आजचं मार्केट – १० नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १० नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४१.९१ प्रती बॅरल ते US $ ४२.६६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.११ ते US $१=Rs ७४.२२ या दरम्यान US $ निर्देशांक ९२.६४ VIX २०.६४ आणि PCR १.७७ होते.

काल मार्केटची वेळ संपल्यावर फायझरच्या लसीसंबंधात आलेल्या सकारात्मक बातमीने मार्केटचा मूड पूर्णपणे बदलला. USA च्या निवडणुकांबाबत असलेली अनिश्चितता संपली. या दोन अनिश्चितता संपल्याने आणि असुरक्षिततेची भावना कमी झाल्यामुळे सोने आणि चांदी यांच्यात मंदी आली. यानंतर मार्केट फिरले. वातावरण पुन्हा पूर्वीप्रमाणे झाल्यासारखे वाटल्याने क्रूडचा भाव वाढला, ओल्ड इकॉनॉमीवाले शेअर्स तेजीत आले. न्यू इकॉनॉमीवाले शेअर्स पडले. कारण कोरोनामुळे डिजिटलवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली. इप्का लॅब, DR लाल पाथ लॅब, थायरो केअर, मेट्रोपोलिस लॅब्स, या सारख्या डायग्नॉस्टिक शेअरमध्ये प्रॉफीटबुकिंग झाले.

काल बोईंगचा शेअर वाढला. कारण आता अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाची शक्यता वाढली.भारत सरकारही एव्हिएशन सेक्टरला लवकरच इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीमच्या अंतर्गत पॅकेज देईल.

कोविडसाठी लस उपलब्ध झाल्यामुळे आता मॉल्स, रेस्टोरंट्स, सिनेमा थिएटर्स, यांच्या शेअर्समध्येही खरेदी झाली. टुरिझम संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी आली. स्टार पेपरचे निकाल चांगले आल्यामुळे शेषशायी पेपर मालू पेपर अशा पेपर् सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी आली.

‘नवरा मरो नवरी मरो दक्षिणेशी मतलब’ या नियमानुसार शेअर खरेदी करा किंवा विका ब्रोकरेज द्यावे लागते त्यामुळे ICICI सिक्युरिटीज, एंजल ब्रोकिंग, MCX, मोतीलाल ओसवाल यांना फायदा होईल.

डेक्कन सिमेंट, एक्झाईड, स्टार पेपर, केसोराम इंडस्ट्रीज, झुआरी ऍग्रो, ऑइल इंडिया, मदर्सन सुमी, TTK प्रेस्टिज ( Rs २० प्रती शेअर लाभांश) महिंद्रा आणि महिंद्रा( प्रॉफिट Rs १६२ कोटी, उत्पन्न Rs ११५९० कोटी, मार्जिन १७.७%) ,GAIL, गॉडफ्रे फिलिप्स, ALKYL अमाईन्स, टाटा पॉवर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले

CERA सॅनिटरीवेअर,सिम्फनी लिमिटेड, डेल्टा कॉर्प, लिबर्टी शूज यांचे निकाल असमाधानकारक होते. .

BPCL मध्ये तेजी आली कारण सरकारने आता जाहीर केले की BPCLमधील विनिवेशाची तारीख पुढे ढकलणार नाही.
सरकारने शिपिंग कॉर्पोरेशनच्या विनिवेशासाठी रोड शोला मंजुरी दिली.

सिप्लाच्या व्यवस्थापनाने सांगितले की साऊथ आफिका आणि इतर इमर्जिंग मार्केट्स मध्ये ग्रोथ आहे. आम्ही येत्या दीड वर्षात चांगली प्रोडक्टस लाँच करू. ‘अल्बुटेरॉल’ मुळे USA मध्ये ग्रोथ दिसत आहे.

मारुतीच्या बहुतेक मॉडेल्सवर डीलर डिस्काउंट कमी होत आहे.

टाटा कम्युनिकेशनला DE TUNE सेवा पुरवण्यासाठी ऑर्डर मिळाली.

भारतातील फेमा ( फॉरीन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट) कायद्यात बदल झाल्यामुळे आणि त्याची दखल MSCI इंडेक्सने घेतल्यामुळे Rs २५००० ते Rs ३०००० कोटींची गुंतवणूक भारतात येण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक कोटक महिंद्रा बँक :- Rs ५००० कोटी, MRF :- Rs ९७० कोटी, अशोक लेलँड Rs ७६० कोटी, ACC सिमेंट Rs ७०० कोटी, मुथूट फायनान्स Rs ७५० कोटी, SBI कार्ड्स Rs ७५० कोटी, कॅडीला हेल्थकेअर Rs ७०० कोटी, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि L &Tमध्ये प्रत्येकी Rs १२०० कोटी, ब्रिटानिया, नेस्ले प्रत्येकी Rs १०५० कोटी या प्रमाणे येण्याची शक्यता आहे.

आज मी तुम्हाला BPCL चा चार्ट देत आहे. ह्या कंपनीची डायव्हेस्टमेन्ट आता पुढे ढकलणार नाही असे सरकारने सांगितले. चार्टमशे राऊंडिंग बॉटम फॉर्म झाला आहे. २०० DMA चे लेव्हल ब्रेक केले आहे त्यामुळे या शेअरमध्ये ब्रेकआऊट अपेक्षित आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३२७७ NSE निर्देशांक निफ्टी १२६३१ बँक निफ्टी २८६०६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.