Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०२०
आज क्रूड US $ ४७.४१ प्रती बॅरल ते US $ ४७.९३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.७७ ते US $१= Rs ७३.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.९० तर VIX १९.८१ आणि PCR १.६८ होते.
आज USA आणि युरोपमध्ये थँक्स गिविंग डे आणि ब्लॅक फ्रायडे हे सण साजरे होत आहेत. या सणात लोक खूप खरेदी करतात आणि सण साजरा करतात. व्हॅक्सिनच्या बातमीने जगात सर्वत्र काळजीचे वातावरण जरा हलके झाले. भारतातही लसीकरणासाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यात जातीने लक्ष घालत आहेत. कॅडीला हेल्थकेअरने सांगितले की कॅडीला हेल्थकेअर मार्च २०२१ पर्यंत कोरोनावरची लस लाँच करण्याची शक्यता आहे.
भारताची FY २१ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये GDP ग्रोथ -७.५% झाली. GDP ग्रोथ पहिल्या तिमाहीत -२३.९% होती. भारताची अर्थव्यवस्था हळू हळू सुधारत आहे
आज PNGRB ने युनिफाईड टॅरीफची म्हणजेच Rs ५७ प्रती MMBTU नैसर्गिक गॅससाठी घोषणा केली. या योजनेनुसार आता गॅससाठी वार्षिक करार करावा लागेल. या आधी गॅसच्या किंमत दर १५ दिवसांनी ठरवल्या जात होत्या. हे गॅस पाईपलाईनची मालकी असणाऱ्या कंपन्यांसाठी सकारात्मक तर फर्टिलायझर कंपन्यांसाठी प्रतिकूल आहे. झोन १ मध्ये पाइपलाइनचा पहिला ३०० KM चा भाग असेल तर झोन २ मध्ये बाकीची पाईपलाईन येईल. हा निर्णय GAIL,GSPL यांना फायद्याचा तर सिटी गॅस डिस्ट्रिब्युटर्सना कमी फायद्याचा होता. त्यामुळे आज IGL, MGL, गुजरात गॅस, अडानी गॅस या शेअर्समध्ये तेजी होती.
रोड ट्रान्सपोर्ट मंत्रालयाने आज मोटार व्हेईकल ऍग्रीगेटर गाईडलाईन्स जारी केल्या. या वर राज्यांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे. या गाईडलाईन्सप्रमाणे वाहतूक भाड्याची ८०% रक्कम ड्रायव्हरला मिळाली पाहिजे.
इंडिया बुल्स कडे लक्ष्मी विलास बँकेचा ४.९९% स्टेक आहे. LVB चे शेअरकॅपिटल राईटऑफ केल्यामुळे त्यांना मोठा तोटा होईल. त्यामुळे इंडिया बुल्स ने कोर्टात अर्ज केलेला आहे.
सरकारने औषधांच्या डिस्ट्रिब्युशन आणि विक्रीसाठी आयातीला दिलेल्या लायसेन्सची मुदत ६ महिन्यांनी वाढवली. कोविड १९ मुळे या लायसेन्सचा उपयोग या कंपन्या मुदतीत करू शकल्या नव्हत्या. याचा फायदा कॅडीला हेल्थकेअर, ऑरोबिंदो फार्मा, शिल्पा मेडिकेअर या आणि इतर फार्मा क्षेत्रातील कंपन्यांना होईल.
चीनमधून आयात होणाऱ्या फ्लोट ग्लासवर US $ २१८ प्रती टन एवढी ऍन्टीडम्पिंग ड्युटी ५ वर्षांकरता बसवली जाईल असा निर्णय DGTR यांनी घेतला. याचा फायदा असाही इंडिया, सेंट गोबेन यांना होईल.
माननीय मंत्री पियुष गोयल यांच्या बरोबर साखर उत्पादकांच्या झालेल्या बैठकीत साखरेचे उत्पादन वाढवण्यावर सहमती झाली तसेच इथेनॉल प्लान्ट लावण्यासाठी स्वस्त दरात कर्ज दिले जाईल असे सांगितले.
ABB ने आज हाय आऊटपुट इंडक्शन सिरीज लाँच केली.
गरवारे वॉल रोप्स ही कंपनी Rs २३०० प्रती शेअर या भावाने टेण्डरऑफर रूटने शेअर बायबॅकवर Rs ७३ कोटी खर्च करेल
बर्गर किंग या क्विक रेस्टारंट चालवणाऱ्या कंपनीचा IPO २ डिसेम्बरला ओपन होऊन ४ डिसेंबर २०२० ला बंद होईल. हा Rs ८१० कोटींचा IPO असून यात फ्रेश इशू ऑफ शेअर्स Rs ४५० कोटी आणि OFS Rs ३६० कोटींची असेल. प्राईस बँड Rs ५९-Rs ६० एवढा असेल मिनिमम लॉट २५० शेअर्सचा असेल म्हणजे मिनिमम रक्कम Rs १५००० गुंतवावी लागेल. कंपनीचे २०२६ पर्यंत ७२० क्विक रेस्टारंट उघडण्याचे लक्ष्य आहे. IPO चे प्रोसिड्स कर्ज कमी करण्याकरता तसेच एक्स्पान्शनसाठी वापरण्यात येईल.
आजपासून शॉपर्स स्टॉप चा राईट्स इशू सुरु झाला.
IBA ( इंडियन बँक असोसिएशन) ने मागणी केली की बँकांनी NPA घोषित करण्यावरची बंदी उठवावी.
आज FMGC आणि कन्झ्युमर गुड्स क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.
आज पासून F & O मार्केटच्या डिसेंबर महिन्याच्या सीरिजला सुरुवात झाली. या सिरींजमध्ये सेक्टर रोटेशन असते. म्युच्यूअलफंडांचे रिडम्प्शन असते, तसेच USA आणि युरोपातील मार्केट्स नाताळच्या सुट्टीनिमित्त बंद असतात. जुन्या किंवा सॅच्युरेट झालेल्या सेक्टर्समधून गुंतवणूकदार यात म्युच्युअल फंड आणि इतर संस्थागत गुंतवणूकदारांचा समावेश असतो, नव्या उदयोन्मुख सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग दिसण्याची शक्यता असते.
आज डिसेंबर सिरीजचे स्वागत मात्र मार्केटने तेजींने केले. मार्केट संपता संपता लक्षणीय तेजी आली.
२८ नोव्हेंबर ही TCS च्या शेअर बायबॅकची रेकॉर्ड डेट आहे. पुढील आठवड्यात १ डिसेंबर २०२० रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील. ४ डिसेंबर २०२० रोजी RBI चे द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर होईल.
ट्यूब इन्व्हेस्टमेंटने C G पॉवरचे ऍक्विझिशन पूर्ण केल्यामुळे ट्यूब इन्व्हेस्टमेन्टचा शेअर तेजीत होता.
आज मी आपल्याला निफ्टी मेटलचा ६ महिन्याचा चार्ट देत आहे. ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रात रिकव्हरी आल्यामुळे मेटलसाठी मागणी वाढली. तसेच चिनी अर्थव्यवस्था रिकव्हर झाल्यामुळे मेटल्ससाठी मागणी वाढली म्हणून निफ्टी मेटलच्या चार्टमधे ब्रेकआउट दिसत आहे. हायर लो हायर हायची सिरीज नोव्हेम्बरमध्ये दिसत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४४१४९ NSE निर्देशांक निफ्टी १२९६८ बँक निफ्टी २९६०९ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!