आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०२०

आज क्रूड US $ ३८.३६ प्रती बॅरल ते US $ ३९.२६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.८८ ते US $१= Rs ७४.१६ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९३.४१ VIX २४.०९ आणि PCR १.२५ होते.

USA मध्ये कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत. युरोपियन देशात कोरोनाच्या दुसऱ्या लहरीचा सामना करण्यासाठी फ्रांस, जर्मनी, इटली, UK मध्ये लॉकडाऊन /अंशतः लॉकडाऊन स्पेनमध्ये हेल्थ इमर्जन्सी जाहीर केले जात आहेत. त्यामुळे युरोपियन मार्केट्स, USA मधील मार्केट्स मंदीत होती. सोने आणि चांदीतही मंदी होती. क्रुडमध्ये तर कमालीची मंदी होती. याचा फायदा पेंट, केमिकल इंडस्ट्रीज, टायर, आणि पीडिलाइट, एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स सारख्या कंपन्यांना होईल.

DR रेड्डीजने BIRAC (बायो टेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस कॉऊन्सिल) बरोबर भारतामध्ये स्पुटनिक V व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी पार्टनरशिपचा करार केला.

फार्मा कंपन्यांसाठी PIL योजनेत सरकारने सवलत जाहीर केली. मिनिमम थ्रेशहोल्ड लिमिटची अट काढून टाकली. प्रॉडक्ट डोमेस्टिक मार्केटमध्ये विकण्याची अट काढून टाकली. १० उत्पादनांसाठी किमान प्रॉडक्शनची अट काढली. ही योजना ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवली.

उद्यापासून ICICI लोम्बार्ड हा शेअर F & O मार्केटमध्ये समाविष्ट होईल.

मंत्रिमंडळाने आणि CCEA ने इथेनॉलची किंमत Rs ३.३४ प्रती लिटर वाढवायला परवानगी दिली. ही वाढ १ डिसेम्बरपासून अमलात आणण्याचा प्रस्ताव आहे.

धान्य आणि साखर यांचे १००% पॅकेजिंग ज्यूटच्या पॅकेजिसमध्येच करायला पाहिजेअसे सरकारने सांगितले याचा फायदा लुडलो ज्यूट, CHEVIOT, ग्लॉस्टर , कानपूर प्लास्टीपॅक यांना होईल.

सरकारने कमी गुणवत्तेच्या पादत्राणांच्या आयातीवर बंदी घातली. त्यामुळे मिर्झा, लिबर्टी शूज या शेअर्समध्ये खरेदी झाली.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्सने प्रोजेक्ट ट्रान्सफॉर्मेशनसाठी टेकमहिन्द्राबरोबर Rs ४०० कोटींचा करार केला.
पिरामल एंटरप्रायझेसमधील केकी दादिसेठ, RA माशेलकर, गोवर्धन मेहता या इंडिपेन्डन्ट डायरेक्टर्सनी राजीनामा दिला.
BSNL ने ३०% 4G गीअर्सची खरेदी डोमेस्टिक उत्पादकांकडून केली जाईल असे प्रॉक्युअरमेंट धोरण जाहीर केले. याचा फायदा ITI ला होईल.

मारुती सुझुकी ला Rs १३७१.६० कोटी फायदा झाला. उत्पन्न Rs १८४७५ कोटी झाले. EBITDA मार्जिन १०.३% होते. टॅक्स एक्स्पेन्सेस वाढून Rs ३७६.२० कोटी तर इतर उत्पन्न Rs ६०३ कोटी झाले.

उद्यापासून F & O मार्केटमध्ये ट्रेड होणाऱ्या शेअर्सच्या ट्रेडिंग लॉटमध्ये बदल अमलात येतील

BPCL चे निकाल चांगले आले. फायदा Rs २२४८ कोटी, उत्पन्न ५०१४६.४० कोटी, ऑपरेटिंग मार्जिन ७.७% झाले. GRM US $३.१९/BBL होते. वन टाइम लॉस Rs १२४.६० कोटी झाला

रॅडिको खेतान, GE शिपिंग ( तोट्यातून फायद्यात) जॉन्सन हिताची, मेनन पिस्टन, हॅवेल्स, बँक ऑफ बरोडा, लारस लॅब्स, अपोलो पाईप्स, चोला इन्व्हेस्टमेंट्स, बालाजी अमाईन्स, HSIL, शारदा क्रॉपकेम, AU स्मॉल फायनान्स बँक ,अँपकोटेक्स, सारेगम इन्डोअमाईन्स, PI इंडस्ट्रीज, स्काफलर इंडिया, स्ट्राइड्स फार्मा, कॅनरा बँक या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

इंडिगोचे निकाल साधारण होते.

अरविंद लिमिटेडचे निकाल असमाधानकारक होते.

टायटनच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही येत्या वर्षात ३० ते ३५ ज्युवेलरी शॉप्स उघडू, ज्युवेलरीची ईकॉमर्स वरून सेल्स वाढत आहेत. सणासुदीच्याकाळात आमची विक्री वाढेल. आम्ही FY २१च्या दुसऱ्या अर्धवर्षाविषयी आशादायी आहोत. 

आज ऑक्टोबर २०२० ची एक्स्पायरी होती. काही शेअर्सची रोल ओव्हर पोझिशन खालीलप्रमाणे होती. ९५% सिमेन्स, ९३% ग्रासिम, ९२% अडाणी पोर्ट्स, JSW स्टील्स, IDFC १ ST बँक, हिरोमोटो कॉर्प, ९०% ऍक्सिस बँक फेडरल बँक ९१% टाटा स्टील, हॅवेल्स, ICICI बँक, ICICI PRU

सोमवार २ नोव्हेंबर रोजी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे लिस्टिंग होईल.

उद्या करन्सी मार्केट्स आणि बँकांना सुट्टी आहे.

आज मी तुम्हाला ग्लेनमार्क फार्माचा चार्ट देत आहे. ही फार्मा क्षेत्रातली कंपनी आहे. हा शेअर गेले काही दिवस डिस्ट्रिब्युशन फेजमध्ये होता. Rs ४७० टी Rs ४८० यापुढे जात नव्हता. मार्केटमध्ये तेजी असली तरी शेअरमध्ये तेजी येत नव्हती. ह्या शेअरने आता २०० DMA क्रॉस केला त्यामुळे या शेअरमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७४९ NSE निर्देशांक निफ्टी ११६७० बँक निफ्टी २४०९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०२०

 1. VILAS K KADAM

  Mam
  Mala tumachya barobar bolayache ahhe aahe market
  Sambhadh baddal
  Mazha contact details submit karit aahe
  Tumhi sadhya saral sopya bashert pa deep mahi knowledge deta.te mala khup awadale

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.