आजचं मार्केट – ८ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $४२.०४ प्रती बॅरल ते US $ ४२.३७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.२४ ते US $१=Rs ७३.८० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.५७ VIX २०.५८ PCR १.५३ होते.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की प्रत्येक सेक्टर साठी लहान लहान पॅकेजिस जाहीर करायला पाहिजेत. HIB व्हिसासंबंधातील काही नियम कडक केले आणि फीज वाढवली.

सेबीने आज २६८ शेअर्सची सर्किट फिल्टर बदलली. ५% चे १०% तर काही शेअर्समध्ये १०% चे २०% सर्किट केले.
वर्ल्ड बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ९.६% घट FY २०२१ मध्ये होईल असे अनुमान केले आहे. FY २०२२ मध्ये ५.४% सुधारू शकते. २०२२ पर्यंत कोरोनाचा धोका संपलेला असेल. भारताच्या आयातनिर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो.
टायटनने ‘MONTBLANCK ‘ बरोबरचे डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपत असलेले जॉईंट व्हेंचर संपुष्टात आणण्याचे ठरवले आहे आता ते त्यांच्या मुख्य बिझिनेसवर लक्ष केंद्रित करतील.

इन्फोसिसने पब्लिक हेल्थ एजन्सीजसाठी ऑटोमेटेड डेटा सायन्स प्लॅन लाँच केला. इन्फोसिसने ‘BLUE ARKON Icic’ ही USA बेस्ड डेटा अनॅलिटिकस कंपनी US $ १२ कोटींना खरेदी केली. इन्फोसिस आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल १४ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर करेल.

बंधन बँकेची डिपॉझिट १२% ने क्रेडिट ग्रोथ ३%ने वाढली तर CASA रेशियो ३८.२% होता. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.बंधन बँकेने सांगितले की लॉकडाऊनच्या काळात डिसबर्समेंट आणि कलेक्शनमध्ये त्रास होत होता.

TCS चे टार्गेट सर्व तद्न्यांनी Rs ४००० पर्यंत वाढवले. क्लाऊड सिस्टीम वापरल्यामुळे तेजी आली.BFSL रिटेल आणि हेल्थकेअर क्षेत्रात चांगली मागणी आहे. तसेच आमचे HIB व्हिसा वर अवलंबून राहणे कमी झाले. तिसऱ्या तिमाहीत पहिल्यापासून थोडी मंदी असते. पण चौथ्या तिमाहीपासून बिझिनेसमध्ये चांगली वाढ होईल. TCS च्या चांगल्या निकालांमुळे आज IT क्षेत्रातील लार्जस्केल ( विप्रो, इन्फोसिस, कोफोर्ज) तसेच मिडकॅप IT ( माईंड ट्री. पर्सिस्टंट सिस्टिम्स, सोनाटा सॉफ्टवेअर) या कंपन्यांमध्येही लक्षणीय तेजी होती.

सरकारने जाहीर केले की ऑक्टोबर अखेर SCI ( शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या डायव्हेस्टमेंटसाठी व्हर्चुअल रोड शो पुरा केला जाईल. नोव्हेंबरअखेर बीड मागवल्या जातील. FY २१ मध्ये SCI ची डायव्हेस्टमेन्ट पूर्ण केली जाईल.
सरकार २०२३ पर्यंत कोस्टल रोड डेव्हलपमेंटसाठी Rs ४५००० कोटी खर्च करेल. २००० किलो मीटर्सचे ४ लेन, ६ लेनचे हायवे बनवले जातील.

आज विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की ऑक्टोबर अखेर २ लाख एवढी पॅसेंजर ट्राफिक होऊ शकते. नोव्हेंबर डिसेंबर २०२० पर्यंत प्रवासी हवाई वाहतूक प्रीकोविड लेव्हलला येईल. डोमेस्टिक उड्डाणांसाठी ७५% क्षमतेने उड्डानांची परवानगी दिली जाणे शक्य आहे.

GST कौन्सिलची १२ ऑक्टोबर २०२० रोजी बैठक आहे. या बैठकीत कॉम्पेन्सेशन सेस वर चर्चा होईल. टू व्हिलर्सवरील आणि हेल्थ इन्शुअरन्स प्रीमियमवरील GST चे दर कमी करण्याचा प्रस्ताव फिटमेन्ट पॅनल समोर नसेल.

वेदांताच्या डीलीस्टिंग ऑफरमध्ये ३.३ कोटी शेअर्ससाठी Rs ३२० प्रती शेअर या भावाने बीड आल्या तर ६२ कोटी शेअर्ससाठी Rs १६० प्रती शेअर या भावाने ऑफर आली. LIC कड़े वेदांताचे २५ कोटी शेअर्स आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सच्या बीड या डीलीस्टिंग मध्ये परिणामकारक ठरू शकतात.

लंडनस्थित AMC कंपनी कालरॉक कॅपिटल आणि यूएई मधील इन्व्हेस्टर मुरारीलाल जालान यांची जेट एअरवेजचे मालक म्हणून निवड झाली. त्यामुळे जेट एअरवेजच्या शेअर्सना आज अपर सर्किट लागले.

IT क्षेत्रातील दुसरी कंपनी विप्रो १३ ऑक्टोबर २०२० रोजी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल आणि शेअर बायबॅक वर विचार करेल. या कंपनीने Rs ११००० कोटींचा बायबॅक २०१७ मध्ये केला होता. कंपनीच्या बॅलन्सशीटवर Rs २९००० कोटी कॅश आहे.

मजेस्कोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने आज ७४.७० लाख शेअर्स बायबॅक (टेंडर ऑफर रूटने) साठी प्रती शेअर Rs ८४५ या दराने Rs ६३१.३० कोटी खर्च करायला मंजुरी दिली.

आज मी तुम्हाला ‘हॅवेल्स’ या कंपनीचा एक वर्षांचा चार्ट देत आहे.हा शेअर Rs ७९६ प्रती शेअर वरून Rs ४४७ प्रती शेअरपर्यंत पडला होता. Rs ४६० प्रती शेअर किमतीला डबल बॉटम फॉर्म झाला. म्हणजेच ‘W’चा आकार तुम्हाला चार्ट मध्ये दिसतो आहे. सातत्याने हायर टॉप आणि हायर बॉटम या प्रमाणे शेअरमध्ये तेजीची चाल दिसते. या बरोबर व्हॉल्यूमही चांगले आहेत आणि बर्याच दिवसाच्या कन्सॉलिडेशननंतर ब्रेक आऊट झाला आहे. फिबोनासीप्रमाणे
६१.८% प्रमाणे लेव्हलसुद्धा Rs ७२० येते.

आज विमा कंपन्यांचे APE ( अन्युअलाज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट) चे आकडे जाहीर झाले.

HDFC लाईफ +४३.२% मॅक्स लाईफ +१६.३% SBI लाईफ -४.४% ICICI PRU -२३.९% असे आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०१८२ NSE निर्देशांक निफ्टी ११८३४ बँक निफ्टी २३१९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – ८ ऑक्टोबर  २०२०

 1. Abhishek Poojari

  Aaji… I am really impressed by your knowledge and voice…I have comment 1st time on anybody page..

  Reply
 2. गोविंद

  आपलं ब्लॉग ओव्हरलुक केला , छान वाटले वाचून. एक्चुअली माझी शंका छोटीशी आहे व ती निरसन करण्यासाठी नेटचा शहर घेत होतो तेव्हढ्यात आपला ब्लॉग नेटवरून मिळाला. यापुढे नेहमी मी येथे येत राहणार. अगोदर शेअर बद्दल माझा प्रश्न लिहितो. खालीलप्रमाणे …
  डीम्याट अकाउंटमध्ये डिलिव्हरीत पेंडिंग असलेले शेअर कसे विकतात. ब्रोकर पावर ऑफ ऍटर्नी साईन करून मागत आहे. मीन्स ब्रोकरलाही परमिशन नाही. मग ते शेअर असतात कोणाकडे. होल्डिंग विंडोत स्क्वेअर ऑफ ऑप्शन युज केला तर ‘आर एम एस ऑर्डर रिजेक्टेड’ असा मेसेज ऑन बोर्ड ट्रेडिंग करताना येत असतो. मला माहिती मिळाली कि शेअर अमाऊंट व्यतिरिक्त २०% एक्स्ट्रा अमाउंट अकाउंट मार्जिन मध्ये असावी लागते. तीही मी मेंटेन केलेली आहे तरीपण ‘आर एम एस ऑर्डर रिजेक्टेड’ असा मेसेज येत आहे. हे शेअर ऑथॉरिटी नेमकी कोणाकडे असते. CDSL मध्ये माझे रजिस्ट्रेशन झालेले आहे. ऑनलाईन शेअर दुसऱ्या डीम्याट मध्ये ट्रान्सफर करता येईल का. कारण दुसऱ्या डीम्याट ला हा प्रॉब्लेम आलेला नाही. कृपाकरून कोणाकडे यावर काही लिंक किंवा काही सोल्युशन मिळेल का?

  Reply
  1. surendraphatak

   शेअर्स dipositary कडे असतात cdsl किंवा nsdl किंवा स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन कडे असतात.तुमचे बाकीचे प्रश्न on line trading च्या बाबतीत आहेत मी on line करत नाही त्यामुळे sorry मी आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यास असमर्थ आहे

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.