण्याची तयारी चालू आहे.

सरकारने मोबाईल उत्पादकांसाठी PLI(प्रॉडक्शन लिंकड इन्ससेंटिव्ह) जाहीर केली. ही योजना मोबाईल फोन्स, ट्रान्झिस्टर, डायोड्स, thyristors, रेझिस्टर्स, कॅपसीटर्स,आणि नॅनोइलेक्ट्रॉनिक्स componants च्या उत्पादनाला लागू होईल. भारतीय कंपन्या किंवा ज्या कंपन्यांचे भारतात रजिस्टर्ड युनिट आहे त्या कंपन्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात. ज्या कंपन्या ₹ १५००० पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल उत्पादन करतात त्यांना FY २०२० बेस वर्ष पकडून वाढीव विक्रीवर तसेच प्लांट आणि मशिनरी, R&D, ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी यासाठी केलेल्या गुंतवणुकीवर(लँड आणि बिल्डिंगवर केलेली गुंतवणूक सोडून) ६% इंसेंटिव्ह मिळेल. भारतीय मालकीच्या कंपनीला ₹ २०० कोटी इंसेंटिव्ह चार वर्ष मिळेल. ही योजना पाच वर्षेपर्यंत इंसेंटिव्ह देईल. पांच वर्षात एकूण ₹४०९५१ कोटींची तरतूद केली आहे. या योजनेला दक्षिण कोरियाची SAMSANG, तैवानची PEGATRON, आणि सिंगापूरच्या FLEX या कंपन्यांनी तर डिक्सन टेक्नॉलॉजी,LG इंडिया,LAVA, KARBONN या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. या नंतर डिक्सन टेक्नॉलॉजि आणि अंबर एनटरप्रायझेस या शेअर्स मध्ये तेजी आली.

आज बंधन बँकेच्या प्रमोटर्सनी आपला २०.९५% stake विकला. यामध्ये RBI च्या नियमाप्रमाणे प्रमोटर होल्डिंग कमी करणे हा उद्देश होता.या बँकेत प्रमोटर होल्डिंग ६०.९५% आहे. त्यामुळे बँकेवर शाखाविस्तार आणि टॉप एक्झिक्युटिव्हच्या पगारावर बंधने येत होती. हा stake बँकेच्या स्थापनेपासून ३ वर्षाच्या आत ४०% पर्यंत आणि १० वर्षात २०% पेक्षा कमी करायचा आहे. ह्या शेअरची एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे शेअरमध्ये मंदी आली . बँकेत Hdfc LTD चा हिस्सा तसाच राहील

आज जुलै महिन्याचे ऑटो विक्रीचे आकडे आले. दुचाकी वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ झाली उदा. हिरो मोटो,TVS मोटर्स, बजाज ऑटो तसेच ट्रॅक्टर्सच्या विक्रीत वाढ झाली.उदा. एसकॉर्ट्स, M & M. कारण योग्य वेळेवर,योग्य प्रमाणावर आणि पावसाचे योग्य भौगोलिक वाटप, चांगल्या पेरण्या आणि सरकार ग्रामीण भागात करत असलेला खर्च होय आणि चार चाकी वाहनात मारुती, अशोक लेलँड यांच्या विक्रीत वाढ झाली. आता ग्रामीण आणि अर्धशहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आताची दिसत असलेली वाढीव मागणी ही लॉक डाउन मधील अडकून राहिलेली मागणी आहे. नजीकच्या भविष्यात मागणी वाढेल का यावर उद्योगजगतात दुमत आहे.

3M india आपला ऑटोमोटिव्ह ग्राफिक्सचा बिझिनेस बंद करणार आहे. यामुळे शेअर पडला

टाटा एलेक्सिने INVIDI या कंपनीबरोबर टीव्ही कॅपबिलिटीजसाठी आशिया , भारत , पॅसिफिक साठी करार केला.

स्पेन्सर रिटेल या कंपनीचा ₹ ८० कोटीचा, ₹७५ प्रती शेअरचा भाव असलेला आणि १५ शेअर्समागे २ राईट्स या प्रमाणात असलेला राईट्स इशू उद्यापासून सुरू होईल आणि १८तारखेला संपेल

भारतात astrazeneka च्या Serum इन्स्टिट्यूटला covishield या कॉरोनावरील लसीच्या फेजII आणि फेज III ट्रायल साठी DCGI ने परवानगी दिली.

सारेगम तोट्यातून नफ्यात,दालमिया भारत ,UPL, खेतान केमिकल्स,IOL केमिकल्स,गुफिक बायो, सोलारा ऍक्टिव्ह, बँक ऑफ इंडिया,राणा शुगर या कंपन्यांचे निकाल चांगले आले.

MEP इन्फ्रा(नफयातून तोट्यात), MMTC, जयश्री टी, टाटा केमिकल्स, क्रेडिट एक्सेस ग्रामीण,थायरोकेअर, Exide या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.

WOCKHARDT ही कंपनी कॉविद 19 च्या लसीसाठी UK सरकारबरोबर भागीदारी करणार आहे. या बातमीनंतर Wockhardt च्या शेअरला अपर सर्किट लागले.

बँकिंग विभागाने सरकारकडे ₹ १.२५ लाख कोटी भांडवलाची मागणी केली. हे भांडवल बॉण्डसच्या स्वरूपातही उभारले जाऊ शकते.

Yes Bank त्यांचा AMC business विकणार आहे म्हणजे कोअर business कडे जास्त लक्ष देता येईल ६ जण हा business खरेदी करण्यात interested आहेत

reliance power ही जापनीज युटिलिटी JERA बरोबर बांगला देशात पॉवर प्रोजेक्ट सुरू करत आहे. यात ५१% स्टेक reliance पॉवरचा आहे यातून २२वर्ष वीज पुरवली जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९३९,NSE निर्देशांक निफ्टी १०८९१,Bank निफ्टी २१०७२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.