आजचं मार्केट – १३ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १३ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ४१.६६ प्रती बॅरल ते US $ ४२.६९ प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ७३.२७ ते US $१= Rs ७३.४१ या दरम्यान VIX २१.१२ US $ निर्देशांक ९३.४८ PCR १.५३ होते

काल इलेक्ट्रीसिटीचा गोंधळ होता त्यामुळे मी ब्लॉग किंवा व्हिडिओ देऊ शकले नाही. माझा नाईलाज झाला. आपणाला वाट पाहावी लागली त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करत आहे. या लाईटच्या गोंधळामुळे निफ्टी पुन्हा काल १२००० झाला हे पाहण्याची संधी मात्र हुकली याचे वाईट वाटले. मार्च २०२० नंतर पुन्हा एकदा आपण ४०००० सेन्सेक्स आणि १२००० निफ्टीच्या पातळीवर पोहोचलो आहोत.

रिलायन्स जिओने जुलै २०२० मध्ये ३५.५४ लाख नवीन ग्राहक जोडले. व्होडाफोनने ३७.२६ लाख ग्राहक गमावले. तर भारती एअरटेलने ३२.६० लाख ग्राहक जोडले. पण ग्राहक वाढीचा भारतीचा वेग जास्त आहे. पूर्वी भारतीचे ग्राहक JIO मध्ये जात होते. स्पर्धा शिगेला पोहोचली होती पण आता तसे दिसत नाही. स्पर्धेमुळे भारतीच्या शेअरमध्ये चांगले करेक्शन आले आहे. ही चांगली संधी आली आहे असे समजावे. Rs ४००चा सपोर्ट शेअरला मिळत आहे.

झोमॅटो ही इन्फोएज ची सबसिडीअरी आहे. ही फूड डिलिव्हरी करते. फूड डिलिव्हरीमध्ये १५% ते २५% ग्रोथ झाली. ही ग्रोथ प्रीकोविड लेव्हलला पोहोचली. परिणामी इन्फोएज चा शेअर वाढला.

तेलंगाणा आणि आंध्रमध्ये सिमेंटचे भाव वाढण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटमध्ये आलेली तेजी सरकारने दिलेले उत्तेजन, गव्हर्मेंट स्पेंडिंग, स्टॅम्प ड्युटीमधील कपात यामुळे सिमेंटची मागणी वाढत आहे. आज सिमेंटचे शेअर्स चांगलेच तेजीत होते. त्यात अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, JK सिमेंट, रामको सिमेंट यामध्ये अधिक तेजी होती.

SHALBY चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. मार्जिन वाढले. बेड ऑक्युपन्सी ४१% झाली. म्हणून हा शेअर तर वाढलाच पण अपोलो हॉस्पिटलचा शेअरही वाढला.

राणे ब्रेक्स १५ ऑक्टोबर २०२० ला बायबॅक जाहीर करणार आहे. त्यामुळे राणे ग्रुपचे शेअर्स तेजीत होते.उदा :- राणे होल्डिंग, राणे एंजिन

लक्ष्मी विलास बँक राईट्स इशूसाठी १५ ऑक्टोबर २०२० रोजी मीटिंग घेणार आहे.

ITC ने लॉकडाउनच्या काळांत ४१ नवीन प्रॉडक्टस लाँच केले. FMCG बिझिनेसमध्ये चांगलीच ग्रोथ आहे. आमचे ब्रॅण्ड्स प्रसिद्ध आहेत. पेपर व्यवसाय चांगला चालू आहे. आता हॉटेल्स ओपन करायला परवानगी मिळाल्यामुळे तोही विभाग तेजी पकडतो आहे.करोनामुळे सिगारेट व्यवसायात मंदी आहे.पण मार्केट आमच्या शेअरला योग्य तो भाव देत नाही असे व्यवस्थापनाने सांगितले. काल आणि आज ITC चा शेअर तेजीत होता.

सुप्रीम कोर्टाने वेदांताला थोडासा दिलासा दिला. जे आयर्न ओअर त्यांनी गोव्याच्या खाणीतून काढले आहे ते सहा महिन्याच्या कालावधीत वेदांता ट्रान्सपोर्ट करू शकते.

आज बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व दोन्हीही शेअर्सच्या चार्टमधे ब्रेकडाऊन दिसला. सध्याचे वातावरण पाहता बजाजने लोनच्या अटी किंवा नियम कडक केले आहेत असे जाणवले. त्यामुळे लोनग्रोथ कमी होईल असे वाटून दोन्हीही शेअर्समध्ये मंदी होती.

गोदरेज प्रॉपर्टीजने बंगलोरमध्ये सर्जापूर येथे १.६ मिलियन SQ फीट म्हणजे सुमारे १५ एकर एवढी जमीन हौसिंग प्रोजेक्टसाठी खरेदी केली आहे त्याचप्रमाणे कल्याण येथेही जमीन घेतली आहे. गोदरेज फंड मॅनेजमेंटने सेंच्युरी ग्रुपकडून Rs ७०० कोटीना जमीन खरेदी केली. त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती.

SRF ने QIP ची फ्लोअर प्राईस Rs ४१६८.७३ एवढी ठरवली. ही CMP च्या ४.५८% डिस्काउंटवर असल्यामुळे आज शेअरमध्ये मंदी होती पण QIP ला चांगला प्रतिसाद मिळाला.

कोलगेट २१ऑक्टोबर २०२० ला दुसऱ्या तिमाहीचे निकाल आणि अंतरिम लाभांशावर विचार करेल. या अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट २ नोव्हेंबर २०२० असेल.

ब्रिटानिया तामिळनाडूमध्ये येत्या ७ वर्षांमध्ये Rs ५५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

ICICI लोम्बार्डचा प्रीमियम ७.३% ने वाढला तर न्यू इंडिया इन्शुअरन्सचा ०.५% ने वाढला.

विप्रोचे प्रॉफीटस YOY ३.४०% ने कमी झाले.पण QOQ मार्जिन्स वाढले, ३.१७% प्रॉफिट वाढले. कॅशफ्लो वाढला आणि सगळ्या पॅरामीटर्समध्ये प्रगती झाली. आमची ग्रोथ तिसऱ्या तिमाहीत १.५% ते ३.५% या दरम्यान असेल. विप्रो Rs ४०० प्रती शेअर या दराने २३.७५ कोटी शेअर्सच्या बायबॅकवर Rs ९५०० कोटी खर्च करणार.प्रमोटर ग्रुप आणि त्यांचे सदस्य या बायबॅकमध्ये भाग घेणार आहेत. (माझ्या ब्लॉग नंबर ५८ मध्ये शेअर बायबॅक विषयीची सविस्तर माहिती दिली आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकांत बायबॅक ही कॉर्पोरेट एक्शन दिली आहे)

केमिकल शेअर्समधली तेजी काही प्रमाणात मंदावली आहे असे वाटत आहे आता मिडकॅप केमिकल शेअर्सकडे लोकांचे लक्ष गेले आहे असे दिसते. केमिकल शेअर्स हे कमोडिटीप्रमाणेच समजले पाहिजेत. त्यांचा ROC ( रिटर्न ऑन कॅपिटल) आणि ROE (रिटर्न ऑन इक्विटी) जास्त नसतात. या उद्योगाला वर्किंग कॅपिटल जास्त लागते. सुरुवातीला या कंपन्यांचे मार्जिन खूप होते. आता पूर्वी एवढे मार्जिन मिळत नाही. शेअर्सचे भावही खूप वाढले आहेत. केमिकल्सच्या सप्लायमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. जे देश चीनकडून माल घेत होते त्यांना माल मिळण्यासाठी त्रास होऊ लागला. म्हणून बऱ्याच देशांनी चीन+१ असे धोरण स्वीकारले. भारताकडून काही प्रमाणात माल घ्यायला सुरुवात केली. चीन आणि भारत यांच्यातील ताणतणाव, चीन USA ट्रेड वॉर,करोनामुळे आलेले हेल्थ प्रॉब्लेम्स ही सर्व कारणे केमिकल क्षेत्रातल्या तेजीला कारणीभूत झाली. आता तेजी होणार नाही असे नाही पण तेजीचा वेग मंदावेल.

थिरूमलै केमिकल्स सारख्या छोट्या शेअर्सकडे लोकांचे लक्ष गेले आहे असे दिसते. या शेअरचा चार्ट चांगला आहे. शेअरने ब्रेकआउट दिला आहे.तुम्ही जर चार्ट कडे बारकाईने बघितलेत तर तुम्हाला असे दिसेल की ज्या ज्या वेळेला करेक्शन आले .तेव्हा हा शेअर प्रिव्हियस लो पाईण्टच्या खाली गेला नाही पण जेव्हा तेजी आली तेव्हा मात्र या शेअरने पूर्वीचा हाय पाईंट क्रॉस केला आहे. ज्यावेळेला हा शेअर Rs ८२च्या वर ट्रेड करेल त्यानंतर या शेअरमध्ये चांगली तेजी येईल. असे हा चार्ट दर्शवतो. मी थिरूमलै केमिकलचा डेली चार्ट आपल्याला देत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०६२५ NSE निर्देशांक निफ्टी ११९३४ बँक निफ्टी २३४९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.