आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४३.९७ प्रती बॅरल ते US $ ४४.६० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७४.१८ ते US $१=Rs ७४.५५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.९२ VIX २१.५७ आणि PCR १.५२ होते.

फायझर पाठोपाठ रशियाने त्यांची स्पुटनिकV ही लस ९२% यशस्वी आहे असा दावा केला. त्यामुळे कोरोनाची भीती थोडी कमी व्हायला लागली आहे. मार्केटमध्ये लिक्विडिटीचा ओघ असल्याने आज मार्केटमध्ये तेजीचाच कल होता. मात्र अधूनमधुन प्रॉफीट बुकिंग होताना दिसत होते.

आज सरकारने १० सेक्टर्ससाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजना जाहीर केली. या योजनेसाठी सरकार ५ वर्षांत Rs १.४६ लाख कोटी खर्च करेल. यामध्ये ऑटो, ऑटो कॉम्पोनन्ट्ससाठी Rs ५७००० कोटींची तरतूद असेल. याशिवाय इलेक्ट्रिक व्हेईकल, फार्मा, ऍडव्हान्स्ड cell केमिस्ट्री, फूड प्रॉडक्टस, व्हाईट गुड्स यांचा समावेश असेल. प्रॉडक्शन वाढवण्यासाठी उत्तेजन दिले जाईल. भारतात तयार केलेला माल निर्यात करण्यासाठी परवानगी असेल. या योजनेचा फायदा एव्हररेडी, डिक्सन टेक (AC, LED) , D-लिंक, स्मार्ट लिंक, अंबर, BPL,स्टरलाईट टेक, तेजस नेटवर्क यासारख्या कंपन्यांना होईल.

काँकॉरने मुलुंड डेपोची जागा रेल्वेला सरेंडर केली.

टाटा स्टील स्वतःचा युरोपियन बिझिनेस विकण्यासंबंधात या आठवड्याअखेर निर्णय घेईल. हा बिझिनेस खरेदी करण्यासाठी स्वीडन मधील ‘SSAB’ ही कंपनी आघाडीवर आहे.

भारती एअरटेल त्यांच्या टॉवर ऍसेट्सचे मॉनेटायझेशन करणार आहे.

चीनमधून भारतात आयात होणाऱ्या फ्लॅक्स लिनन फॅब्रिक्सवर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली.
इंडियन हॉटेल्स या कंपनीने CONNAUGHT हॉटेल जनतेसाठी ओपन केले. कंपनीने न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनने २०१८ मध्ये केलेल्या लिलावात ३३ वर्षांसाठी लायसेन्सिंग राईट्स विकत घेतले होते. कंपनीने सांगितले की हे आमच्या हॉटेल्सपैकी एक उत्कृष्ट हॉटेल आहे.

येस बँकेचा शेअर आज तेजीत होता. कारण केअरने ( रेटिंग एजन्सी) त्यांच्या Rs ५००० कोटींच्या ईन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्सचे रेटिंग वाढवून ‘B’ चे ‘BBB’ असे केले आणि आऊटलूक स्टेबल केला. हे बॉण्ड्स आधी ‘अंडर क्रेडिट वॉच’ या हेडिंग खाली होते. या शेअरचा समावेश MSCI मध्ये करण्यात आला.

ICICIने सर्वात जास्त मॉर्टगेज लोन दिली.

बँक ऑफ बरोडा त्यांच्या UTI ट्रस्टमधील स्टेकपैकी ८.५% स्टेक विकणार आहे.

राईट्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की Q २ मध्ये ३३% ग्रोथ झाली. मार्जिन कायम राहिले. काही अनिवार्य अडचणींमुळे आता निर्यात चौथ्या तिमाहीतच होऊ शकते. अंदाजे Rs ६५० कोटींची निर्यात होईल. रेल्वे, हायवेज, खाजगी सेक्टरकडून ऑर्डर मिळत आहेत. FY २१ च्या दुसऱ्या अर्धवर्षात मॉडरेट ग्रोथ राहील.

हिंडाल्कोच्या व्यवस्थापनाने सांगितले की अल्युमिनियमच्या किमती सतत वाढत आहेत. आम्हाला चार क्षेत्रातून मागणी येते. त्यात ऑटो ( दुसऱ्या तिमाहीत स्ट्रॉंग ग्रोथ) कॅन, बिल्डिंग सेक्टर आणि एरोस्पेस यांचा समावेश आहे. यापैकी बिल्डिंग आणि एरोस्पेस यामधील मागणी मात्र अजून WEAK आहे. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत बिझिनेस स्ट्रॉंग राहील.

सरकारचा आता डिजिटल मीडियावर रोख आहे. ब्रॉडकास्टींग कायदा करण्यात येणार आहे.OTT प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार नियम बनवत आहे.

ITC ने चॉकलेट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊल ठेवायचे ठरवले आहे. त्यांनी चॉकलेटचे चॉकलेट, चॉकलेट कूकीज, वेफर्स, आणि स्प्रेड, स्मूथर चॉकलेट, क्रंची असे प्रकार लाँच केले. जगातील सर्वात महाग चॉकलेट ‘FEBELLE’ या ब्रॅण्डखाली लाँच केले.’TRINITY TRUFFLES EXTRAORDINAIR’E या चॉकलेटची किंमत Rs ४.३० लाख प्रती किलो आहे.या सगळ्यामुळे आज ITC च्या शेअरमध्ये तेजी होती.

शक्ती शुगर, गोदरेज इंडस्ट्रीज, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया ( Rs ७.५० प्रती शेअर लाभांश), रेमंड, ITI, गार्डन रिच शिपबिल्डर्स, भारत फोर्ज, DCM, RVNL यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

नवभारत व्हेंचर्स, CAMS, अबॉट लॅबोरेटरीज, मिश्र धातू निगम, नाल्को, बाटा यांचे निकाल चांगले होते.

आज मी तुम्हाला IGL चा चार्ट देत आहे.ही गॅस डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील कंपनी आहे. या शेअरमध्ये कॉल ऑप्शन खरेदी केले जात आहे. २०० DMA च्या वर ट्रेड होत आहे. सप्टेंबरच्या हायच्यावर ट्रेड होत आहे. आज स्टॉक डे हायवर होता. ब्रेकआऊट होण्याची शक्यता दिसत आहे. Rs ४६० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज ‘FADA’ ने सांगितले की ऑक्टोबर महिन्यात पॅसेंजर वाहनांची विक्री ९.७% वाढून १.८२लाख युनिट झाली तर मोटारसायकल्सची विक्री २३.८% ने वाढून १३.८ लाख युनिट झाली. याचा परिणाम आयशर मोटर्स आणि हिरो मोटो या कंपन्यांवर झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३५९३ NSE निर्देशांक निफ्टी १२७४९ बँक निफ्टी २८८४५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०२०

  1. PRASHANT GHOGARE

    अगदी सोप्या आणि सरळ भाषेतील तुमचे मार्केट चे विश्लेषण खूपच छान आहे मैडम. मी तुमचे future option आणि मी हे पुस्तक वाचत आहे. त्यातील माहिती बघून मी खूपच समाधानी आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. Madam तुमच्याशी सविस्तार संवाद साधण्यासाठी कुठले माध्यम आहे का. पुस्तक वाचताना काही कॉन्सेप्ट्स कळत नाही त्याविषयी समजण्यासाठी.
    धन्यवाद.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.