आजचं मार्केट – २० ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २० ऑक्टोबर  २०२०

आज क्रूड US $ ४२.२६ प्रती बॅरल ते US $ ४२.६० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.३० ते US $१=Rs ७३.४९ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९३.४२ होते. विक्स २२.६० आणि PCR १.४१ होते.

डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन पक्षांमधील मतभेदांमुळे रिलीफ पॅकेजच्या बाबतीत अनिश्चितता वाढत आहे त्यामुळे USA ची मार्केट्स मंदीत होती. ओपेक+ त्यांनी पुरवठा वाढवण्यासाठी केलेला करार जानेवारी २०२१ पासून रद्द करण्याची शक्यता आहे .
सध्याच्या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी चर्निंग आवश्यक आहे. ज्या कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत तेथून निकाल जाहीर होण्याच्या आधी बाहेर पडून दुसऱ्या शेअरमध्ये घुसावे.

L & T टेक्नॉलॉजीचा दुसर्या तिमाहीत फायदा ४१% ने वाढला. Rs ७.५० लाभांश जाहीर केला. टाटा मेटॅलिक्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. स्टीलच्या किमती वाढल्या आहेत आणि कंपनीने योजलेल्या कॉस्ट रिडक्शनच्या उपायांमुळे निकाल चांगले आले. HDFC लाईफचे नेट प्रीमियम इन्कम ५५% ने तर फायदा ७% ने वाढला.

हिंदुस्थान झिंकने Rs २१.३० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. त्याची रेकॉर्ड डेट २८ ऑक्टोबर २०२० आहे. कंपनीचे उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले. वेदांताचा स्टेक हिंदुस्थान झिंकमध्ये आहे. त्यामुळे ट्रेडर्स हिंदुस्थान झिंकमधून बाहेर पडून वेदांतामध्ये घुसतील.

OMPL (ONGC मँगलोर पेट्रो) ही ONGC ची सबसिडीअरी आहे. यात MRPL ४९% स्टेक घेणार आहे. ONGC ला Rs १२२० कोटी मिळतील. काही दिवसांनी MRPL चे HPCL मध्ये मर्जर होईल.

ब्रिटानियाचे निकाल चांगले आले. पण हे निकाल अनुमानापेक्षा कमी आले. कंपनीची टॉप लाईन आणि व्हॉल्युम ९% अपेक्षेपेक्षा (१२% ते १३% ) कमी आले. व्यवस्थापनाने सांगितले की अनलॉक सुरु झाल्यापासून कन्झ्युमर हॅबिटस बदलल्या. बिस्किटांऐवजी आत लोक नॉनडिस्क्रिशनरी आयटेम्स जास्त खरेदी करतात.आता चीज आणि ब्रेड मध्ये चांगली ग्रोथ आहे. जुलैमध्ये डबलडिजिट ग्रोथ तर ऑगस्टमध्ये किमान सिंगल डिजिट ग्रोथ होती. सप्टेंबर २०२० मध्ये आता मागणी वाढत आहे. कंपनीने Rs २१८ कोटींच्या ICD चे पेमेंट केले. FY २२ च्या हिशेबाने शेअर ४५ P /E लेव्हलवर चालू आहे. ब्रिटानियाच्या शेअरमध्ये आज चांगलीच मंदी होती. तज्ञाचे मत आहे की FMCG क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या निकालात ब्रिटानियासारखा ट्रेंड आढळला तर शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. पण ब्रिटानियाचा शेअर खूप वाढला आहे.

OMC ने ४३० कोटी लिटर एथॅनॉल साठी वाढीव भावाने नवीन साखर हंगामासाठी टेंडर्स भरली. फायदा साखर उत्पादक कंपन्यांना होईल त्यामुळे त्यांच्या शेअरमध्ये तेजी आली.

स्पाईस जेटने ६२ नवीन अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु केली. कंपनीने सांगितले की जशी जशी परिस्थिती नॉर्मल होत जाईल तशी मागणी वाढत जाईल.

सनटेक रिअल्टी कंपनीने वासिंद मध्ये ५० एकर जमीन खरेदी केली. फिनलँडमधील ‘फोरम’ या कंपनीकडून ५ वर्षांसाठी विप्रोला कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

ग्रॅनुअल्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ७१% ने वाढून Rs १६३.६० कोटी, उत्पन्न २२% ने वाढून Rs ८५८.१० कोटी EBIT मार्जिन २९.९% होते. कंपनीने सांगितले की आमच्या कंपनीच्या दुसरी तिमाही आणि पहिल्या अर्धवर्षांच्या निकालांवर. कोविड १९ चा प्रतिकूल परिणाम झाला नाही.

रामकृष्ण फोर्जिंग, DCM श्रीराम या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.बॉम्बे डाईंग ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

केमकॉन स्पेशालिटी केमिकल्स ला दिलेल्या क्रेडिट फॅसिलिटीज क्रिसिलने अपग्रेड केल्या. सेबीने प्रमोटर्सविरुद्ध सुरु केलेली आणि कंपनीचे भूतपूर्व डायरेक्टर नरेश गोयल यांच्याविरुद्ध सुरु झालेली कारवाई चालू आहे.कोणताही दंड झाला तर तो प्रमोटर्सला भरावा लागेल ऑईलवेल केमिकल्सच्या बिझिनेसवर कोविडचा चांगलाच प्रतिकूल परिणाम झाला. पण सप्टेंबर २०२० पासून या बिझिनेसमध्ये हळू हळू सुरुवात झाली आहे. आणि ऑर्डर्स मिळत आहेत. HAGS आणि CMIC चा बिझिनेस चांगला चालू आहे.

विदेशी पार्टनरला रॉयल्टी पेमेंट, टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर, ट्रेडमार्क, ब्रॅंडनेम ( यामध्ये १%सूट मिळेल ) यावर सरकार कमाल मर्यादा ठरवण्याचा विचार करत आहे. १% ते ४% एवढी ही मर्यादा असेल. ऑटोमॅटिक रुटने पेमेंटची १% ते ४% एवढी मर्यादा असण्याची शक्यता आहे. . जर या पेक्षा जास्त पेमेंट करायचे असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल. सुरुवातीच्या ४ वर्षांत ४% पर्यंत सूट असेल जर कंपनी यातील काही खर्च R & D वर करत असेल तर तेवढी ती मर्यादा वाढेल . या पेमेन्टवर सरकार विथहोल्डींग टॅक्स लावण्याचा विचार करत आहे. या नियमांचा परिणाम मारुती, HUL, NESLE, कोलगेट, सिमेन्स या कंपन्यांवर होईल.

DHFL चे प्रमोटर कपिल वाधवान यांनी आपली Rs ४३००० कोटींची व्यक्तिगत आणि कौटुंबिक मालमत्ता DHFL च्या ऑउटस्टँडिंग कर्जासाठी देऊ केली आहे. त्यांच्या व्यक्तिगत आणि कुटुंबाच्या वेगवेगळ्या रिअल इस्टेट प्रोजेक्ट मधील राईट्स, इंटरेस्ट, टायटल ट्रान्स्फर केले तर DHFL चे रेझोल्यूशन योग्य रीतीने आणि पूर्ण होईल या आशयाचा अर्ज त्यांनी RBI कडे केला आहे.

आज लिबर्टी स्टील या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही अकवायर केलेल्या आधुनिक स्टील आणि झिऑन स्टील या कंपन्यांचे उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला स्टील,अल्युमिनियम आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात स्वारस्य आहे. THISSENKRUPP या कंपनीच्या स्टील बिझिनेससाठी नॉन बाइंडिंग इंडीकेटीव्ह ऑफर दिली आहे.

सरकार IRCTC चा OFS जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या दरम्यान आणण्याची शक्यता आहे.

इक्विटास स्माल फायनान्स बँकेचा IPO १३% भरला.

JSPL ने हायस्पीड हाय AXLE लोड ऍप्लिकेशन्स साठी नवीन प्रतीचे रूळ विकसित केले. रेल्वेने या रुळांना मंजुरी दिली.
शक्ती पंप्स ही कंपनी सोलर आणि सबमर्सिबल पम्प बनवते . या कंपनीचा १०० देशात कारभार आहे. सोलर इन्व्हर्टरचे ते भारतातील एकमेव उत्पादक आहेत. सरकारच्या सबसिडी कार्यक्रमामुळे पंपांसाठी मागणी वाढली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून एकूण ७५% सबसिडी देतात. त्यांचा दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

HUL ने Rs १४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीला Rs २००९ कोटी फायदा झाला. कंपनीचे उत्पन्न Rs ११४४२ कोटी झाले. EBITDA Rs २८६९ कोटी झाले. मार्जिन २५.१% होते. व्हॉल्युम ग्रोथ ३% होती.

मी आज तुम्हाला HDFC चा चार्ट देत आहे. सरकारच्या मोहीमेमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आली आहे. गृह कर्जावरील व्याजाचे दर कमी झाले आहेत अफोर्डेबल हौसिंग योजनेचा फायदा मिळत आहे. परिणामी HDFC लिमिटेडची ग्रोथ होत आहे. . या चार्टमधे तुम्हाला डबल बॉटम तयार झालेला दिसतो आहे. शेअरने ब्रेकआउट घेतला आहे.ब्रेकआऊट होताना सरासरीपेक्षा जास्त व्हॉल्युम दिसत आहेत. हा विकली चार्ट आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०५४४ NSE निर्देशांक निफ्टी ११८९६ बँक निफ्टी २४३११ वर बंद झाले.

 

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.