आजचं मार्केट – १७ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ४१.५० प्रती बॅरल ते US $ ४२.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=₹ ७३.६५ ते US $ १=₹७३.७७ या दरम्यान होते . US $ निर्देशांक ९३.४२ VIX २०.५८ आणि PCR १.६१ होते.

आज USA च्या मार्केटमध्ये, आशियायी मार्केटसमध्ये प्रॉफिटबुकिंग झाले .फेडने आपल्या दरांमध्ये कोणताही बदल केला नाही . आपले दर ०.००% ते०.२५% या दरम्यान राहतील असे सांगितले.

२०२३ पर्यंत या दरांत कोणतीही वाढ करणार नाही असे सांगितले . इन्फलेशनचा दर २% पेक्षा २०२३ च्या आधी जास्त होईल असे वाटत नाही. जो पर्यंत जॉब मार्केट पूर्णपणे सुधारत नाही आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा होत नाही तो पर्यंत आम्ही लिक्विडीटी पुरवत राहू . फेडच्या या कॉमेंट्समूळे मार्केटचा असा ग्रह झाला की अर्थव्यवस्था काही लवकर सुधारत नाही. ट्रम्प यांनी जाहीर केले की ऑक्टोबर २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात लोकांना लस मोफत वाटली जाईल. तसेच रिलीफ पॅकेज देण्यावर विचार चालू आहे .

स्नो फ्लेक या शेअर USA मार्केट मध्ये लिस्ट झाला तो इशू प्राईसच्या दुप्पट किमतीवर झाला. ही IT क्षेत्रातील कंपनी आहे .
HCL टेक या कंपनीने गूगलबरोबर acclerated intelligence business platform साठी करार केला. ही कंपनी गूगल क्लाउड साठी डेटा स्टोअरेज चे काम करेल.

CAMS ने ₹१२२९ ते ₹ १२३० हा प्राईस बँड आणि ४४ शेअर्सचा मिनिमम लॉट आणि chemkon या कंपनीने ₹ ३३८ ते ₹ ३४० हा प्राईस बँड जाहीर केला.

HSIL ची २१ सप्टेंबर २०२० रोजी आणि राईट्स या कंपनीची १८ सप्टेंबर २०२० रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

सरकार इथेनॉल उत्पादनासाठी नवीन प्लांट उभारण्यासाठी ५ वर्षे मुदतीचे कर्ज ६% व्याजावर देईल. कंपन्या १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत या साठी अर्ज करू शकतील. यामुळे सर्व साखर उत्पादक कंपन्या, प्राज इंडस्ट्रीज आणि इंडिया ग्लायकोल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.इथेनॉलचे उत्पादन वाढविल्याशिवाय इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य पुरे होऊ शकणार नाही.
नवीन संसद भवनाचे निर्माण करण्याचे ₹८६२ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट टाटा प्रोजेक्ट या कंपनीला मिळाले. या कंपनीमध्ये टाटा पॉवरचा ४८% स्टेक आहे. हे काम २१ महिन्यात पुरे करायचे आहे.प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये मेंटेनन्स कॉस्टचाही समावेश आहे.
धनुका ऍग्रीटेक ही कंपनी ₹ १ कोटीपर्यंत शेअर बाय बॅक करेल. या बायबॅक साठी २८ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे.
व्होडाफोन कॉस्ट रिडक्शन करून येत्या १८ महिन्यात ₹४००० कोटींची बचत करेल. कंपनी क्लाउड सर्व्हिसेसवर फोकस करेल. कंपनी ग्राहकांना दरवाढीची भेट देण्याची शक्यता आहे.

अशोक लेलँडला १४०० इंटरमिजीएट cus साठी ऑर्डर मिळाली . ही ऑर्डर ६ महिन्यात पूर्ण करायची आहे.
तालचेर फर्टिलायझर्स या सरकारी कंपनीमध्ये सरकार एक्सल्युझिव सबसिडी आणणार आहे. ही कंपनी कोलगॅसिफिकेशनपासून युरिया बनवेल. या कंपनीत कोल इंडियाचा २९.६७%, गेल चा २९.६७% आणि RCF चा ११% हिस्सा आहे.

IRCON या सरकारी कंपनीला ₹ १९०० कोटींची रेल इलेक्ट्रिफिकेशनसाठी ऑर्डर मिळाली.

PTC इंडिया फायनान्सला ₹१२० कोटींचा टॅक्स रिफंड मिळाला.

बंधन बँकेने EEB (इमर्जिंग इंटरप्रायझेस बिझिनेस) हा एक नवीन प्लॅटफॉर्म लाँच केला.मायक्रो होम लोन, मायक्रो बाजार लोन, आणि मायक्रो इंटरप्रायझेस यांचा समावेश आहे.

मेरिको ही कंपनी सफोला इम्युनिटी वेदा हे सफोला काढा मिक्स आणि दूध आणि हळद यांचे मिश्रण असलेले औषध लाँच करत आहे.

विप्रो कन्झ्युमर केअर व्हेंचर्स हा फंड २०१९ मध्ये ₹२०० कोटींचा सूरू केला. हायजीन, इम्युनीटी बिल्डिंग, गृमिंग प्रॉडक्टस मधील स्टार्टअप ना US $ २ ते ६ मिलियनची गुंतवणूक करेल. वर्षभरात ५ स्टार्टअप ना मदत केली जाते. R & D, प्रॉडक्ट रेंज, डिस्ट्रिब्युशन, उत्पादन आणि विक्री आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करेल. पॅनडेमिकच्या काळात इ-कॉमर्स आणि कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस हेही लक्षात।घेतले जातील

बाटाने त्यांची सबसिडीअरी CCEL चे स्वतः मध्ये मर्जर केले.

आज हॅप्पीएस्ट माईंडचे जोरदार ₹ ३५१ वर लिस्टिंग झाले. ₹१६६ ला IPO मध्ये दिलेल्या या शेअरमध्ये
गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला. आज भारतीय मार्केटस, आशियायी मार्केटस, सोने, चांदी यात मंदी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९७९ NSE निर्देशांक निफ्टी ११५१६ बँक निफ्टी २२३२० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.