आजचं मार्केट – ९ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ४३.१२ प्रती बॅरल ते US $ ४३.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०५ ते US $ १= Rs ७३.२४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.५७ VIX २०.३२ PCR १.५९ होते.

आज USA ची मार्केट्स तेजीत होती. सोने आणि चांदी यांत तेजी होती. आज पासून चीनमधील मार्केट्स आठवड्याभराच्या सुट्टीनंतर उघडली.

भारतीय मार्केट्समध्ये तेजीचा ट्रेंड आजही सुरु राहिला. आज RBI ने आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. रेपो रेट ४%, रिव्हर्स रेपो रेट ३.३५%, CRR ३%, बँक रेट ४.२०% आणि SLR यात कोणताही बदल केला नाही. RBI ने त्यांचा FY २०२१ आणि FY २०२२ साठी स्टान्स अकोमोडेटिव्ह ठेवला. FY २१ मध्ये GDP ग्रोथ रेट -९.५% असेल पण वर्षाच्या चौथ्या तिमाहीत GDP ग्रोथ रेट + टिव्ह होऊ शकतो . रब्बीचा चांगला हंगाम, व्यवस्थित पेरण्या, पाण्याची मुबलकता या मुळे या वर्षी धान्याचे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज आहे. E -कॉमर्स सेक्टरमध्ये चांगली प्रगती होत आहे. सप्लाय चेनमध्ये सुधारणा होत आहे.FMCG, ऑटो,र्स पॅसेंजर वेहिकल, फार्मा, ट्रान्सपोर्ट या क्षेत्रात चांगली रिकव्हरी दिसत आहे.

सप्टेंबरमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे पण ऑक्टोबर २०२० पासून महागाई कमी होईल.त्यामुळे या पॉलिसीमध्ये ग्रोथवर लक्ष केंद्रित केले आहे. RBI ने Rs १००००० कोटींचे ऑन टॅप TLTRO ४% व्याजावर ३ वर्षाच्या मुदतीचे मार्च २०२१ पर्यंत करू असे सांगितले. ह्या TLTROचे पैसे बँका कॉर्पोरेट बॉण्ड्स, डिबेंचर्स, कमर्शियल पेपर्स यामध्ये गुंतवू शकतात किंवा विशिष्ट सेक्टर्सना कर्ज देऊ शकतात.

होल्डिंग टू मॅच्युरिटीची मर्यादा २२% आणि मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली.

केंद्र सरकारला देण्यात येणाऱ्या (वेज & मीन्स) ऍडव्हान्सेस Rs १२५००० कोटीची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली. आणि राज्यांसाठी वेज आणि मिन्समध्ये केलेली ६०% वाढीची मुदत मार्च २०२१प र्यंत वाढवली. पुढच्या आठवड्यात RBI Rs २०००० कोटींचे OMO करेल. कोओरिजिनेशन फॅसिलिटीची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली. त्यामुळे NBFC आणि हाऊसिंग लोन देणार्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

बँकांनी एका व्यक्तीला त्याचा टर्नओव्हर ५० कोटी असला तर लोन देण्याची रक्कम Rs ५ कोटींवरून ७.५ कोटी केली. वेटेड रिस्क ऍव्हरेजसाठी सध्या लोनची साईझ आणि लोन टू व्हॅल्यू रेशियो हे दोन पॅरामीटर होते. आता फक्त लोन टू व्हॅल्यू हा रेशियो बघितला जाईल. हा नियम नवीन हौसिंग लोनला ३१.०३.२०२२ पर्यंत अप्लिकेबल आहे.

एक्सपोर्टर्सची CAUTION लिस्ट आता ऑटोमेटेड राहणार नाही. RBI केस बाय केस स्टडी करून ही लिस्ट जाहीर करेल.
डिसेम्बरपासून २०२० पासून RTGS ची सेवा २४X ७ चालू राहील.

आज क्लीक्स ग्रुपने लक्ष्मी विलास बँकेसाठी नॉन बाइंडिंग ऑफर दिली. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये चांगली तेजी आली.
GSFC ने बोरोनेटेड कॅलसियम नायट्रेट आणि कॅलसियम नायट्रेट ही खते जी आतापर्यंत आयात होत होती ती मार्केटमध्ये लाँच केली.

डिक्सन टेक्नॉंलॉजीने नोइडामध्ये नवीन प्लांट उघडला.

JK सिमेंटने नवीन ग्राइंडिंग फॅसिलिटी सुरु केली.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामिनने Rs ७९९ कोटींचा QIP केला.

रामको सिमेंटने ओडिशामध्ये नवीन प्लांट सुरु केला.

सरकारने १०००० टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली.

आज वेदांताच्या डीलीस्टिंग आवश्यक असलेल्या १.३५ कोटी शेअर्ससाठी बीड मिळाल्या. पण या वेगवेगळ्या किमतीला आलेल्या आहेत. डीलीस्टिंग प्राईस किंवा काउंटर ऑफर मंगळवारी जाहीर केली जाईल

मी आज तुम्हाला L &T चा चार्ट देत आहे हा डेली चार्ट आहे. गेल्या ५ दिवसाच्या मंदीनंतर शेअरने ब्रेकआउट दिला आहे शॉर्टटर्ममधे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

१२ ऑक्टोबर २०२०ला माझगाव डॉक्स आणि UTI AMC चे लिस्टिंग होईल. लिखिता इन्फ्राचे लिस्टिंग १५ ऑक्टोबर २०२० ला होणार आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०५०९ NSE निर्देशांक निफ्टी ११९१४ बँक निफ्टी २३८४६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ९ ऑक्टोबर  २०२०

 1. Jayant Madhukarrao Patil

  Phatak Madam,
  Hope your health is in good spirits.
  On 12th October, we did not receive your video & blog on Stock Market.

  Wishing you speedy recovery & looking forward to hear your wonderful voice very soon!!
  Thanks for your selfless work.
  Regards

  Jayant Patil

  Reply
  1. surendraphatak

   Hi, my health is ok and thank you for your concern. I was not able to post blog or video due to the power cut..

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.