Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०२०
आज क्रूड US $ ४०.५१ प्रती बॅरल ते US $ ४०.८५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.७७ ते US $१= Rs ७३.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.९३ विक्स १९.८६ तर PCR १.३७ होते.
मार्केट उघडण्याच्या वेळेपर्यंत बिडेन आणि ट्रम्प यांच्यात ‘DEBATE’ चालू होते. त्यामुळे मार्केटमध्ये नर्व्हसनेस होता. सोने आणि चांदी यामध्ये मंदी होती. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मागणी कमी असल्यामुळे क्रूडमधेही मंदी होती. १ ऑक्टोबर हा चीनचा राष्ट्रीय दिवस असल्यामुळे चीनमधील मार्केट्स एक आठवडा बंद राहतील. भारतीय मार्केटही २ऑक्टोबर २०२० रोजी गांधी जयंती निमित्त बंद राहतील.
USA चे वर्तमान अध्यक्ष ट्रम्प हे स्वतः उद्योगपती असल्यामुळे मार्केट फ्रेंडली आहेत. यामुळे ते ग्रासरूटच्या अडचणी समजू शकतात. ट्रम्पनी बर्याच प्रमाणात टॅक्स, रेट ऑफ इंटरेस्ट कमी केले. बिडेन टॅक्स वाढवण्याच्या बाजूचे आहेत. ‘DEBATE’ ट्रम्प यांच्या बाजूने झुकत आहे. आज डाऊ जोन्स ४०० पाईंट्स खाली आला. अजून या उमेदवारात तीन DEBATES व्हायचे आहेत. ३ नोव्हेम्बरला USA मध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होईल.
सरकारने BPCL च्या विक्रीसाठी निश्चित केलेली मुदत ३० सप्टेंबरला संपली. आतापर्यंत कोणीही EOI सादर केला नाही. रोजनेट आणि आरामको हे बीड करण्यात इंटरेस्टेड नाहीत. त्यामुळे आता सरकारने EOI सादर करण्याची मुदत १५ नोव्हेम्बरपर्यंत वाढवली आहे.
रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिक हे ०.८४% स्टेक Rs ३६८० कोटींना घेणार आहेत.
सुमिमोटो केमिकल्स ची OFS आज नॉनरिटेल गुंतवणूकदारांसाठी चालू झाली. याची फ्लोअर प्राईस Rs २७० निश्चित केली आहे.उद्या ही OFS रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन असेल
इंडियन रेल्वेने RAILS च्या सप्लायसाठी JSPL ला मंजुरी दिली.
पेट्रोनेट LNG ने सांगितले की डोमेस्टिक LNG ची किंमत आयात केलेल्या LNG च्या किमतीपेक्षा कमी असेल. ही प्राईस US $१.९ प्रती MMBTU एवढी असेल. दुसर्या तिमाहीमध्ये आमच्या कंपनीचा बिझिनेस चांगला होईल असा अंदाज व्यक्त केला
SJVN या सरकारी कंपनीला गुजरातमधील १०० MV सोलर .प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.
PNB ने सांगितले की लक्ष्मी विलास बँकेचे ऍक्विझिशन करण्याचा कोणताही प्रस्ताव RBI कडून आलेला नाही.
श्रीराम ट्रान्सपोर्ट नी सांगितले की ९०% लोकांकडून या महिन्यात परतफेड केली जाईल. फक्त २% लोनबुक चे रिस्ट्रक्चरिंग करावे लागेल. ९ कॉमर्स आणि लॉजिस्टिक प्लेयर्स कडून समजले की ग्रामीण आणि अर्धशहरी भागात मागणी चांगली आहे.
OPAL ही कंपनी ONGC GAIL आणि GSPC (गुजरात स्टेट पेट्रोनेट) यांचे JV आहे. या कंपनीला खूप कर्ज असल्याने त्या कंपनीचा DEBT /इक्विटी रेशियो चांगला नाही. ONGC या JV मध्ये Rs १०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. तसेच गेल आणि GSPC यांचा स्टेक प्रत्येकी Rs १००० कोटी देऊन खरेदी करेल. यामुळे या कंपनीची बॅलन्स शीट सुधारेल आणि सरकारलाही डायव्हेस्टमेन्ट करणे सोपे जाईल.
इंडोनेशिया आणि भारतातून होणाऱ्या स्टीलच्या आयातीवर युरोपियन युनियन टॅरिफ लावण्याची शक्यता आहे.
सरकारने EV उत्पादन करण्यासाठी आणि लोकलायझेशन सबसिडीची मुदत १ एप्रिल २०२१ पर्यंत वाढवली. ग्रीव्हज कॉटन या कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कुटर Rs ३६००० किमतीला लाँच केली. या मुदत वाढीचा फायदा ग्रीव्हज कॉटन, टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोला होईल.
रेल्वे मंत्रालयाने काँकॉर या सरकारी कंपनीला रेल्वेची जमीन लीजरेंटवर ३३ वर्षांकरता देण्याचा करार करण्याविषयी नोट तयार केली.
उद्या अनलॉक ४.५ सुरु होणार आज केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे आपापली अनलॉक मार्गदर्शक तत्वे जाहीर करतील. त्यात पश्चिम बंगाल मधील ऑडिटोरियम/ थिएटर्स, चालू करणे, महाराष्ट्रात रेस्टोरंट/ हॉटेल्समध्ये खानपान सेवा चालू करणे इत्यादींचा समावेश असेल. मार्केट या मार्गदर्शक तत्तवांवर लक्ष ठेवून आहे. ज्या कंपन्यांना/ क्षेत्रांना यात सूट मिळेल त्या कंपन्यांचे शेअर वाढतील. जर अनलॉकमध्ये सवलती मिळतील अशी अपेक्षा ठेवून वाढलेले शेअर्स त्या क्षेत्राच्या अपेक्षा पुर्या झाल्या नाहीत तर पडतील
ऑटो विक्रीचे आकडे येतील त्याकडेही मार्केट लक्ष ठेवून असेल. मार्केट येणाऱ्या सणासुदीच्या काळात ऑटोविक्रीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा करत आहे. त्याचबरोबर FMCG क्षेत्रातील खरेदी वाढेल असा अंदाज आहे. एअरकुलर्स, फ्रिज, वॉशिंग मशिन्स, विविध किचन ऍक्सेसरीज, फर्निचर इत्यादीची खरेदी होईल.
येत्या १५ दिवसांत RBI चे द्विमासिक धोरण जाहीर होईल असा अंदाज आहे.
उद्या CHEMKON स्पेशालिटी केमिकल्स आणि CMS या कंपन्यांचे लिस्टिंग होईल. ज्यांना हे शेअर्स मिळाले आहेत त्यांना चांगला लिस्टिंग गेन होईल असा अंदाज आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०६७ NSE निर्देशांक निफ्टी ११२४७ बँक निफ्टी २१४५१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!