आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US$ ४२.२३ प्रती बॅरल ते US $ ४३.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=₹७३.२२ ते US $ १=₹ ७३.३८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.५०, VIX २२.१८ PCR १.४२ होते.

आज इटली,पोर्तुगाल,उत्तर आयर्लंड फ्रान्स या देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाले. विशेषतः फ्रान्समध्ये १ महिन्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला. ही कॉरोनाच्या पुनरागमनाची चाहूल आहे असे मानल्यामुळे युरोप, UK, USA, फ्रान्स, युरोपातील इतर देशामधील मार्केटस कोसळली. त्यामुळे २ वाजण्याच्या सुमाराला आपलेही मार्केट पडायला सुरुवात झाली आणि शेवटी सेन्सेक्स १११५ आणि निफ्टी ३०९ पाइण्ट पडला.

ARHC(अफॉरडेबल रेंटल हौसिंग कॉम्प्लेक्स) या योजनेअंतर्गत (या योजनेवर ₹६०० कोटी खर्च होतील आणि ३ लाख लाभधारक असतील) २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सामील होतील.

रेंटल हौसिंगसाठी एक पोर्टल लाँच केले.खाजगी कंपन्यांनी यात भाग घ्यावा म्हणून EOI मागवले. FAR (फ्लोअर एरिया रेशीयो) किंवा FSI(फ्री फ्लोअर स्पेस इंडेक्स) मध्ये सवलत दिली जाईल.जे हौसिंग कॉम्प्लेक्स रिकामे असतील आणि सरकारबरोबर (JNRUM, PMAY, राज्य सरकारांच्या योजना) बांधले असतील तर ते भाड्याने देऊ शकतात. खाजगी कंपन्यांच्या रिकाम्या जमिनीवर जर इमारती बांधत असतील तर त्यांना या सवलती दिल्या जातील . कन्सेशनल प्रोजेक्ट फायनान्स,फ्री ऑफ कॉस्ट ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी दिली जाईल.यामुळे शहरातील गरीब आणि प्रवासी मजूर भाग घेऊ शकतील. याचा फायदा शोभा,गोदरेज,जय कॉर्प,अजमेरा रिअँलिटीज, प्रेस्टिज इस्टेट यांना होईल.

गुजरात सरकारने ₹१०००० कोटींचा ‘ग्रीन फिल्ड smelter’ लावण्यासाठी हिंदुस्थान झिंकबरोबर करार केला.

मिश्र धातू निगम मधील डायव्हेस्टमेंटसाठी कायदेविषयक सल्लागाराची नेमणूक केली. हा कायदेविषयक सल्लागार IMG(इंटर मिनिस्टरीयल ग्रुप) समोर प्रेझेन्टेशन देईल.

IRCTC मधील स्टेक सेल करण्यासाठी HSBC सकट तीन बँकर्सची नेमणूक केली.

UP राज्य सरकारने PVR, इनोक्स लेजर यांना लायसेन्स फी माफ केली.

टाटा स्टील आणि टाटा स्टील BSL या दोन्ही कंपन्यांनी २०० DMA पार केला.

अपोलो हॉस्पिटल्स सरकारबरोबर कॉरोनावरील vaccine सेंटरसाठी करार करणार आहे.

लिखिता इन्फ्रास्त्रकचर चे ₹१३०वर म्हणजे ८% प्रीमियमवर झाले

देशात सिनेमा थिएटर्स ५०% क्षमतेने उघडायला परवानगी दिली.

मूडीज ने भारताच्या रिअल GDP ग्रोथचे FY21 साठी -११.५% FY22 साठी १०.६% तर मध्यम कालावधीत ६% राहण्याचे अनुमान केले आहे.

टाटा पॉवरने त्यांच्या रिन्यूएबल एनर्जी assetसाठी InVit साठी सेबी कडे अर्ज केला. अँकर इन्व्हेस्टर्सनी assets चा DUE DILIGENCE सुरू केला.जुलै २०२० मध्ये टाटा पॉवरने InVit लाँच करण्याची घोषणा केली होती.

अडानी ग्रीनने 205MV चे जादा सोलर assets खरेदी करण्याचा करार केला.

राणे ब्रेक्स ने ₹८२५ प्रती शेअर (CMP वर १९.५%) या भावाने ₹२२ कोटींचा शेअर बाय बॅक जाहीर केला. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. या बाय बॅकची साईझ छोटी आहे. (१२) JLR इंडियाने नवीन लँडरोव्हर ‘difender’ लाँच केली.

दिल्ली आणि NCR मध्ये AQI(एअर क्वालिटी इंडेक्स) ३०० च्या वर गेला असल्यामुळे एअर प्युरीफायरसाठी मागणी वाढत आहे. याचा फायदा ब्ल्यू स्टार, हवेल्स, व्होल्टास, यांना होईल.पॅनासोनीक, युरेका, यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

लक्ष्मी विलास बँकेने ₹५०० कोटींचा राईट्स इशू जाहीर केला.

सरकार येत्या डिसेंबरपर्यंत PSU बँकांमध्ये भांडवल गुंतवेल. गुंतवणुकीची रक्कम प्रत्येक बँकेच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यावर निश्चित केली जाईल.

टाटा इलेक्सीला गूगल widewine ने कन्टेन्ट सर्टिफिकेशन पार्टनर बनवले.

बुलेट ट्रेनसाठी ६३% जमिनीचे अधिग्रहण पुरे होण्याची शक्यता आहे.नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत या ट्रेनचे काम सुरू होईल.

आज माईंड ट्री या IT क्षेत्रातील कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.कंपनीला ₹२५३.७० कोटी नफा(८७.९०% वाढ YOY), उत्पन्न ₹१९२६ कोटी(०.६% वाढ YOY) US $ रेव्हेन्यू US$२६१ मिलियन (३.७% वाढ yoy) झाले.कंपनीने ९ नवीन क्लायंट मिळवले. US$१०मिलियन चा एक क्लायंट जोडला.कंपनीने ₹७.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
हाथवे केबलचे निकाल चांगले आले.

मी आज तुम्हाला BHEL चा चार्ट देत आहे हा चार्ट 2003 पासून 2020 या कालावधीचा आहे यात 2007-2008 मध्ये शेअर्स तेजीत होता तेव्हा 2000चा भाव होता त्यानंतर स्प्लिट झाले त्याचा भाव 400 रुपये झाला 2010-2011मध्ये स्थिती ठीक होती नंतर शेअरमध्ये सुरू झालेली घसरण थांबण्याचे नाव नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७२८ NSE निर्देशांक निफ्टी ११६८० बँक निफ्टी २३०७२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.