आजचं मार्केट – १३ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १३ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४२.९० प्रती बॅरल ते US $ ४३.०९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.५३ ते US $१= ७४.६८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.८९ VIX १९.९३ होते, PCR १.५९ होते.

आपल्या सर्वाना माझ्याकडून दिवाळीच्या आणि नवीन संवत्सरासाठी शुभेच्छा. हे नवीन संवत्सर आपल्याला यशाचे संपत्ती, संतती, आणि आरोग्यदायी. इच्छापूर्तीचे जावो ही माझी शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.

युरोप आणि USA मधील दुसऱ्या कोरोना लाटेच्या भीतीने आता भारतातही प्रवेश केला आहे. आपला अत्यंत आवडता दिवाळीचा सण आपण कोरोनासंबंधीत सर्व नियम पाळून आनंदाने साजरा करू या.

१४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५-३० ते संध्याकाळी ६-३० या दरम्यान मुहूर्त ट्रेडींग असेल. BSE आणि NSE मध्ये चांगली सजावट केली जाते. आणि मुहूर्ताचे ट्रेडिंग साजरे केले जाते.

शॉपर्स स्टॉप या कंपनीने आज ७० शेअर्सला १७ राईट्स Rs १४० प्रती राईट्स या भावाने राईट्स इशू जाहीर केला. हा राईट्स इशू २७ नोव्हेम्बर २०२०ला ओपन होईल आणि ११ डिसेम्बर २०२० ला बंद होईल.

RBL बँक प्रेफरन्शियल ऍलॉटमेंट दवारा Rs १५६६ कोटी उभारेल.

एशियन ग्रॅनाईट या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमच्या वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट मध्ये सुधारणा झाली. आम्ही मार्केटिंगवरील खर्च १३% कमी केला. ही अर्धशहरी ग्रामीण भागात मार्केट लीडर आहे. त्यांनी सांगितले की आम्ही आता ९०% क्षमतेवर काम करत आहोत. आमची ६५०० च्या वर डिस्ट्रिब्युशन सेंटर आहेत. आमची निर्यात १०० पेक्षा जास्त देशात होते. आमचा ऑर्गनाईझ्ड मार्केटमध्ये टाइल्ससाठी १२% तर QUARTZ साठी ३६% मार्केट शेअर आहे. आमचे पॉवर एक्सपेंडिचर १४% ने तर फ्युएल एक्सपेंडिचर २४% ने कमी झाले. आमची निर्यात या वर्षात दुप्पट होईल.

विप्रो आपल्या बिझिनेसचे रिऑर्गनायझेशन करणार आहे. आता त्यांचा बिझिनेस सात स्ट्रॅटेजिक बिझिनेस युनिट्स आणि सर्व्हिस लाईन्स आणि नऊ भौगोलिक क्षेत्रात विभागलेला आहे. आता त्याचे चार स्ट्रॅटेजिक मार्केट युनिट्स आणि २ ग्लोबल बिझिनेस लाईन्स मध्ये रिऑर्गनायझेशन केले जाईल. हि चार स्ट्रॅटेजिक मार्केटिंग युनिट्स खालीलप्रमाणे असतील. – अमेरिका १, अमेरिका २, युरोप आणि APMEA. यातील पहिले दोन सेक्टरवाईज आणि युरोप आणि APMEA ( आशिया पॅसिफिक मिडल ईस्ट आफ्रिका)ची रचना नेशनवाईज केली आहे. अमेरिका १ मध्ये हेल्थकेअर& मेडिकल डिव्हाइसेस, कन्झ्युमर गुड्स, अँड लाईफ सायन्सेस, रिटेल आणि इतर तर अमेरिका २ मध्ये सिटी बँक, बँकिंग, सिक्युरिटीज, IB आणि इन्शुअरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, कॅनडा आणि इतर यांचा समावेश असेल. युरोपचे सहा देशात विभाजन केले आहे. UK अँड आयर्लंड , स्वित्झर्लंड, जर्मनी, बेनेलक्स इत्यादी . APMEA यामध्ये ANZ, इंडिया, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया इत्यादी देश आहेत. iDEAS आणि iCORE या दोन ग्लोबल बिझिनेस लाईन्स असतील. या दोन ग्लोबल बिझिनेस लाईन्समध्ये विप्रोच्या सर्व बिझिनेसेसचा समावेश केला आहे. या रिऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ग्रोथवर फोकस, विशिष्ट मार्केट आणि स्ट्रक्चर्सवर आणि SCALE वर फोकस, प्रॉडक्टसमध्ये सुधारणा आणि स्ट्रॅटेजिक टॅलेन्टसचा पूल तयार करणे ही आहेत. मुख्य उद्देश ऑर्गनायझेशनमध्ये सिम्पलीफिकेशन आणणे हा आहे.

किटेक्स गारमेंट्स, मुर्डेश्वर सिरॅमिक्स, पुर्वांकारा ( कंपनी फायद्यातून तोट्यात),फ्युचर रिटेल, ३M, ग्राफाइट इंडस्ट्रीज, BEML, सदभाव इंजिनीअरिंग या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

ऍपेक्स फ्रोझन फूड्स, FACT, मोल्ड टेक, टाईड वॉटर ऑइल, HAL, MRF, इंडोको रेमिडीज, या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSNL आणि MTNL यांच्यात करार होईल. त्यातून MTNL चे कर्ज फिटेल.

L & T ला ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल बांधण्याचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

गोद्रेजने अमेझॉनला मुंबईत २.६ लाख SQ फीट जागा दिली.

आज मी आपल्याला सिमेन्सचा चार्ट देत आहे. सिमेन्सच्या कालच्या LOW ने सर्व DMA तोडले. त्यामुळे ट्रेंड रिव्हर्स झाला आहे. हा शेअर ओव्हरबॉट असल्याने मंदी येईल. गॅप डाऊन ओपन झाला. ट्रेडिंग करताना स्विंग पकडावा. कॉलमध्ये विक्री आणि पुटमध्ये खरेदी होत आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३४४३ NSE निर्देशांक निफ्टी १२७१९ बँक निफ्टी २८४६५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १३ नोव्हेंबर २०२०

 1. Parikshit Mayekar

  Namaskar Aaji
  Khup sundar mahiti tumhi amchya paryant pochvat ahat. Aplya prayatnanna Ani jiddi la majha salaam!!! Ashich stock market chi navnavin mahiti gheun amchya paryant pochat raha. Tumhala manapasun shubheccha!!

  Reply
 2. SANJEEV KHATRI

  ताई, नम्स्ते, BBC ने तुमची दखल घेतली यातच तुमचे यश किती मोठे आहे, याची जाणीव होते. अतिशय सोप्या आणि मायबोली भाषेत क्लिष्ट आणि किचकट विषय शेअर मार्केट तुम्ही समजाऊन् सांगत आहात. तुमच्या मुळे अनेक गृहिणी प्रोत्साहित होतील, असे वाटते. खुप खुप शुभेच्छा !

  Reply
 3. Mrunal more

  Hello… aaji khup sunder…khupach asha vadhavnari ashe tumchi lifestyle..khup chan mahiti ani agadi barik abhyas kasa karaycha te khup sopya bhashet sangitlet.mala tumchyashi online class madhun shikaychi khup itcha aahe , agadi weekly 2 times asali tari chalel.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.