आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ४२.५१ प्रती बॅरल ते US $ ४२.८० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.३१ ते US $१= Rs ७३.३८ या दरम्यान US $ निर्देशांक ९३.८१ VIX २१.८५ PCR १.३२ होते.

ओपेक+चा वाढता पुरवठा आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखा प्रादुर्भाव यामुळे कमी झालेली मागणी यामुळे आज क्रुडमध्ये मंदी होती.

आज HCL टेकचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. कंपनीचे उत्पन्न Rs १८५९४ कोटी (४.२% वाढ), प्रॉफिट Rs ३१४० कोटी ( ७.४% वाढ), कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ४.५% तर EBIT मार्जिन २१.६% होते. कंपनीने FY २१ साठी EBIT मार्जिनचा गायडन्स २०%-२१% तर उत्पनातील वाढीचा गायडन्स १.५% -२.५% दिला. कंपनीने १५ नवीन डील केले. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरीम लाभांश जाहीर केला. या चांगल्या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

माईंड ट्रीच्या व्यवस्थापनाने सांगितले की कॉस्ट कमी करण्याची मोहीम ते राबवत आहेत. CPG, इन्शुअरन्स, टेक्नॉलॉजी या क्षेत्रात ग्रोथ झाली. ट्रॅव्हल आणि टुरिझमच्या क्षेत्रात नवीन शूट दिसत असले तरी ग्रोथ येण्यासाठी अजून किमान तीन तिमाही एवढा काळ लागेल. आमची प्रगती UK, आयर्लंड, युरोप आणि USA मध्ये चांगली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सेक्टरमध्ये डिजिटलायझेशन वर जोर आहे. कलौड टेक्नॉलॉजीचा उपयोग वाढत आहे. नवीन DEALS US $ ३०.३ कोटींची मिळाली. आमची शेअर बाय बॅक किंवा मर्जरची कोणतीही योजना नाही. अजून आम्हाला क्रायसिस मधून बाहेर आलो आहोत असे वाटत नाही. म्हणून आमची पॉलिसी कॅश कॉन्झर्वेशनची आहे.

UPL च्या मॉरिशस सब्सिडिअरीच्या ऑडिटरशिपचा KPMG ने राजीनामा दिला. KPMG ची लायसेन्स्ड कंपनी BSR & CO. यांची २०१८ २०१९ २०२० साठी ऑडिटर म्हणून नेमणूक केली. आता UPL मॉरिशसचे ऑडिट BSR & CO करेल. काही रेग्युलेटरी कारणांमुळे आम्ही ऑडिटर म्हणून राजीनामा दिला.से KPMG ने सांगितले. पण गेल्या काही वेळच्या अनुभवांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये ५% पर्यंत प्रॉफिट बुकिंग झाले. पण KPMG UPL साठी कन्सॉलिडिटेड फायनान्सियल ग्लोबल ऑडिटर म्हणून काम करेल. .

WHO च्या सॉलिडॅरिटी टीमच्या अंतरिम रिपोर्टमध्ये असे सांगितले की REMSIDIVIR , HCQ, लोपिनावीर, आणि इंटरफेरॉन या औषधांचा हॉस्पिटलाईझ्ड रुग्णाणना फारसा उपयोग होत नाही, मृत्युदरावर फारसा परिणाम दिसत नाही . हा रिपोर्ट ३० देशातील ४०५ हॉस्पिटल्समधील ११२६६ रुगणांवर केलेल्या चाचण्यांवर आधारित आहे. या रीपोर्टचा परिणाम सिप्ला, ग्लेनमार्क फार्मा, DR रेड्डीज या कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.

काँकॉरच्या बाबतीत रेल्वे आणि वित्त मंत्रालयात सहमती झाली. लँड लायसेन्सिंगचा प्रश्न सुटला. नोव्हेंबर २०२० अखेर सरकार बोली मागविल.

IDBI बँकेतील आपला ५१% स्टेक विकण्यात LIC ला स्वारस्य आहे. सरकारचा या बँकेत ४७% स्टेक आहे. या स्टेकसेल साठी लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सरकार रेलटेलमध्येही २७% तर IRFC मधील २५% स्टेक IPO द्वारा डायव्हेस्ट करणार आहे.

RBI २२ ऑक्टोबर २०२० ला OMO मध्ये Rs १०००० कोटींच्या बॉण्ड्सची खरेदी करेल. या OMO ला चांगला प्रतिसाद मिळाला तर OMO ची साईझ वाढवण्यावर विचार करू असे RBI ने सांगितले.

२० ऑक्टोबर २०२० ला हिंदुस्थान झिंक या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीमध्ये अंतरिम लाभांशावर विचार होईल.

रेफ्रेजरन्ट वापरणाऱ्या एअर कंडिशनर्सच्या आयातीवर सरकारने बंदी घातली. याचा फायदा अंबर इंटरप्रायझेस, ब्ल्यू स्टार, व्होल्टास, हॅवेल्स, नवीन फ्ल्युओरीन, SRF या कंपन्यांवर होईल

१ ऑक्टोबर २०२० ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान पेट्रोल, डिझेल च्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असे HPCL, BPCL , IOC या ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार थिएटर्स, नाट्यगृहे उघडण्यास ५०% क्षमतेवर परवानगी मिळाली पण जगभरात नवीन सिनेमा रिलीज होत नसल्यामुळे जुनेच सिनेमा दाखवले जात आहेत. त्यामुळे तिकिटांचे दर कमी आहेत.

THISSENKRUPP चा स्टील बिझिनेस खरेदी करण्यासाठी लिबर्टी स्टीलने नॉन बाइंडिंग ऑफर दिली. याचा फायदा टाटा स्टीलला होईल.

२० ऑक्टोबर २०२० ते २ नोव्हेंबर २०२० दरम्यान धानुका एग्रीटेकचा शेअर बाय बॅक ओपन राहील.

१९ ऑक्टोबर २०२० पासून MCX बेस मेटल्स इंडेक्स फ्युचर्समध्ये ट्रेडिंग सुरु करेल . या बेस मेटल्स इंडेक्स मध्ये कॉपर अल्युमिनियम, झिंक निकेल आणि लेड यांचा समावेश असेल.

इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सने आपला ओक नॉर्थ होल्डिंग मधील स्टेक Rs २२० कोटींना विकला.

आज SIAM ने ऑटोविक्रीचे आकडे जाहीर केले. पॅसेंजर व्हेइकल्सची एकूण विक्री २६.४% ने YOY तर डोमेस्टिक विक्री २८.९२% (YOY) वाढली. टू व्हिलर्सची विक्री ११.४% ने वाढून १८.४० लाख युनिट झाली. थ्री व्हिलर्सची विक्री ७१.९१% नी कमी होऊन १८६४९ झाली.

फेडरल बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. NIM ३.१३% (३.०१%) YOY, NII २३% ने वाढून Rs १३८० कोटी झाले, इतर उत्पन्न २१% ने वाढून Rs ५०९ कोटी झाले. नेट प्रॉफिट कमी होऊन Rs ३०८ कोटी ( Rs ४१७ कोटी) झाले. या तिमाहीत स्लीपेजिससाठी Rs ५९२ कोटींची प्रोव्हिजन ( Rs २५२ कोटी), GNPA २.८४% ऑफ टोटल लोन्स होते.

आज तुम्हाला मी निफ्टी ५० चा चार्ट देत आहे. या चार्टमधे बेअरिश एंगलफिन्ग पॅटर्न दिसत आहे. एनगल्फ करणे म्हणजे झाकून टाकणे, कव्हर करणे. १५ ऑक्टोबरची मंदीची मोठी कँडल ( मारूबोझू कँडल) आधीच्या कँडल्सना पूर्णपणे कव्हर करत आहे. अशीच स्थिती ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२० या वेळी दिसणाऱ्या कँडलची दिसते त्यावेळी निफ्टी ११८०० होता तेथून १०८०० पर्यंत निफ्टी हळूहळू पडत राहिला . २४ सप्टेंबरला १०८०५ ची पातळी गाठली आणी तेथून मार्केटने तेजी पकडली आणि निफ्टीने १२००० चा टप्पा गाठला. आता हे करेक्शन पुन्हा १०८०० चा टप्पा गाठेल का ? अशी मार्केटमध्ये चर्चा आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९९८२ NSE निर्देशांक निफ्टी ११७६२ बँक निफ्टी २३५३३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर  २०२०

  1. सुधीर धर्माधिकारी

    नमस्कार मी आजच ब्लागचे पहिले तीस भाग वाचून संपवले आपला सुरवाती पासून केलेला संघर्ष थरारक होता माझीपण सुरवात अशीच झाली सुरवातीला शिकण्या साठी बराच वेळ लागला आणी रिटाय्र्मेंट नंतर मार्कैट मध्ये लक्ष घालायला सुरवात केली. आपला ब्लाग वाचल्यावर मला माझा संघर्ष आठवला.मी दीर्घकालीन (Long Term) ट्र्रेडर आहे म्हृणून त्याद्रिष्टिने आपल्या कडून सूचना अपेक्षित आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.