आजचं मार्केट – १४ ऑक्टोबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १४ ऑक्टोबर  २०२०

आज crude – ४२.१५ -४२.६३ या दरम्यान तर रुपया — ७३.३० ते ७३.४५ या दरम्यान तर डॉलर इंडेक्स ९३.६२ ,vix – २०.७१ PCR – १.५० होते

चायनीज डेटा चांगला आला इन्फ्रास्ट्रक्चर spending वाढवले म्हणून धातूमध्ये तेजी आली युरोपियन युनियननी price आणि quality तत्वावर अल्युमिनियम extrusions वर 48 % टॅरिफ लावायचे ठरवले

TVS मोटर्स मध्ये LIC नी त्यांचा स्टेक 3.18 वरून 4.87 केला आणि 20 ऑक्टोबरला डिव्हिडंड साठी बैठक आहे

Mould tech – 17 ऑक्टोबर ला rights साठी बैठक आहे

L&T 20 octcber ला डिव्हिडंड जाहीर करणार आहे यासाठी रेकॉर्ड डेट 28 ऑक्टोबर आहे

IRCTC सणासुदीला 392 गाड्या सोडणार आहे पण OFS ची तलवार लटकत आहे

टाटा स्टील लॉंग प्रॉडक्ट आणि कर्नाटक बँक याचा risult चांगला आला A B Money, GNA Axles(6) Federal Mogul नी 25% discount वर OFS आणून सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही

सारेगमचा चार्ट चांगला आहे ब्रेकआउट आहे त्यांचे CARVAAN हे प्रॉडक्ट चांगले आले आहे

आज डिफेन्स सेक्टरची 1200 प्रॉडक्टची निगेटिव्ह लिस्ट जाहीर होणार आहे म्हणजे या प्रॉडक्टची आयात होणार नाही MAKE IN INDIA या योजनेखाली या वस्तू भारतातच बनतील याचा डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल

NMDC च्या Nagarnar plant च्या डीमर्जरला आज कॅबिनेटची मंजुरी मिळेल नंतर हा प्लांट विकला जाईल

चहाच्या किंमती 60%नी वाढल्याने HUL नी सुद्धा किंमती वाढवायचे ठरवले आहे tata consumer ही किमती वाढवणार म्हणून दोन्ही शेअर तेजीत होते (११)ISPRL(Indian Strategic Petroleum Reserves Limited) क्रूड ऑइल स्टोअरेज फॅसिलिटी Revamp करणार आहे त्यासाठी कॉन्सल्टंट म्हणून EIL ची निवड झाली आहे

इथेनॉलच्या पॉलिसीची समीक्षा कॅबिनेट करणार आहे 2026 पर्यंत 12 % ते 15 % इथेनॉल ब्लेंडिंग आणि 2030 पर्यंत 20% ब्लेंडिंग करावे आणि वेगवेगळ्या धान्याचा उपयोग इथेनॉल बनवण्यासाठी करावा याबाबतीत ऑटोमोबाईल इंडस्ट्री बरोबर चर्चा सुरू आहे साखरेच्या निर्यातीसाठी 3 वर्ष परवानगी द्यावी असा विचार आहे

व्याजावरील व्याज माफ करण्याबद्दल सरकारने 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत सर्क्युलर काढावे . बँकांनी कर्जे NPA म्हणून जाहीर करण्यावरिल मनाई चालू राहील.रिजर्व बँकेच्या वकिलांनी एक दिवसाची मुदत मागितली. व्याजमाफी योजना सरकारने शक्य तितक्या लवकर लागू करावी.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने IPO साठी अर्ज दिला. हा IPO 20 ऑक्टोबर 2020 ते 22 ऑक्टोबर 2020 दरम्यान ओपन असेल. याचा price band 34 ते ३५ असेल

सप्टेंबर 2020 साठी WPI 1.32% होता आवश्यक वस्तू ,खाद्यपदार्थ, भाज्या खूपच महाग झाल्या.

PAGE इंडस्ट्रीज च्या भारतातील युनिटची US एजन्सीने मानवाधिकार व्हायोलेशन संबंधात चौकशी सुरू केली.त्यामुळे शेअर पडला.

देशांतर्गत प्रवासी वाहतुक 65.8% कमी झाली.

SBI कार्ड्सने नविन ऑफर launch केली business pri covid पातळीला पोहोचला

इन्फोसिसला दुसऱ्या तिमाहीत ₹४८४५ कोटी प्रॉफिट झाले . ही yoy २०.५% तर QOQ १४.४५% वाढ आहे. कंपनीने ₹ १२ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. १ जानेवारी २०२१ पासून कर्मचाऱ्यांना पगारवाढ, बढती दिली जाईल . आम्ही ग्राहकांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी मदत केली. रेव्हेन्यू गायडन्स २% वरून ३% केला.

टाटा अलेक्सिचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. उत्पन्न ₹ ४३० कोटी ,नफा ₹७८.८८ कोटी झाला.

आज डाबर इंडिया चा चार्ट देतीये. चांगल्या correction नंतर breakout झाला आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०७९५ NSE निर्देशांक निफ्टी ११९७१ बँक निफ्टी २३८७४ वर बंद झाले .

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.