आजचं मार्केट – १७ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US ४३.९५ प्रती बॅरल ते US $ ४४.२१ प्रती बॅरल या दरम्यान होते, रुपया US $१= Rs ७४.३९ ते US $१= Rs ७४.६० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.५३ VIX २०.१३ PCR १.६८ होते.

मॉर्गन स्टॅन्लेने BSE निर्देशांक सेन्सेक्ससाठी डिसेंबर २०२१ साठी ५०००० चे टार्गेट दिले आहे.

आज व्हॅक्सिन च्य बातमीने मार्केट वाढले. फायझरने सांगितले की ९०% सक्सेस रेट आहे, अस्त्राझेनेकाने ९२% सक्सेस रेट तर आज मॉडर्नासाठी हा रेट ९४.५% आहे. पण फायझरच्या व्हॅक्सिनसाठी -७०% तापमानात स्थिर पण मॉडर्नाच्या व्हॅक्सिनसाठी फक्त -२०% एवढ्या तपमानात स्थिर राहील असे कळते. या बातमीने लोकांच्या मनातील भीती म्हणा अनिश्चितता कमी झाली आणि त्यामुळे शेअरमार्केटमध्ये तेजी आली.

USA मध्ये रिलीफ पॅकेज येईल या अपेक्षेने, तसेच USA आणि युरोपमध्ये येणाऱ्या कोरोनाच्या सेकंड वेव्हमुळे तसेच भारतात आता लग्नसराई सुरु होत असल्यामुळे सोन्यात तेजी आली. दिवाळीत अपेक्षेपेक्षा जास्त सोन्याची खरेदी झाली. पण व्हॅक्सिनच्या बातमीमुळे सोने, चांदी यात थोडा मंदीचा प्रवेशही झाला. याचाच परिणाम म्हणजे आता व्हॅक्सिन आल्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग येईल, क्रूडसाठी मागणी वाढेल त्यामुळे क्रूड US $ ४४ च्या आसपास होते.

जपानमध्ये चांगली म्हणजे ५% ग्रोथ दिसली. चीनचे इंडस्ट्रियल ग्रोथ आणि रिटेलसेल्सचे आकडे चांगले आले.
फ्युचर ग्रुपमध्ये अमेझॉनची Rs १४३१ कोटी एवढी गुंतवणूक आहे. फ्युचर ग्रुपचे Rs ३००० कोटींचे ऍसेट्स आहेत आणि त्यांना Rs १८००० कोटींचे कर्ज आहे. फ्युचर ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱयांची संख्या ५०००० च्या जवळपास असेल. काही अडचणी आल्यामुळे फ्युचर ग्रुपने रिलायन्स रिटेल बरोबर स्ट्रॅटेजिक करार केला होता. सिंगापूर आर्बिट्रेशन ऑथॉरिटीने (त्यांच्याकडे अमेझॉनने अर्ज केल्यामुळे) या करारावर स्टे दिला होता. या स्टे विरुद्ध फ्युचर ग्रुपने कोर्टात अर्ज केला आहे. अमेझॉनने फ्युचर ग्रुपला अडचणीतून बाहेर येण्यासाठी मदत केली नाही तसेच इतर गुंतवणूकदारांना आणले नाही.

बाटाच्या व्यवस्थापनाने सांगितले की टायर २ ते टायर ५ शहरामध्ये आणि माल्स मध्ये आमची विक्रि चांगली होत आहे. पण शहरीभागांत मात्र अजून पाहिजे त्या वेगाने मागणी वाढताना दिसत नाही.आम्ही दरवर्षी ५० ते ६० नवीन शॉप उघडतो. पण अजून वातावरणात असलेल्या अनिश्चिततेमुळे आणी शॉप्स उघडी ठेवायच्या वेळेवर बंधन असल्यामुळे आम्ही थोडी वाट पाहूनच नवीन शॉप्स उघडू. दरम्यान आम्ही फ्रॅंचाईझी स्टोर्स उघडत आहोत.लॉक डाऊनच्या काळातील भाडे आम्हाला बहुतेक मालकांनी पूर्णपणे अथवा अंशतः माफ केले. काही मालकांबरोबर आम्ही रेव्हेन्यू शेअरिंग बेस्ड रेंट साठी करार केला. आज बाटाच्या शेअरमध्ये चांगली खरेदी झाली.

बाटा पाठोपाठ लिबर्टी शूज, खादिम, रिलॅक्सो ह्या शेअर्समध्येही खरेदी झाली.

ONGC ने सांगितले की HPCL आणि MRPL यांच्या मर्जरमध्ये कोणत्याही कायदाविषयक अडचणी नाहीत. तसेच HPCL च्या डीलीस्टिंगचा नजीकच्या भविष्यात तरी विचार नाही.

MMTC चा NINL ( नीलांचल इस्पात निगम लिमिटेड) बराच स्टेक आहे. आज टाटा स्टीलने सांगितले की NINL ची विक्री करायला काढली तर आम्हीही खरेदी करण्याचा विचार करू. या टाटा स्टीलच्या विधानानंतर MMTC चा शेअर वाढला.

टाटा स्टीलने त्यांच्या यूरोपमधील बिझिनेसचे UK आणि नेदर्लंड्स चे बिझिनेस वेगळे करून नेदर्लंड्स बिझिनेस ‘SSAB’ या कंपनीला विकण्यासाठी बोलणी चालू केली आहेत.स्टीलच्या किमती वाढत आहेत. टाटा स्टीलने कर्ज कमी करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे आज टाटा स्टीलच्या शेअरमध्येही तेजी होती.

व्हॅक्सिन च्या बातमीमुळे लॉजिस्टिक कंपन्यांच्या विशेषतः कोल्ड स्टोरेज वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

एम्बसी ऑफिस पार्क या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने एम्बसी टेकव्हिलेज Rs ९८०० कोटींना खरेदी करायला तसेच कर्जाच्या मार्गाने Rs ३६४० कोटी उभे करायला मंजुरी दिली.

उद्योगाला शांतता, निश्चितता हवी असते. अशा वातावरणात उद्योग भरभराटीला . अर्थात उद्योगाची प्रगती होण्यासाठी त्यांना कर्ज देणार्या बँका, NBFC यांचीही प्रगती होते. म्हणून बँक नीफटीमध्ये आज तेजी होती.

तसेच भारताची लोकसंख्या लक्षात घेता आयुर्विम्याला आणि जनरल इंशुअरंसला चांगला वाव आहे. आणि कोरोनामुळे जास्तीतजास्त लोक आता आयुर्विमा आणि जनरल विमा पॉलिसी खरेदी करत आहेत. त्यामुळे आज HDFC लाईफ, SBI लाईफ, ICICI प्रु या शेअर्समध्ये तेजी होती.

सरकार लवकरच पॉवर क्षेत्राला काही रिलीफ पॅकेज देईल अशी अपेक्षा असल्यामुळे इलेक्ट्रिक इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बनवणार्या कंपन्यांमध्ये तेजी होती. विषेशतः ट्रान्सफॉर्मर बनवणाऱ्या कंपन्या तसेच इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तेजी आली स्नायडर इलेक्ट्रिक,BPL. HPL इलेट्रीक. इंडोटेक ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेम्प ट्रान्सफॉर्मर या शेअर्समध्ये तेजी होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजने अर्बन लॅडर होम डेकॉर मध्ये ९६% स्टेक घेतला.

NMDC ने आपल्या लम्प आणि फाईन या आयर्न ओअरच्या किमती अनुक्रमे Rs ४०० आणि Rs ३०० नी वाढवल्या. मागणी आणि पुरवठा यातील गॅपमुळे किमती वाढवल्या असे NMDC ने सांगितले.

M & M त्यांच्या तेलंगाणा युनिटमध्ये K -२ सीरिजच्या ट्रॅक्टरचे उत्पादन सुरु करणार आहे.
फायझरने ऑरोबिंदो फार्मा आणि DR रेड्डीज विरुद्ध USA मध्ये ‘IBRANCA ‘या औषधासंबंधीत पेटंटच्या नियमांकडे दुर्लक्ष केले यासाठी खटला भरला.

PVR ने त्यांचे PVR साहू लखनौ आणि PVR उत्सव UP आणि हरयाणामध्ये रिलाँन्च केले. इंडियन हॉटेल्सच्या गोवा आणि राजस्थान साठी चांगले बुकिंग होत आहे.

व्हॅक्सिन हँडलिंगचे काम DR रेड्डीजकडे येण्याची शक्यता आहे. हे व्हॅक्सिन ठराविक तपमानाला स्टोअर करावे लागत असल्यामुळे वोल्टास, ब्लू स्टार, हॅवेल्स या कंपन्या चालतील.

भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. थंडीत कोरोनाचा प्रभाव वाढेल अशी भीती आहे. त्यामुळे गरम आणि उबदार कपड्यांची मागणी वाढेल.

टेलिकॉम कंपन्या आपले दर वाढवण्याची शक्यता आहे. उदा भारती एअरटेल, VI, रिलायन्स जिओ
टाटा मोटर्सची बुकिंग चांगली झाली. याचा फायदा टाटा मोटर्स, टाटा मोटर्स DVR. टाटा एलेक्सी यांना होईल.
सध्या होम डेकोरचे शेअर्स चालत आहेत. त्यातल्यात्यात टाइल्सच्या शेअर्समध्ये जास्त तेजी होती .गॅसच्या किमती कमी झाल्या चीनमधून होणारी आयात कमी झाली. आयात केलेला माल सोडवण्यासाठी उशीर होत आहे. उदा मुर्डेश्वर सिरॅमिक्स सेरा सॅनिटरी, नीटको टाईल्स, कजरिया सिरॅमिक्स.

१५ नोव्हेंबर २०२० ला BPCL च्या विनिवेशासाठी बोली सादर करण्याची मुदत संपली. रिलायन्स, टोटल, ब्रिटिश पेट्रोलियम आणि सौदी आरामको या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या विनिवेशासाठी बोली सादर केल्या नाहीत. त्यामुळे पुरेशा बोली येऊनही BPCL चा शेअर पडला.

आज मी तुम्हाला जिंदाल स्टेनलेस स्टील चा चार्ट देत आहे. मेटल्समध्ये तेजी आली आहे. चीनचे इंडस्ट्रियल प्रोडक्शनचे आकडे चांगले आले आहेत.त्यामुळे ही तेजी टिकून राहील असे वाटते. जिंदाल स्टेनलेसमध्ये ब्रेकआऊट दिसत आहे . Rs ६५ ची लेव्हल ओलांडली तर Rs ८० पर्यंत जाऊ शकतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३९५२ NSE निर्देशांक १२८७४ बँक निफ्टी २९१८१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १७ नोव्हेंबर २०२०

  1. Sushma Sanjay Jagtap

    Send your number. Interested in investment as well as learning lessons of stock market. Inspired by you.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.