आजचं मार्केट – ९ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४०.३५ प्रती बॅरल ते US $ ४०.५२ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.८८ ते US $१=Rs ७४.१७ या दरम्यान US $ निर्देशांक ९२.१७ VIX २०.७६ तर PCR २.०६ होते.

मार्केटने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. मार्केट लाइफटाइम हायला पोहोचले

USA च्या अध्यक्षीय निवडणुकीत बिडेन विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे IT कंपन्यांचा फायदा होईल. स्टुडंट व्हिसा, HIB व्हिसा आणि इमिग्रण्टस साठी असलेले नियम सोपे करून HIB व्हिसाच्या संख्येत वाढ केली जाईल. HIB व्हिसासाठी जी संगणीकृत प्रणाली अवलंबिली जात होती ती आता चालू राहण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना दिला जाणारा अल्प मुदतीसाठी बिझिनेस व्हिसाही चालू राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच आता USA चे धोरण सौम्य होण्याची शक्यता आहे. बिडेन यांनी भारता बरोबर संबंध वृद्धिंगत होतील असे सांगितले आहे.

USA च्या अध्यक्षपदाचा शपथविधी २० जानेवारी २०२१ रोजी होईल. फेडने व्याजाचे दर कमी ठेवले तसेच EASY MONEY पॉलिसी चालू ठेवू असे सांगितले. त्यामुळे मार्केटमधील लिक्विडिटीचा प्रवाह चालू राहील. पण अनिश्चितताही मार्केटवर परिणाम करेल

मार्केट संपल्यावर फायझर आणि बायोनटेक या कंपन्यांनी तयार केलेली लस ९०% परिणामकारक आहे असा मोठ्या ट्रायलचा सुरुवातीचा डेटा सुचवत आहे. ही बातमी आल्यावर डाऊ जोन्स मध्ये तेजी आली आणि सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली. .

आज क्रूड तेजीत होते कारण US $ विक झाला, USA मध्ये मोठे रिलीफ पॅकेज मिळेल अशी शक्यता आहे तसेच आता ओपेक+देशांनी क्रूड उत्पादनातील वाढीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सकाळी सोने आणि चांदीत तेजी होती. इतर मेटल्सही तेजीत होती.

पुट/कॉल रेशियो पाहून अशावेळी शॉर्ट पोझिशन घेऊ नये तर डिप्स मध्ये खरेदी करावी. ज्यावेळी लिक्विडीटी स्ट्रॉंग असते त्यावेळी बरेच दिवस पूट /कॉल रेशियो ओव्हर बॉट लेव्हलला राहतो. लार्ज कॅप शेअर्स खूप वाढले आहेत त्यामुळे मिडकॅप जास्त चालतील.

शेअरच्या प्राईसमध्ये फंडामेंटल, लिक्विडीटी, इमोशन या तिन्ही गोष्टींचा समावेश असतो. तेजी किंवा मंदी मध्ये या तीन गोष्टींचे प्रमाण बदलत असते.

ITC आपला FMCG बिझिनेस वाढवण्यात यशस्वी झाली आहे. ते सतत नवनवीन प्रॉडक्टस लाँच करत आहेत. पण सिगारेट व्हॉल्युम कमी झाले आहेत. ITC स्पेशल लाभांश जाहीर करेल अशी अपेक्षा होती. पण कंपनीने दिला नाही. हा शेअर आता काही दिवस Rs १५५ प्रती शेअर ते Rs १८५ प्रती शेअर या रेंज मध्ये राहील. अगरबत्ती, बिस्किट्स, चॉकलेट, फूड आयटेम्स या मध्ये मार्केट शेअर वाढत आहे.

ग्रॅनुअल्स ही कंपनी हैदराबाद येथे फार्म्युलेशन बिझिनेस साठी ग्रीनफील्ड फॅसिलिटी सुरु करणार आहे.

ल्युपिनच्या सॉमरसेट प्लान्टच्या तपासणीत USFDA ने १३ त्रुटी दाखवल्या.

ईक्विटास स्मॉल फायनान्स बँकेवरील नवीन शाखा उघडण्यावरील निर्बंध RBI ने रद्द केले. त्यामुळे आता ही बँक नवीन शाखा उघडू शकेल.

हॅपीएस्टमाईंड या कंपनीने AUTONOIQ या कंपनीबरोबर टेस्टिंग सोल्युशन्स लाँच केली.

इमामीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांनी HY १ FY २१ मध्ये २० नवीन प्रोडक्टस लाँच केली. केश किंग आणि बाम मध्ये २० % ग्रोथ आहे. ओव्हरऑल २८% ग्रोथ झाली आहे. ही ग्रोथ सस्टेनेबल आहे.

ग्लॅन्ड फार्माचा ग्रे मार्केटमध्ये Rs २०० प्रीमियम चालू होता. तो कमी होऊन Rs ८० झाला. प्राईस बँड Rs १३०० ते Rs १३२० असेल असे वाटले होते पण प्रत्यक्षात IPO चा प्राईस बँड Rs १४९० ते Rs १५०० असा आला.

फुसून फार्मा या चिनी कंपनीचा प्रमोटर म्हणून ७४% स्टेक आहे.

सत्यमचे जे प्रमोटर होते त्यांचा या कंपनीत ३.८७% स्टेक आहे. ED (एन्फोर्समेंट डायरेक्टरोरेट)ने सांगितले की हा स्टेक सरकारकडे सोपवला पाहिजे.

MOREPAN लॅब ( लक्षणीय वाढ) वेस्टलाइफ डेव्हलपमेंट, फोर्स मोटर्स, डिव्हीज लॅब, लेमन ट्री हॉटेल्स, डॉलर इंडस्ट्रीज, हिंदुस्थान कॉम्पोझिट्स, कानपूर प्लास्टिपॅक, सेल, KRBL बाळकृष्ण इंडस्ट्रीज, वेंकीज, कल्याणी स्टील्स, NCL इंडस्ट्रीज (Rs १.५ प्रती शेअर लाभांश), ग्लोबस स्पिरिट्स,यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

VIP इंडस्ट्रीज, अशोक लेलँड, भेल, अंबर इंटरप्रायझेस, लुमॅक्स,जिंदाल SAW, इन्सेक्टीसाईड्स इंडिया या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.

HFCLला L &T कडून Rs ६०० कोटींची ऑर्डर मिळाली.

सरकार लवकरच ECLGS ( इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम) पार्ट-२ पॅकेज २६ औद्योगिक क्षेत्रात लाँच करेल. यात ऑटो, हॉटेल्स, टुरिझम, ऑटो पार्ट्स, एव्हिएशन यांचा समावेश असेल. सरकार या क्षेत्रात वर्तमान क्षेत्रातील कर्जाच्या २०% कर्ज गॅरंटी शिवाय देण्याची व्यवस्था करेल.

आज मी तुम्हाला भारत फोर्ज या कंपनीचा चार्ट देत आहे. भारत फोर्ज ही बाबा कल्याणी ग्रुपची कंपनी ऑइल अँड गॅस आणि इतर क्षेत्रात कार्य प्रवण असलेली फोर्जिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे . USA मध्ये क्लास ८ ट्रकला लागणारे कॉम्पोनंट्स बनवते. USA मध्ये क्लास ८ ट्रक्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे भारत फोर्जमध्ये ब्रेकआऊट दिसत आहे आणि तो SUSTAINABLE होण्याची शक्यता आहे.

BSE इंडिया निर्देशांक सेन्सेक्स ४२५९७ NSE निर्देशांक निफ्टी १२४६१ बँक निफ्टी २७५३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.