आजचं मार्केट – ५ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ५ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ३९.८६ प्रती बॅरल ते US $ ४०.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.१४ ते US $१=Rs ७३.२९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.७२ VIX १९.६७ PCR १.४० होते.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले तसे USA मध्ये खळबळ उडाली. अर्थात ट्रम्प यांनी सांगितले की माझी तब्येत सुधारत आहे. आणि लवकरच मी पूर्ववत काम बघू लागेन.

USA च्या कोर्टाने ट्रम्प यांच्या H १ B व्हिसासंबंधातील ऑर्डरविषयी प्रतिकूल मत नोंदवले.

USA मधून क्लास ८ ट्रकसाठी चांगली मागणी येत आहे. याचा फायदा भारत फोर्ज आणि मदर्सन सुमी यांना होईल.
TCS ही IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल ७ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर करेल. त्याच बरोबर याच बैठकीत शेअर बायबॅक वर विचार करेल. TCS मध्ये प्रमोटर्सचा स्टेक ७२.०५% आहे. त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये Rs ५११२० कोटींची कॅश आहे. TCS US $ ३ बिलियनचा बायबॅक आणण्याची शक्यता आहे. या बायबॅकमध्ये प्रमोटर्सही भाग घेऊ शकतील.

आज सुप्रीम कोर्टात ‘व्याजावरील व्याज’ PILची सुनावणी झाली. सरकारने ऍफिडेव्हिट सादर केले की Rs २ कोटींपर्यंतच्या शैक्षणिक कर्ज, हौसिंग लोन,ऑटो कर्ज, क्रेडिट कार्ड्स वरील ड्यूज, पर्सनल लोन, यांच्या कर्जावरील मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या मोरॅटोरियम काळातील व्याजावरील व्याज सरकार माफ करेल. ज्या कर्ज घेणाऱ्यांनी कर्जफेड व्यवस्थित केली असेल त्यांना सुद्धा हा फायदा दिला जाईल. यासाठी सरकारवर जादा Rs ७००० कोटींचा खर्च वाढेल. सरकारने या साठी कोविड १९ चा परिणाम सगळ्यात जास्त झाला आहे अशी ८ क्षेत्रे निवडली आहेत. कर्ज देणार्या बँकांच्या असोसिएशनने ४८ तासांची मुदत मागितली . सरकार या योजनेची अमंलबजावणी कशी करणार तसेच या योजनेची मार्गदर्शक तत्वे सरकारने जाहीर करावीत आणि तसे सर्क्युलर काढावे. कामत समितीचा रिपोर्ट कोर्टात सादर करा असे सांगितले. निरनिराळ्या उद्योगांच्या असोसिएशन्सने मांडलेल्या मुद्द्यांवर सरकार, RBI आणि बँक असोसिएशनने ८ दिवसांच्या आंत म्हणजे १२ ऑक्टोबरपर्यंत ऍफिडेव्हिट सादर करावे.

कोर्टाने पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला ठेवली. फेडरल बँक, बंधन बँक, ICICI बँक या बँका रिटेल लोन्स मोठ्या प्रमाणावर देतात त्यांना या ‘व्याजावरील व्याज’ माफीचा फायदा होईल.

रिलायन्स रिटेलमध्ये पुन्हा तीन गुंतवणूकदारांनी स्टेक खरेदी केला. TPG ने ०.४१% स्टेकसाठी Rs १८३१ कोटी, GIC ने १.२२ % स्टेकसाठी Rs ५५१२ कोटींची तर मुबादलानी १.४% स्टेकसाठी Rs ६२४७.५ कोटी गुंतवणुक केली. या प्रकारे आता पर्यंत निरनिराळ्या गुंतवणूकदारांनी रिलायंस रिटेलमध्ये ७.४८% स्टेकसाठी Rs ३२१९८ कोटींची गुंतवणूक केली आहे.

TTK प्रेस्टिजच्या व्हॅक्युम क्लीनरची तुफान विक्री झाली हे व्हॅक्युम क्लीनर आऊट ऑफ स्टॉक झाले.

DR रेड्डीजनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या ट्रायल साठी परवानगी मागितली.

आज हिरो मोटोची सप्टेंबर महिन्यासाठी विक्री २३.३% ने वाढून ७.१५ लाख झाली. आयचर मोटर्सच्या RE ची विक्री ६०५४१ युनिट एवढी झाली. VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्सची विक्री १००४ युनिट एवढी झाली. टाटा मोटर्सच्या JLR ची विक्री १८% ने कमी होऊन १५४५० युनिट एवढी झाली. ऑटो विक्रीतील वाढ भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे याचे लक्षण आहे.

वेदांताची डीलीस्टिंग ऑफर ५ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होऊन ९ ऑक्टोबरला बंद होईल. १३ ऑक्टोबरला एक्झिट प्राईस जाहीर होईल, अन्यथा कंपनी काउंटर ऑफर देईल.जर गुंतवणूकदारांची आणी कंपनीची ऑफर प्राईसवर संमती झाली तर ठरलेल्या रेटने तुमच्या खात्यात २३ ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा होतील. वेदांता हा F & O मार्केटमधील डीलीस्ट होणारा पहिला शेअर असेल. कंपनीने Rs २३००० कोटी या डीलीस्टिंग साठी जमा केले आहेत. यामध्ये कंपनी Rs १३५ ते Rs १४५ प्रती शेअर या दरात डीलीस्टिंग करू शकेल. पण बहुतेक तद्न्यांचा अंदाज आहे की डीलीस्टिंग Rs २१५ ते Rs २५० या प्राईस रेंज मध्ये होईल. या कंपनीत LIC, ICICI PRU, HDFC MF, SBI MF हे शेअरहोल्डर आहेत. हे डिलिडिटिंग यशस्वी होण्यासाठी १३५ कोटी शेअर्स म्हणजे ९०% शेअर्स डीलीस्टिंग मध्ये टेंडर होण्याची आवश्यकता आहे.

हट्सन ऍग्रो ची बोनस इशूवर विचार करण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२० रोजी बैठक आहे.

इलेक्ट्रो कास्टिंग मध्ये श्री कलहस्ती पाइप्सचे मर्जर करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली. श्री कलहस्ती पाइप्सच्या १० शेअर्सना इलेक्ट्रो कास्टिंगचे ५९ शेअर्स मिळतील.

टाटा स्टीलचा UK बिझिनेस विकत घेण्यात ‘JINGYE’ या चिनी कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. याच कंपनीने गेल्या वर्षी ब्रिटिश स्टील ही कंपनी खरेदी केली होती.

स्पाईस जेट ४ डिसेंबर २०२० पासून दिल्ली ते लंडन आणि मुंबई ते लंडन अशी सेवा चालू करणार आहे.
अडानी पोर्टने कृष्णपट्टणम पोर्टमध्ये ७५% स्टेक Rs १२००० कोटींना घेतला आणि पोर्टचे अधिग्रहण पुरे केले.

आज GST कौंसिलची ४२ वी बैठक होती.

सरकार IRCTC मधील १२% ते १५% स्टेक विकणार आहे.

सरकार आता PSU मधील स्टेक ‘सिस्टिमॅटिक डायव्हेस्टमेन्ट प्लान’ या आराखड्याप्रमाणे विकणार आहे. सरकार या प्रकारात छोट्या छोट्या लॉटमध्ये थेट स्टॉक एक्स्चेंच्या माध्यमातून एक विशिष्ट कालावधीमधे ठेवून एका विशिष्ट कालावधीत हा स्टेक विकेल. याला ड्रिबल स्टाईल असे नाव ठेवले आहे. सरकारने यासाठी इंटरमिनिस्टरीयल ग्रुप स्थापन केला आहे. मार्केटमध्ये होणाऱ्या किमतीतील चढउतारांचा फायदा घेण्यासाठी सरकार असे धोरण अवलंबत आहे.

माणसाच्या आयुष्याचा प्रवास जसा वेगवेगळ्या अवस्थातून होतो तेच तत्व शेअरच्या बाबतीत होते. कायमच शेअर वाढत राहतो किंवा कायमच पडत राहतो असे घडत नाही . कंपनीने प्रगती केली की त्या प्रगतीचा शेअरच्या किमतीवर काय परिणाम होईल किंवा एखाद्या खराब बातमीमुळे कंपनीला किती नुकसान सोसावे लागेल यांच्या अंदाजानेच शेअर वाढतो किंवा पडतो. त्यानंतर काही काळ तो किमतीच्या एका रेंजमध्ये ट्रेड होत राहतो. पुन्हा कंपनीत काही घडले की पुढील मूव्ह येते.

अशाच पद्धतीने ALKEM LAB या कंपनीच्या बाबतीत दिसले. Rs १०५० प्रती शेअर या दराने डिसेंबर २०१५ मध्ये IPO आला होता. पहिल्याच दिवशी तो Rs १४१४ पर्यंत गेला होता. नंतर Rs १४०० ते Rs १७०० , Rs १८०० ते Rs २२००, अशा रेंज मध्ये कन्सॉलिडेट झाला. नंतरची प्राईस रेंज Rs २२०० ते Rs २७५० अशी होती . Rs २७०० च्या ब्रेकआऊटनंतर शेअर त्याच पातळीला सपोर्ट घेत आहे. ही प्राईस रेंज Rs ३५०० पर्यंत आहे. मी माझ्या दुसर्या पुस्तकात फिबोनासीविषयी सविस्तर माहिती दिली आहे.  फिबोनासीप्रमाणे हा गुंतवणुकीसाठी योग्य शेअर आहे.

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९७३ NSE निर्देशांक निफ्टी ११५०३ बँक निफ्टी २२३७०

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.