Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०२०
आज क्रूड US $ ३६.८२ प्रती बॅरल ते US $ ३७.८४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.१० (आज करन्सी मार्केट बंद होते) होते. US $ निर्देशांक ९३.९० VIX २५.१६ तर PCR १.२५ होते.
USA , युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या केसेस वाढत आहेत.USA तसेच यूरोपमधील मार्केट्स मंदीत होती.डाऊ जोन्स ५३० पाईंट पडला. USA मधील अध्यक्षीय निवडणुका आता हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातील अनिश्चितता, असुरक्षितता वाढत आहे. मार्केट्मध्ये दिसत असलेला फायदा घरी घेऊन येण्याकडे लोकांचा कल होत आहे. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग होत आहे.
नायलॉन टायर कॉर्ड, फॅब्रिक यांच्यावर US $ ५२० ते US $ ११०० बसवली आणि अँटीडम्पिंग ड्युटीची मुदत सरकार ५ वर्षांनी वाढवणार आहे. याचा फायदा सेंच्युरी एंका, SRF यांना होईल.
चीन आणि कोरियामधून आयात होणाऱ्या कॉस्टिक सोड्यावर सरकारने ३ महिन्यासाठी ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवली.
HPCL ४ नोव्हेंबर २०२० रोजी बायबॅकवर विचार करेल.
व्होडाफोन PLC व्होडाफोन आयडिया मध्ये Rs ६४०० कोटींची गुंतवणूक करेल.
हॅवेल्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की जाहीरातींवरील खर्च कमी केल्यामुळे मार्जिन वाढले आहे. रूरल मार्केटमधून १४०% ग्रोथ झाली आहे. आता जवळ जवळ प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली आहे. वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. डिजिटलायझेशन वाढत्या प्रमाणावर उपयोगात आणले जात आहे. E-कॉमर्स च्या द्वारे विक्री वाढत आहे. कंपनीने कॉस्ट कमी करण्याची योजना अमलांत आणली. इकॉनॉमीज ऑफ स्केलचा फायदाही होत आहे. केबल, इंडस्ट्रियल स्विच गिअर्स, आणि कन्झ्युमर ड्युरेबल अशी कंपनीच्या बिझिनेसची विभागणी आहे. इंडस्ट्रियल इंफ्राचासहभाग कमी आहे.
JK पेपर्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की शाळा, कॉलेजीस, ट्युशन कलासेस, खाजगी ऑफिसेस बंद असल्यामुळे पेपरची मागणी कमी आहे. प्रिंटिंग पेपरला मात्र माफक मागणी आहे. कंपनीच्या पॅकेजिंग बोर्ड फार्मा, फूड इंडस्ट्री आणि FMCG उद्योगांत पॅकिंगसाठी उपयोगांत आणला जातो. यासाठी मागणी ९०% -९५% प्री कोविड लेव्हलवर आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर वर उल्लेखिलेल्या परिस्थितीचा परिणाम दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेपरच्या किमती कमी होत असल्यामूळे रेव्हेन्यूवर परिणाम होईल.
IOC ला प्रॉफिट Rs ६२३० कोटी, उत्पन्न Rs ८५६१० कोटी इतर उत्पन्न Rs १५३७ कोटी होते. GRM US $ ३.४६ प्रती BBL राहिले.
चोला फायनान्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की रूरल मार्केट चांगले आहे. ट्रॅक्टर, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, पॅसेंजर कार्स यासाठी असलेल्या मागणीत प्रगती आहे. मात्र कमर्शियल आणि हेवी कमर्शियल व्हेइकल्सच्या मागणीत फारशी प्रगती नाही.
धानुका एग्रीटेक, SIS, सोलारा ऍक्टिव्ह फार्मा, LT फूड्स ,JSPL चा तोटा वाढला ( Rs १६३६ कोटींचा वन टाइम लॉस, ऑपरेटिंग प्रॉफिट आहे.), करूर वैश्य बँक, कॅनरा बँक, इन्टलेक्ट DESIGN एरेना, डिक्सन टेक्नॉलॉजी, किर्लोस्कर ऑइल, ग्राइंडवेल नॉर्टन या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले होते.
सुवेन फार्माचे निकाल साधारण होते.
NIIT, महिंद्रा लाईफ स्पेसेसचे निकाल असमाधानकारक होते.
ऍक्सिस बँकेने मॅक्स लाईफमध्ये स्वतः १७% स्टेक खरेदी करायला RBI ने परवानगी नाकारली. आता ऍक्सिस बँकेच्या दोन सबसिडीअरीज ऍक्सिस कॅपिटल आणि ऍक्सिस सिक्युरिटीज मार्फत ३% आणि ऍक्सिस बँक ९% असे १२% स्टेक खरेदी करेल. ऍक्सिस बँक एकूण १९% स्टेक खरेदी करणार आहे. राहिलेला ७% स्टेक ऍक्सिस बँक टप्प्याटप्प्याने खरेदी करेल.
इंडसइंड बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. NII Rs ३२७८ कोटी, प्रॉफिट Rs ६४७ कोटी GNPA २.२१% तर NNPA ०.५२% होते. लोन ग्रोथ २.१% होती. बँकेने कोविडसाठी Rs ९५२ कोटींची प्रोव्हिजन केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. कंपनीला Rs ९५६७ कोटी नफा झाला. कंपनीचे उत्पन्न Rs १.१६ लाख कोटी झाले इतर उत्पन्न Rs ४२३९ कोटी,(एकूण उत्पन्न Rs १.२० लाख कोटी) EBITDA १८९४५ कोटी झाले. EBITDA मार्जिन १७% राहिले. रिलायन्स JIO ला Rs २८४४ कोटी नफा झाला. उत्पन्न Rs १७४८१ कोटी झाले. ARPU Rs १४६ झाले. रिलायन्स च्य रिफाइनींग आणि पेटकेम डिव्हिजनचे निकाल चांगले आले. रिलायन्स डिजिटलचे उत्पन्न Rs २२६७९ कोटी झाले. EBITD मार्जिन २३% राहिले. एकूणच कंपनीची चांगली प्रगती झाली.
आज मी भारती इंफ्राटेलचा चार्ट देत आहे. भारतीय इंफ्राटेलमधील पुलबॅक संपत आला आहे. मंदीचे ट्रेड दिसत आहेत. यामुळे या शेअरमध्ये मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑप्शनमध्ये पुट खरेदी करा.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९६१४ NSE निर्देशांक निफ्टी ११६४२ बँक निफ्टी २३९०० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!