आजचं मार्केट – ७ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ४१.५५ प्रती बॅरल ते US $ ४२.३२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.३१ ते US $१= Rs ७३.५२ या दरम्यान होते. US $ इंडेक्स ९३.७५ VIX १९.८३ PCR १.५० होते.

ट्रम्पनी कामकाज सुरु करताच पॅकेज देणे निवडणुका होईपर्यंत रहीत केले. याला राजकारणाचा वास येत आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बाजूने वळवणे त्यांना चांगले जमते.तसेच HIB व्हिसाचे नियम अधिक कडक केले जातील असे सांगितले. औषधे आणि औषध उपाययोजना स्वस्त करीन असे सांगितले. त्यांना उत्तम निगोशिएटर म्हणतात. निवडणुकीनंतरच पॅकेज दिले जाईल असे सांगितले. फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी मात्र आता रिलीफ पॅकेज देण्याची नितांत आवश्यकता आहे अन्यथा अर्थव्यवस्था सुरळीत होण्याचा वेग कमी होईल असे सांगितले.

आज IT क्षेत्रातल्या दिग्गज कंपनी टी सी एस ने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. नेट प्रॉफिट Rs ७४७५ कोटी, EBIT Rs १०६८९ कोटी झाले आणि EBIT मार्जिन २६.२% होते. कंपनीकडे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू US $ ८.६ बिलियन आहे. रेव्हेन्यू Rs ४०१३५ कोटी झाले. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ४.८% झाली. ATTRITION रेट कमी झाला. त्याचबरोबर कंपनीने Rs ३००० प्रती शेअर या भावाने Rs १६००० कोटींचा शेअरबायबॅक जाहीर केला. कंपनीने पगार वाढ दिली. तसेच कंपनीने ही मल्टीइअर ग्रोथ ट्रान्सफॉर्मेशनची पहिली पायरी आहे असे सांगितले. कंपनीने Rs १२ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

विप्रो ही IT क्षेत्रातील कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑक्टोबर १३ २०२० रोजी शेअरबायबॅकवर विचार करेल.
फर्टिलायझर कंपन्यांमुळे नैसर्गिक गॅसचा खप ३२% ने वाढला आहे. याचाच अर्थ तेवढे खताचे उत्पादन वाढले आणि खतासाठी मागणीही वाढली. खत उत्पादक कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील असा अंदाज आहे. उदा RCF, FACT, चंबळ फर्टिलायझर

ऍक्शन कन्स्ट्रक्शन ही कंपनी कन्स्ट्रक्शन साधनसामुग्री बनवते. जर रिअल इस्टेट, सिमेंट, हौसिंग कंपन्या चालल्या तर या कंपनीच्या मालाला मागणी येईल. हे शेअर्स मध्यम मुदतीच्या दृष्टिकोनातून चांगले वाटतात असा तद्न्यांचा अंदाज आहे.
मुंबई आणि दिल्लीहून एअर बबल योजनेखाली हिथ्रोला विमान सेवा चालू होईल.

आज रिलयांस रिटेल मध्ये अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीने Rs ५५१२ कोटी गुंतवून १.२०% स्टेक घेतला. आतापर्यंत रिलायन्स रिटेलमध्ये Rs ३७७१० कोटींची गुंतवणूक झाली आहे.

MSTC ही कंपनी स्क्रॅप आणि धातूची वाहतूक करते. 4G आणि 5G चा लिलाव झाला तर या कंपनीला फायदा होईल.
PIL योजनेसाठी इलेकट्रॉनिक्स आणि IT क्षेत्रातील १६ कंपन्यांच्या अर्जाला मंजुरी दिली. या यादीत डिक्सन टेक्नॉलॉजीचे नाव आहे.

SBI चे चेअरमन रजनीशकुमार रिटायर झाले. त्यांच्या जागी तीन वर्षांकरता SBI चे वर्तमान मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिनेशकुमार खरा यांची नेमणूक केली. म्हणजे धोरणात सातत्य राहील. खरांनी कामत कमिटीमध्येही काम केले आहे. MPC मध्ये गोयल, भिडे, आणि वर्मा यांची नेमणूक केली. या MPC ची बैठक ७ आणि ८ ऑक्टोबरला होऊन ९ ऑक्टोबरपर्यंत RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करील.

मजेस्को या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

मारुतीच्या ‘वीतारा ब्रेझ्झा’ या कॉम्पॅक्ट SUV च्या विक्रीने ५.५ लाखाचा आकडा पार केला.

बजाज फायनान्स या कंपनीचा कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा मार्केट शेअर कमी होत आहे. प्रोव्हिजनिंग वाढणार आहे. पण नवीन कस्टमर अक्विझिशन चांगले आहे आज या कंपनीचा शेअर ४% पडला.

टायटन या कंपनीने आपला बिझिनेस प्रीकोविड लेव्हलवर पोहोचला आहे असे सांगितले. ज्युवेलरी सेल्स ९८% वर तर आयवेअर बिझिनेस ५५% वर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत ज्युवेलरीची विक्री ३९० कोटींच्या आसपास झाली. सोन्याची विक्रीही वाढत आहे.

ब्ल्यू स्टार या कंपनीने व्हायरस डिऍक्टिव्हेशन टेकनिक असलेले नवीन प्रॉडक्ट लाँच केले.

CARE ने पंजाब आणि सिंध बँकेचे रेटिंग AA वरून कमी करून AA- केले.

जागतिक CRAMS आणि API च्या मार्केटमध्ये भारताचा ४% मार्केट शेअर आहे. चीनचा १६% मार्केट शेअर आहे. त्यामुळे हा व्यवसाय वाढण्यासाठी भरपूर वाव आहे डिव्हीज लॅब सिंजीन, आणि सोलारा ऍक्टिव्ह फार्मा या कंपन्यांकडे लक्ष ठेवायला हवे असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

१७ ऑक्टोबर २०२० पासून तेजस एक्स्प्रेस ची सेवा सुरु होईल. याचा फायदा IRCTC ला होईल. सरकारने आतापर्यंत १.२१लाख कोटींचा रिफंड ३५.९ लाख करदात्यांना दिला. १.८४ लाख कॉर्पोरेट करदात्यांना Rs ८८००० कोटी रिफंड दिले.
भारत नेट या कार्यक्रमासाठी वायफाय साठी Rs ११००० कोटी मंजूर होणे शक्य आहे. यामुळे स्मार्ट लिंक, D लिंक, ITI , तेजस नेटवर्क, स्टरलाईट यांना फायदा होईल.

D मार्ट च्या व्यवस्थापनाने सांगितले की सध्या कंपनीची ५०% स्टोर्सच ऑपरेशनला आहेत. स्टोर्स किती वेळ ओपन राहावीत यावर कडक निर्बंध आहेत. सध्या फक्त ग्रोसरी आणि FMCG ची विक्री चालू आहे. पण नॉन इसेन्शियल आयटमची विक्री ठप्प आहे. कंपनीची स्टोर्स मोक्याच्या जागी असल्यामुळे रेन्टची फिक्स्ड कॉस्ट ही समस्या आहे. नजीकच्या भविष्यातील उत्पन्नाविषयी अनिश्चितता आहे. नॉन FMCG सेक्टरमधील डिस्क्रिशनरी स्पेंडिंग कमी असल्यामुळे मार्जिन कमी झाले. ग्राहकांची वर्दळ निरनिराळ्या शहरातील, ग्रामीण भागातील लॉकडाऊन, लोकांच्या हालचालींवरील निर्बंध आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम यामुळे कमी झाली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओ मार्ट तसेच टाटाच्या सुपर APP आणि त्यांची ऑनलाईन प्रक्रिया यामुळे D मार्टला स्पर्धा वाढेल. कारण D मार्ट फक्त शॉपमध्ये येणाऱ्या ग्राहकांवर अवलंबून आहे.

चांगले फायनान्सियल्स, चांगले बिझिनेस मॉडेल यामुळे D मार्ट पुन्हा हळू हळू पूर्वपदावर येईल असा तद्न्यांचा अंदाज आहे.

१५ प्रायव्हेट ट्रेन ऑपरेशनसाठी IRB इन्फ्रा, PNC इन्फ्रा, BHEL, IRCTC, GMR, L &T यांच्या सह १२० अर्ज मिळाले

पीडिलाइट :- अनुकूल कच्च्या मालाच्या किमती ( VINYL ACETATE MONOMER) स्वस्त क्रूड ऑइल आणि बिझिनेस रिकव्हरी, आणि भव्यिष्यातील ग्रोथची निश्चितता यामुळे पीडिलाइट या कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन सुधारेल. आणि नेमकी हीच गोष्ट कंपनीच्या चार्टमध्येही दिसत आहे. चार्टमधे ब्रेकआऊट दिसत आहे. हा चार्ट मी ब्लॉगमध्ये देत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९८७८ NSE निर्देशांक निफ्टी ११७३८ बँक निफ्टी २२९६४ वर बंद झाले.

 

 

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.