आजचं मार्केट – १८ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ४३.४३ प्रती बॅरल ते US $ ४३.७४ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.२३ ते US $१=Rs ७३.४७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.८० VIX २०.५० PCR १.०४ होते.

ओपेक+ चे जे उत्पादक सभासद उत्पादनात कपात करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी OPEC + धमकी दिल्यामुळे क्रूडचा दर US $ ४३ च्यावर पोहोचला.

संसदेने ३ शेतकी विषयक वटहुकूम मंजूर केले. आता शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांच्या राज्यात कोठेही, तसेच बाहेरच्या कोठल्याही राज्यात विकता येईल. त्यांना आता माल E कॉमर्स च्या रूटने विकता येईल. आता शेतकऱयांना कंपन्यांबरोबर, मोठ्या ट्रेडर्सबरोबर शेतातील पिकाची विक्री करण्याचे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळेल आणि पिकाचं नुकसान होण्याचा धोका खरेदी करणाऱ्याकडे पास होईल.

TRAI ने टॅरिफवर नवीन गाईडलाईन्स जारी केल्या. आता कंपन्यांना टॅरिफविषयी पुरी माहिती द्यावी लागेल. ह्या गाईडलाईन्स १५ दिवसांत अमलांत आणाव्या लागतील. टॅरिफमध्ये व्हॉइस कॉल, डेटा लिमिट, स्पीड या विषयी पूर्ण माहिती द्यावी लागेल.

हिंदाल्कोने हिंदुस्थान कॉपर बरोबर त्यांचे कॉपर कॉन्सन्ट्रेटचे ६०% उत्पादन खरेदी करण्याचा करार केला. हिंदाल्को या कॉपर कॉन्सन्ट्रेट पासून रिफाईंड कॉपर बनवेल.यामुळे हिंडाल्कोचा शेअर तेजीत होता.

एन्जल ब्रोकिंग या ब्रोकिंग फर्म चा IPO २२ सप्टेंबरला ओपन होऊन २४ सप्टेंबरला बंद होईल. हा IPO Rs ६०० कोटींचा असून (५०% OFS आहे) याचा प्राईस बँड Rs ३०५-Rs ३०६ आहे. ब्रोकिंग मध्ये त्यांचा ६% मार्केटशेअर आहे. रिटेल आणि B २ C वर जास्त फोकस आहे. ब्रोकिंग अडवायझरी, मार्जिन ट्रेडिंग आणि शेअर्सवर कर्ज या तीन सर्व्हिसेस ही कंपनी देते. यांचे डिजिटल ट्रेडिंग प्रॉडक्ट स्वस्त आणि सोपे आणि सोयीस्कर आहे.

LED प्रॉडक्ट आणि LED मोड्युल यांच्या कॉम्पोनंट्सच्या आयातीवर उद्योग मंत्रालयाने सक्ती वाढवली. या प्रॉडक्टसच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. याचा फायदा डिक्सन टेक्नॉलॉजीला होईल.

TVS मोटर्सनी कोलंबियामध्ये त्यांचा प्रेझेन्स वाढवला. AUTECO बरोबर करार केला.

आयशर मोटर्सनी ‘एनफिल्ड’ च्या किमती वाढवल्या

USA बेस्ड रोझेन या फर्मने USA च्या कोर्टात क्लास ऍक्शन सूट फाईल केली . HDFC बँकेच्या अंतर्गत फायनान्सियल रिपोर्टींग आणि डिस्क्लोजर सिस्टिम सदोष आहे. बँकेची व्हेहिकल फायनान्स देण्याची प्रक्रिया योग्य नाही. त्यामुळे बँकेने दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्यामुळे गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

HDFC बँकेने आधीच दिलेल्या प्रतिक्रियेप्रमाणे त्यांची डिस्क्लोजर पॉलिसी पूर्णपणे पारदर्शक आहे. HDFC बँकेच्या शेअरमध्ये मंदी आली.

DR रेडीज आणि CELGENE यांनी REVLIMID ( हा CLEGENE चा ट्रेडमार्क आहे) पेटंट सुटमधे आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली. CELEGENE ने DR रेडीजला LENALIDOMIDE कॅप्सूल्स USA मध्ये विकायला परवानगी दिली. मार्च २०२२ पर्यंत मर्यादित प्रमाणात विकता येईल आणि ३१ जानेवारी २०२६ नंतर मात्र विक्रीवर कोणतेही बंधन असणार नाही. काही दिवसांनी DR रेडीज LENALIDOMIDEचे जनरिक व्हर्शन लाँच करणार आहे. DR रेडीजने ‘PATADAY’ ची ओव्हर द काउंटर औषधे लाँच केली. यामुळे ‘OTC आय केअर’ या फिल्डमध्ये DR रेडीजचा प्रवेश होईल. GLAND फार्माबरोबर त्याचे स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन होईल. रशियन डायरेक्ट फंडाने ‘स्पुटनिक’ या त्यांच्या कोरोनावरील लशीच्या क्लीनिकल ट्रायल्स आणि डिस्ट्रिब्युशनसाठी DR रेडीज बरोबर करार केला. या सर्व अनुकूल बातम्यांमुळे DR रेडिजचा शेअर १३% वाढला.

रिलायन्स त्यांच्या रिटेलमधील १५% ते २०% स्टेक ऑफलोड करणार आहे. त्यातून त्यांना Rs ८०००० कोटी अपेक्षित आहेत. CATTERTAN, मुबादला, KKR, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथारिटी तसेच १० परदेशी फंडांबरोबर चर्चा सुरु आहे. रिलायन्स चे Rs ४.२लाख कोटी व्हॅल्युएशन झाले आहे. कार्लाईल US $ २ बिलियनचा स्टेक घेणार आहे.

EIH ही कंपनी Rs ३५० कोटींचा राईट्स इशू RS ६५ प्रती शेअर या भावाने ८५शेअर्सना ८ राईट्स या प्रमाणात आणत आहे. या राईट्स इशूसाठी रेकॉर्ड डेट २३ सप्टेंबर २०२० ही असेल.

गुजरात गॅस, GSK फार्मा, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI कार्डस अडाणी ग्रीन, इंडस इंड बँक, ट्रेंट, PI इंडस्ट्रीज IGL आणि IPCA लॅब यांचा FTSE मध्ये समावेश करण्यात आला तर भारती एअरटेल, इन्फोसिस आणि HDFC या कंपन्यांना FTSE मधून वगळण्यात आले.FTSE या निर्देशांकाला युरोपियन फंड्स फॉलो करतात.

वॉलमार्ट ही कंपनी ओरॅकल बरोबर टाय- अप करणार आहे.व्हिडिओ शेअरिंग APP मधील २०% स्टेक ओरॅकलला मिळेल. BYTEDANCE ने टिकटॉक चा बिझिनेस विकावा किंवा USA मधील ऑपरेशन्स ९० दिवसाच्या आत नॅशनल सिक्युरिटीसंबंधातील कारणांमुळे पूर्णपणे बंद करावी असे सांगितले होते. USA संबंधित सर्व डेटा USA मध्येच स्टोअर केला पाहिजे असे सांगितले. या मध्ये ओरॅकलचा खूप फायदा होईल कारण त्यांना व्हॅल्युएबल डेटा मिळेल.

RITES ही कंपनी ९७ लाख शेअर्सचा बायबॅकसाठी Rs २६५ प्रती शेअर्सच्या भावाने टेंडर ऑफर पद्धतीने Rs २६० कोटीपर्यंत खर्च करेल.

२४ सप्टेंबर २०२० ला RBI Rs १०००० कोटींचे OMO करेल.

१ ते १५ सप्टेंबरचा डेटा बघितला तर असे आढळते की पेट्रोलची ,गॅसची मागणी वाढत आहे, याचा फायदा HPCL BPCL, IOC, MGL, IGL HOEC, गुजरात गॅस यांना होईल.

आज फार्मा क्षेत्रातील सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती. तर बँकिंग शेअर्समध्ये मंदी होती.
ICRA ने एस्कॉर्टसचे लॉन्ग टर्म रेटिंग AA – वरून AA असे केले.

कॅडिलाच्या ‘पोटॅशियम क्लोराईड’ च्या टॅब्लेट्स ना USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली.हे रक्तदाबावरील औषध आहे.

पुढील आठवड्यात २१ सप्टेंबरपासून रुल्स ऑफ ओरिजिन वस्तूंवर लिहावे लागेल. ROUT मोबाईलचे लिस्टिंग होईल. CAMS आणि CHEMKON यांचे IPO ओपन होतील. २२ सप्टेंबरला एंजल ब्रोकिंगचा IPO ओपन होईल.

१९ सप्टेंबरला होणारी GST कौन्सिलची मीटिंग ५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८४५ NSE निर्देशांक निफ्टी ११५०५ बँक निफ्टी २२०३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.