आजचं मार्केट – १५ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १५ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ३९.५६ प्रती बॅरल ते US $ ३९.७६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.३७ ते US $१= Rs ७३.६४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.८४ VIX २०.८० तर PCR १.३५ होता.

USA मार्केट्समध्ये तेजीमंदीचा मूड होता. फेडची दोन दिवसांची FOMC ची बैठक चालू झाली. USA मध्ये अजून एक रिलीफ पॅकेजला मंजुरी मिळेल असे वाटत नाही.

संसदेच्या स्थायी समितीने गुंतवणुकीवरील लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स दोन वर्षांकरता रद्द करावा.अशी शिफारस केली.
USA ने जिंगयांग या चिनी कंपनीच्या काही प्रॉडक्टसवर बंदी घातली. या ला USA ग्लोबल सप्लायचेनमध्ये अडथळे निर्माण करत आहे अशी प्रतिक्रिया चीनने दिली.

आज क्रूडसंबंधी एका रिपोर्टमध्ये असे सांगितले की येत्या तीस वर्षात क्रूडसाठी मागणी कमी कमी होत जाईल. याला कारण कार्यक्षमता, रोड ट्रान्सपोर्ट कडून कमी होणारी मागणी आणि पर्यावरणविषयक चिंता ही असतील. इसवी सन २०५० मध्ये क्रूडसाठी जागतिक डिमांड ३० MBPD एवढी राहील तर २०३० मध्ये सध्याच्या मागणीमध्ये ४०% घट होईल. आता मेक्सिको गल्फमध्ये आलेल्या वादळामुळे तेथील उत्पादनातं २१% घट झाली आहे.

आज भारतीय मार्केट्समध्ये IT, फार्मा, बँकांमध्ये तेजी होती.

आज हेक्झावेअरच्या डीलीस्टिंग ऑफरचा शेवटचा दिवस होता. आज या ऑफरला ७.९ कोटी शेअर्स ( ७०% शेअर्स) करता बीड्स मिळाल्या. ह्यातील बहुसंख्य बीड्स Rs ४७५ प्रती शेअर या भावाने केलेल्या आहेत. हेक्झावेअरने Rs २८५ ही इंडीकेटीव्ह प्राईस ठेवली होती. हेक्झावेअर आता त्यांची ऑफर सुधारू शकते किंवा डीलीस्टिंग रद्द करू शकते.
सरकारने साखर उत्पादक कंपन्यांना ६० लाख टन साखर निर्यातीसाठी परवानगी दिली. तसेच या निर्यातीवरील सबसिडी ९० दिवसांऐवजी १८० दिवसात क्लेम करण्याची सवलत दिली. तसेच ही सबसिडी मिळण्याची मुदत डिसेम्बरपर्यंत वाढवली. सरकार इथेनॉल उत्पादनाला अधिक उत्तेजन देण्याचा विचार करत आहे.

सरकारने आज कांदा निर्यातीवर ताबडतोब बंदी घातली आहे.

आज IBHF च्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांनी QIP च्या द्वारे Rs ६८३ कोटी आणि ओकनॉर्थ बँकेतील स्टेक विकून Rs ५२२ कोटी उभारले.हे पैसे त्यांनी कॅपिटल बफर उत्पन्न करण्यासाठी उभारले. त्यांनी कॅपिटल ADEQUACY साठी ३२% चे लक्ष्य ठेवले आहे. तसेच AA + रेटिंग मिळवण्याचे लक्ष्य आहे येत्या वर्षात AUM मध्ये ते १०% वाढीची अपेक्षा करत आहेत. ऍसेट लाईट मॉडेल ते फॉलो करतील. त्यांचे लोन चे मोरॅटोरियम १६% एवढे आहे. ते ओकनॉर्थ बँकेतील राहिलेला स्टेक विकून Rs ९०० ते Rs १००० कोटी उभारतील.

इन्फोसिसला प्रभू बँकेकडून डिजिटल बँकिंग सोल्युशनसाठी ऑर्डर मिळाली.

MCX वर कमोडिटी ऑप्शन ट्रेडिंगवर ट्रॅन्झॅक्शन चार्जमध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत सूट दिली आहे.

२१ सप्टेंबरपासून CAMS ( कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस) आणि CHEMCON स्पेशालिटी केमिकल्स( HMDS आणि CMIC ही दोन फार्मा कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवते) या दोन कंपन्यांचे IPO ओपन होतील.आणि २३ सप्टेंबरला बंद होतील.

CAMS चा IPO Rs १५०० कोटी ते Rs १६०० कोटी दरम्यान असेल.या IPO मध्ये १.२२ कोटी इक्विटी शेअर्ससाठी OFS असेल. यात ग्रेट टेरेन इन्व्हेस्टमेंट, NSE इन्व्हेस्टमेंट्स, ACSYS इन्व्हेस्टमेंट, HDFC आणि HDB एम्प्लॉईज ट्रस्ट हे आपला स्टेक विक्रीकरता ऑफर करतील. CAMS ही कंपनी भारतातील सर्वात मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट आहे आणि या क्षेत्रात त्यांचा ६९% मार्केट शेअर आहे..

CHEMCON च्या Rs ३५० कोटींच्या IPO मध्ये Rs १७५ कोटींचे नवे शेअर्स इशू होतील तर ४३ लाख शेअर्स OFS दवारा प्रमोटर्स विक्रीकरता ऑफर करतील. ही कंपनी गुजरातमधील बरोडा येथील असून त्याची प्रॉडक्टस भारतातील कंपन्याना( LAURUS लॅब, ऑरोबिंदो फार्मा, इंडस्वीफ्ट लॅब आदी) विकली जातात तसेच ही प्रॉडक्टस USA जपान चीन मलेशिया या देशांना निर्यात केलेली जातात..या कंपनीच्या पीअर कंपन्या विनती ऑर्गनिक्स सुदर्शन केमिकल्स, फाईन ऑर्गनिक्स, NEOGEN केमिकल, अतुल,PAUSHAK ह्या आहेत.

आज अपोलो हॉस्पिटल, रेमंड्स, PVR ( लॉक-डाऊनमुळे यांची मल्टीप्लेएक्सेस बंद आहेत.) फ्युचर रिटेल्स यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

JB केमिकल्स चे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले होते.

रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी CARLAYL आणि सॉफ्ट बँक यांनी स्वारस्य दाखवले आहे. पण ज्यांनी रिलायन्स जियो मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना प्रथम गुंतवणुकीसाठी ऑफर केली जाईल नंतर CARLAAYL आणि सॉफ्ट बँक यांचा विचार केला जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०४४ NSE निर्देशांक निफ्टी ११५२१ बँक निफ्टी २२४६५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.