आजचं मार्केट – २१ ऑक्टोबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ ऑक्टोबर  २०२०

आज crude 42.34 ते 42.95 च्या दरम्यान, रुपया 73.37 ते 73.61 दरम्यान, डॉलर इंडेक्स – 92.80 तर vix- 23.44 आणि pcr 1.34 होते आज crude च्या किमती घटल्या कारण काही देशात करोनाने पुन्हा मुसंडी मारली आहे पुन्हा lockdown जाहीर झाला आहे मागणी कमी झाली US मध्ये साठा वाढला लिबियामध्ये क्रूडचे उत्पादन सुरू झाले FDI ची गुंतवणूक 16 %नी वाढली FPI चा flow वाढला आहे

SBI नी सणासुदीला व्याजाच्या दरात 0.25%सूट जाहीर केली 30 लाखापर्यंतच्या लोनसाठी 6.9% तर त्यावरील लोनसाठी 7% तर 75 लाखावरील लोनवर 0. 20 % सूट मिळेल असे सांगितले

Reliance JIO आणि Qualcomm यांनी 5G ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली 1 GBPS इतका स्पीड देणे त्यामुळे शक्य होईल enhanced डिजिटल एक्सपिरियन्स मिळेल

रेमंडनी सांगितले की B to B business प्री कोविड पातळीला पोहोचला म्हणून शेअरमध्ये तेजी होती

टायरला लागणारे crude बेस raw मटेरिअल चायनामधून येते याला आणि टायरच्या आयातीला मनाई आहे डीलरकडे इन्व्हेंटरी नाही रिप्लेसमेंट मार्केटमध्ये ग्रोथ आहे टायरला लागणाऱ्या रबराच्या किमती कमी आहेत MRF ची पुढील 4 वर्षात low कॅपेक्स intensity असेल रिटर्न रेशीयोज सुधारतील FY 22 च्या earning प्रमाणे 18 च्या P/Eवर आहे टायर कंपन्यांचे result चांगले येण्याची शक्यता आहे

आता सिमेंट आणि मेटलमध्ये तेजी येईल पण सिमेंटच्या बाबतीत region wise विचार करावा. LIC ने बजाज ऑटो , आणि कंटेनर कॉर्पोरेशन मध्ये स्टेक वाढवला. BPCL मध्ये ब्लॉक डील झाले याच्या ट्रस्टमधून ESPS ला शेअर transfer केले

हिंदुस्तान झिंकने ₹ 21.30 एव्हढा डिव्हिडंड दिला यामुळे vedanta ला ₹ 5843 कोटी मिळतील त्यामुळे वेदांताच्या शेअर्समध्ये तेजी होती

A B Fashion ची Walmart आणि Myntra यांच्याबरोबर स्ट्रॅटेजीक कारणासाठी बोलणी चालू आहेत पण policy matter असल्याने मॅनेजमेंटनी काही कमेंट करण्यास नकार दिला

सरकारने 2 कोटीपर्यंतच्या EMI च्या व्याजावरील व्याज माफ करायचे ठरवले आहे हा निर्णय कोर्टाला सांगितला जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहे हा बोनस production linked आणि नॉन प्रॉडक्शन linked असा विभागला जाईल. त्याचप्रमाणे काही IT कंपन्या पगार वाढवत आहेत. PLI योजनेत आणखी 7 ते 8 सेक्टर चा समावेश केला जाईल

Tata communication चे पूर्वीचे नाव VSNL होते यामध्ये असलेली 740 एकर जमीन वेगळी करून ती Hemisphere प्रॉपर्टीजकडे ट्रान्सफर केली.ज्याच्याजवळ टाटा कम्युनिकेशनचा एक शेअर होता त्यांना Hemisphere Property चा 1 शेअर दिला. या नव्या कंपनीची नेट asset value ₹6000 कोटी आहे यात सरकारचा 51% हिस्सा आहे. या कंपनीचे उद्या लिस्टिंग आहे.

आज बजाज फायनान्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट ₹९६५ कोटी, NII ₹ ४१६५ कोटी, GNPA १.०३%,तर NNPA०.३७% होते.

न्यु जेन सॉफ्टवेअर , पंजाब अल्कलीज, Indo Count, GMM फाऊडलर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
अल्ट्राटेक सिमेंटचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ₹१२३० कोटी, उत्पन्न ₹१०५५४ कोटी , मार्जिन २६%, आणि वन टाइम लॉस ₹ ३४० कोटी होते.

कोलगेट या कंपनीला दुसऱ्या तिमाहीत फायदा ₹२७४ कोटी, उत्पन्न ₹१२८६ कोटी, EBITDA ₹ ४०९ कोटी तर EBITDA मार्जिन३१.८% झाले. कंपनीने ₹१८ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

आज मी GIC Housing चा चार्ट देत आहे realty सेक्टर मध्ये तेजी आहे ही कंपनी गृह कर्ज देते या चार्टमध्ये inverted head and shoulder पॅटर्न दिसतो आहे त्याच्या right shoulder चा breakout आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स 40707, NSE निर्देशांक निफ्टी 11937,Bank निफ्टी 24635 वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.