आजचं मार्केट – १२ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १२ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४३.६३ प्रती बॅरल ते US $ ४४.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७४.४० ते US $१ = Rs ७४.७३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.८८ VIX २१.१५ तर PCR १.५३ होते.

फायझर आणि स्पुटनिक यांच्या पाठोपाठ मॉडर्नाही त्यांच्या व्हॅक्सिन विषयी माहिती देईल अशी शक्यता आहे.
USA मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांची कोरोनाबरोबरची लढाई ही पहिली प्राथमिकता झाली आहे. त्यांनी USA मधील लोकांना सर्व म्हणजेच मास्क, सोशल डिस्टंसिंग इत्यादी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या गुणवतेबद्दल काही नियम लावले आहेत. या इक्विपमेंटची स्वस्त भावात आयात होते पण गुणवत्ता चांगली नसते.

अशोक बिल्डकॉन मधील ‘MACQUAIRE’ चा स्टेक विकत घेण्यासाठी ३ ते ४ खरेदीदारांनी स्वारस्य दाखवले आहे. यासाठी डिसेंबर २०२० अखेर बोली येण्याची शक्यता आहे.

पेट्रोनेट LNG श्री लंकेमध्ये US $ ३० कोटीचे LNG प्रॉजेक्ट सुरु करण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान कॉपरने सरकारला विनंती केले आहे की त्यांची फायनान्शियल पोझिशन बघता सरकारने Rs १००० कोटीं इमर्जन्सी फंड्स द्यावेत किंवा NMDC किंवा कोल इंडियाबरोबर कंपनीचे मर्जर करावे.

बिर्ला सॉफ्टवेअर ने ‘नमस्ते क्रेडिट’ बरोबर डिजिटल सर्व्हिसेस पुरवण्यासाठी करार केला..

रबर केमिकल PX१३ वर सरकारने ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावली.

एव्हिएशन क्षेत्रात आता ७०% ऑपरेशनल क्षमतेने काम होईल . याचा स्पाईस जेट, इंडिगो यांना होईल.
EIL ( इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड) कंपनी ६.९९ कोटी शेअर्स Rs ८४ प्रती शेअर या भावाने बाय बॅक करण्यासाठी Rs ५८७ कोटी खर्च करेल.

भारताने मलेशियातून आयात होणाऱ्या क्लिअर फ्लोट ग्लासवर US $ ३२६ प्रती मेट्रिक टन पर्यंत १ नोव्हेंबर २०२० पासून ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी बसवली. थायलंडमध्ये उत्पादन झालेल्या किंवा थायलंड मधून आयात होणाऱ्या ऍक्रिलिक फायबरवरील अँटी डम्पिंग ड्युटी रद्द केली.

ITC मेक इन इंडिया योजनेखाली निकोटीनआणि निकोटीन bitartrate dihydrate मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हैसूरमध्ये सुरु करणार आहेत.त्याच्यासाठी Rs २६५ कोटी खर्च करणार आहेत आणि २०५ लोकांना रोजगार मिळेल. यामुळे परकीयचलनाची बचत होईल कारण आता निकोटीन bitartrate dihydrate आयात करावे लागते.

मनाली पेट्रो, FIEM, SH केळकर आणि कंपनी, जेम्स वॉरेन टी, वेस्टलाईफ डेव्हलपमेंट, पेट्रोनेट LNG(Rs ८ अंतरिम लाभांश रेकॉर्ड डेट २४ नोव्हेंबर २०२०) , श्री सिमेंट, IGL ,पॉवर ग्रीड, सियाराम, डॉलर इंडस्ट्रीज, रूपा & CO, लव्हेबल लिंगरीज, पेज इंडस्ट्रीज, बॉम्बे डाईंग, लक्स, ऍडव्हान्स एंझाइम, JBM ऑटो, मेट्रोपोलीस हेल्थकेअर, औरोबिंदो फार्मा, अशोक बिल्डकॉन,ज्युबिलण्ट फूड्स, अमृतांजन, GIC हाऊसिंग, TVS श्रीचक्र, गुजरात फ्लुओरो, नाटको फार्मा यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये मंदी आली कारण CLIX कॅपिटल्सच्या CEO ने सांगितले की मर्जर/टेकओव्हरच्या वाटाघाटी अमर्यादित कालपर्यंत चालू राहू शकत नाहीत.

आज ऑक्टोबर महिन्यासाठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ७.६१% ( सप्टेंबरसाठी ७.२७%) होते. सप्टेंबर २०२० साठी IIP ०.२% होता. सहा महिन्यानंतर IIP पॉझिटिव्ह झाला.

आज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Rs २.६५ लाख कोटींचे रिलीफ पॅकेज जाहीर केले. याआधी जाहीर झालेली पॅकेजेस पकडून एकूण आतापर्यंत २९.९ लाख कोटीची पॅकेजिस जाहीर केली. ही रक्कम GDP च्या १५% एवढी आहे.

प्रस्तावना करताना त्यांनी सांगितले की अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक प्रगतीचे संकेत मिळत आहेत. उदा ऑक्टोबर २०२० मध्ये GST वसुली १०% वाढली, फॉरीन एक्स्चेंज रिझर्व्हज US $ ५.६० बिलियनवर पोहोचले.

मूडीजने FY २१ मधील डिग्रोथचे अनुमान ९.६% वरून ८.९ %केले. तसेच पुढील वर्षात प्रगतीचे अनुमान ८.१% वरून ८.६% केले. बँक क्रेडिट, विजेचा खप, FDI गुंतवणूक यात वाढ दिसली.

तसेच सरकारचे रेशन कार्ड्सची पोर्टेबिलिटी, स्ट्रीट वेंडर्सना Rs १०,००० चे कर्ज, तसेच किसान क्रेडिट कार्ड देणे, मत्स्यसंपदा योजना, इमर्जन्सी क्रेडिट लिक्विडीटी गॅरंटी स्कीम या योजनांना चांगले यश मिळत आहे. ही स्ट्रॉंग ग्रोथ सस्टेनेबल असून त्याला सरकारच्या सिस्टिमिक रिफॉर्म्सची जोड मिळत आहे. त्यामुळे FY २१ च्या तिसऱ्या तिमाहीत लक्षणीय ग्रोथ दिसण्याची शक्यता आहे.

(१) जर EPFO मध्ये रजिस्टर असलेल्या उद्योजकाने ज १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान नवीन कर्मचारी ( जो EPFO चा मेम्बर नाही किंवा ज्याची नोकरी गेली) नेमला असेल आणि त्याचा पगार Rs १५००० पेक्षा कमी असेल असा कर्मचारी या योजनेखाली पात्र होईल. ५० कर्मचारी असलेला उद्योगातील एक आणि १००० किंवा कमी कर्मचारी असलेल्या उद्योगातील ५ नवीन कर्मचारी या योजनेखाली पात्र होतील.
या कर्मचाऱयांचे PF काँट्रीब्युशन २४% ( १२% +१२%) दोन वर्षांकरता सरकार भरेल. जर उद्योगात १००० पेक्षा कर्मचारी जास्त असतील तर सरकार कर्मचार्याचे म्हणजे १२% PF काँट्रीब्युशन देईल.
(२) सरकार २६ सेक्टरमधील स्ट्रेस्स्ड उद्योगांना २०% कर्ज कोणत्याही तारणाशिवाय किंवा गॅरंटीशिवाय ५ वर्षांकरता ( यात १ वर्षाचे मोरॅटोरियम असेल) देईल यात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, विशिष्ट इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, मेडिसिन्स ( API) मेडिकल उपकरणे, आणि डायग्नॉस्टिक्स यांचा समावेश असेल. यासाठी Rs १.०० लाख कोटींची तरतूद केली.
(३) PM आवास योजना अर्बन खाली Rs १८००० कोटींची तरतूद केली. या योजनेअंतर्गत १२००००० नवी घरे बांधली जातील आणि १८.०० लाख घरे पूर्ण केली जातील. यामुळे सिमेंट, स्टील आणी इतर बिल्डिंग मटेरियल्सचा खप वाढेल आणि ७० लाख जणांना रोजगार मिळेल.
(४) अर्नेस्ट डिपॉझिट साठी बँक गॅरंटी किंवा कॅशची अट सोपी केली. आता बिल्डर डेव्हलपरला बीड सिक्युरिटी डिक्लरेशन करावे लागेल.
तसेच सर्कल रेट आणि अग्रीमेंट रेट मधील डिफरन्सची मर्यादा १०% वरून २०% पहिल्या घर खरेदीसाठी जून २०२१ पर्यंत केली.
(५) NIIF मध्ये Rs ६००० कोटी सरकार भांडवल डिपॉझिट करेल.
(६) खत उत्पादनासाठी Rs ६५००० कोटए सबसिडीची तरतूद मंजूर केली. त्यामुळे आज सर्व खत उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
(७) मनरेगा आणि ग्रामसडक योजना यासाठी जादा Rs १०००० कोटींची तरतूद केली.
(८) सरकारने एक्सिम बँकेला लाईन ऑफ क्रेडिट संबंधात निर्यात करण्यासाठी कर्ज देण्यासाठी Rs ३००० कोटी दिले.
(९) संरक्षण सामुग्री उत्पादन करण्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइड करण्यासाठी जादा Rs १०२०० कोटींची तरतूद केलेली.
(१०) कोरोनासंबंधीत लस शोधून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनासाठी DEPT ऑफ बायोटेक्नॉलॉजीला Rs ९०० कोटींची तरतूद केली.

आज मी आपल्याला निफ्टी ५० चा चार्ट देत आहे हा डेली चार्ट आहे. ह्यामध्ये आज हँगिंग मॅन पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न शिखराला तयार होतो. ट्रेंड रिव्हर्स होईल असे दाखवतो. पण या पॅटर्ननंतर तयार होणारी कँडल गॅपडाऊन आणि मंदीची असल्यास या ठिकाणी पॅटर्न कन्फर्मेशन मिळते . हँगिंग मॅनच्या हाय पाईंटचा स्टॉपलॉस ठेवून आणि मंदीचा ट्रेंड घेता येतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३३५७ NSE निर्देशांक निफ्टी १२६९० बँक निफ्टी २८२७८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १२ नोव्हेंबर २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.