आजचं मार्केट – १४ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १४ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४२.९२ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७४.६०, US $निर्देशांक ९२.७२ VIX १९.७० PCR १.५३ होते.

आज संवत २०७७ चे आनंदाने स्वागत करू या. आज मार्केट विक्रम संवत २०७७ विषयी जबरदस्त आशावादी दिसले. मुहूर्त ट्रेडींगला चांगली खरेदी झाली. असे वाटले की मार्केटने कोरोनाची भीती मागे टाकली.

ONGC आणि टाटा स्टीलचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. टाटा स्टील लॉस मधून प्रॉफीटमध्ये आली. उत्पनातही वाढ झाली. मार्जिन १६.५ % राहिले. ONGC चा फायदा वाढला, उत्पन्नही वाढले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेवर करोनाचा फारसा परिणाम झाला नाही.पीकही चांगले झाले. पाऊस व्यवस्थित आणि पुरेसा पडल्यामुळे धान्याचे उत्पादन विक्रमी स्तरावर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे ऍग्रीकल्चर क्षेत्राशी संबंधित म्हणजे ऍग्रीइक्विपमेंट, ट्रॅक्टर्स, खते, पशुखाद्य, बीबियाणे, जंतुनाशके उत्पादन करणाऱ्या कंपन्या तेजीत होत्या.उदा. रोटो पंप्स शक्ती पंप्स, VST ट्रॅक्टर्स अँड टिलर्स, RCF, NFL,रॅलीज, महिंद्रा EPC इत्यादी

आज संरक्षणसामुग्रीचे उत्पादन करणारे शेअर्स तेजीत होते. त्यात वालचंदनगर इंडस्ट्रीज, भारत डायनामिक्स,माझगाव डॉक्स, HAL, या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक ४३६३७ NSE निर्देशांक निफ्टी १२७८०, बँक निफ्टी २८५९४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

8 thoughts on “आजचं मार्केट – १४ नोव्हेंबर २०२०

 1. Dewashish Kinhekar

  Namaskar. Aapnas Kay mhanave aaji ki madam kalat nahi pan aaji ha premal ani mayalu vatto mhanun aaji . BBC marathi cha coverage baddal khup abhinandan. Mi roz tumcha video pahto and subscriber pan ahe. Tumcha roz cha abhayas ani dedication pahun khup kautuk vatte. Hardwork la age naste he tumi dakhaun dile. Video madhe tumcha abhayas disun yeto ani tumi mala mazya aaji chi athvan karun deta tumcha premal margdarshan mule. Ajun khup lihavese vatte pan aso.
  Tumala sashtang namaskar and Happy diwali.
  Tumcha reply chi vat pahin.

  Reply
 2. BABAN KOKARE

  आजी दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा!!!!
  शेअर मार्केट news पाहण्यासाठी मराठी आणि हिंदी चॅनल कोणते?

  Reply
 3. बाळकृष्ण हणमंत उदुगडे

  मला आपली पुस्तके हवी आहेत.मी ठाण्यात राहत आहे.तर ती कशी मिळतील.ते कळवावे ही विनंती

  Reply
 4. रामदास लक्ष्मण भवर

  दिपावलीच्या आपणास आणि आपल्या परीवारास निरामय आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बी.बी.सी.ने आपल्या जीवनात शाबासकी देऊन आपलं कौतुक केले आहे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.