आजचं मार्केट – ६ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ४१.४५ प्रती बॅरल ते US $ ४१.६९ या दरम्यान तर रुपया US $ १= Rs ७३.२२ ते US $१=Rs ७३.४६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.४५ तर VIX १९.६३ तर PCR १.४४ होते.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तब्येत सुधारत आहे आणि त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवले.असे वृत्त आल्यावर आता पॅकेज लवकर येईल ही अपेक्षा वाढली त्यामुळे USA ची मार्केट तेजीत होती. त्यातच कॉरोना हवेतून संक्रमित होत आहे असे बोलले जात आहे. तुर्कस्थानने ब्लॅक सी मध्ये ऑइल & गॅस ड्रिलिंग वाढवले आहे. नॉर्वेमध्ये हरताळ आहे आणि गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये पुन्हा एकदा वादळ येईल अशी भीती आहे. त्यामुळे क्रूडच्या दरात तेजी होती.

HDFC बँकेची क्रेडिट ग्रोथ १६% (YOY) झाली आणि CASA डिपॉझिट्स ४२% झाली. बँकेने दुसऱ्या तिमाहीत चांगली प्रगती होईल असे सांगितले.

इंडस इंड बँकेच्या स्थितीत फारसा बदल झाला नाही.

शोभाची विक्री ४१% ने वाढली. Rs ७७३७ प्रती SQ FT दर मिळाला. शोभणे सांगितले की येणाऱ्या दोन तिमाहीत आमची विक्री वाढतच जाईल.

टायटन ‘एकत्वं’ ही जडजवाहिराची नवीन रेंज दुर्गापूजेच्या मुहूर्तावर लाँच करणार आहेत.

पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रिमंडळाला प्रस्ताव पाठवला आहे की इथॅनॉलची किमत Rs ३ प्रती लिटर वाढवावी. त्यामुळे शुगर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

होमलोनवरील व्याज कमी झाले, रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्पड्युटी खर्चांत बचत झाली. त्यामुळे रिअल्टी सेक्टरमध्ये तेजी येईल असे शोभाच्या आकडेवारीवरून वाटते.

GSFC ने कॅल्शियम नायट्रेटचे उत्पादन सुरु केले.

ब्रिटानिया १:१ या प्रमाणात बोनस डिबेंचर्स देणार तसेच ब्रिटानियाने Rs १२.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. असे बोनस डिबेंचर्स ब्रिटानियाने दिले होते. बोनस डेबेन्चारविषयी सविस्तर माहिती देणारे आर्टिकल माझ्या ‘बोनस ते पण डिबेंचर्स’ या नावाने ब्लॉगवर आहे

रिलायन्स इंडस्ट्रीजने VIOCOM १८ चे सोनीबरोबरचे मर्जर रद्द केले.

सरकारने RBI च्या MPC मध्ये तीन नवीन सदस्यांच्या नेमणुका केल्या. त्यामुळे आता ७ ऑक्टोबर २०२० ला MPC ची बैठक सुरु होऊन ९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० वाजता RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.
टेक्सटाईल आणि गारमेंट्सच्या निर्यातीवर सवलतीच्या योजनेची मुदत सरकारने ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली. अरविंद, हिमतसिंगका सीड्स, गोकुळदास एक्स्पोर्ट्स यांना फायदा होईल.

सरकारने Rs २०००० कोटींची मत्स्यसंपदा योजना जाहीर केली. जपानने QUALITY रिलॅक्सेशन दिले. कोरोना हा प्राण्यांच्या संसर्गातून किंवा नॉनव्हेज खाल्यामुळे होतो हा समज हळू हळू कमी होत आहे. त्यामुळे अंडी मटण चिकन यांच्या सेवनात कपात झाली होती. तसेच रेस्टारंटस आणि बार ओपन नसल्यामुळेही ह्यांना मागणी कमी होती. आता सर्वत्र रेस्टारंटस, बार ओपन करायला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली. याचा फायदा वॉटरबेस, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, वेंकीज, अवंती फीड्स, गोदरेज ऍग्रोव्हेट यांना होईल.

थायरोकेअर या कंपनीचे उत्पन्न १७१% ( QOQ) तर ३७% (YOY) वाढले. तसेच त्यांना गुरुग्राम येथे टेस्टिंग सेंटर उघडण्यासाठी सर्व वैधानिक मंजुरी मिळाल्या. शेअर तेजीत होता.

सरकारने वेगवेगळ्या सवलती जाहीर करूनही ऑइल ब्लॉक्सच्या लिलावात खाजगी कंपन्यांनी भाग न घेतल्यामुळे सर्व ब्लॉक्स PSU ना मिळाले. यात ONGC ला ७ऑइल ला ५ ऑइल ब्लॉक्स मिळाले. या बाबतीतली अधिकृत घोषणा या महिन्याअखेर होईल.

सरकार गॅस इन्फ्रा मध्ये Rs ४ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. १०००० नवीन CNG स्टेशन सुरु करण्याचे लक्ष्य आहे. ५ कोटी नवीन CNG कनेक्शन सुरु करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंगची सोय पेट्रोल पंपांवर सुरु करणार आहे.

रामको सिस्टिम्स ला TOLL लॉजिस्टीक्सकडून सप्लाय चेन ऑपरेशनची ऑर्डर मिळाली.

पिरामल फार्मामधील २०% स्टेकसाठी कंपनीला CAARLYL कडून Rs ३५२३.४० कोटी मिळाले.

सरकारच्या Rs २ कोटीच्या पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक कर्ज, ऑटो लोन, पर्सनल लोन्स, कन्झ्युमर लोन्स, क्रेडिट कार्डड्यूज आणि MSMEना दिलेल्या लोनवरच्या मोरॅटोरियम काळातील व्याजावरील व्याज माफ करण्याच्या निर्णयाचा फायदा बंधन बँकेला चांगला होईल. ही गोष्ट बंधन बँकेच्या चार्टवर ब्रेकआऊटच्या स्वरूपात दिसत आहे. फंडामेंटल्समध्ये झालेल्या बदलामुळे शेअर्सच्या किमतीत प्रथम बदल होतो. हा बदल चार्ट मध्ये दिसतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५७४ NSE निर्देशांक निफ्टी ११६६२ बँक निफ्टी २२८५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.