आजचं मार्केट – १८ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४३.६९ प्रती बॅरल ते US $ ४४.०८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.१६ ते US $१=Rs ७४.४१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.३२ VIX १९.२६ PCR १.५३ होते.

आज US $ निर्देशांक एक आठवड्याच्या किमान स्तरावर होते. व्हॅक्सिनच्या बातमीमुळे सोने आणि चांदी यांच्यामध्ये थोडी मंदी होती. बिडेन हे US $ ३.४ ट्रिलियनचे रिलीफ पॅकेज देण्यासाठी USA च्या काँग्रेसवर दबाव आणत आहेत. भारतामध्ये आता लग्नसराई सुरु होत असल्याने सोन्याचे भाव तेजीत होते.

आज क्रूडमध्ये तेजी होती. युरोप USA मधील कोरोनाच्या दुसर्या लाटेमधे अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाला वेळ लागत आहे, अडचणी येत आहेत. त्यामुळे क्रूडसाठी मागणी हव्या तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. पण ओपेक+ने उत्पादनातील वाढ पुढे ढकलल्यामुळे क्रुडमध्ये माफक तेजी येत आहे. ONGC च्या पुष्कर ब्लॉकमधून जे क्रूड उत्पादन होते त्याची कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आज मार्केटमध्ये पाईप उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते . उदा :- जिंदाल ड्रिलिंग, श्रीकलाहस्ती पाईप्स, इंडियन ह्यूम पाईप्स, मान इंडस्ट्रीज, जिंदाल SAW, अल्फाजिओ इंडिया सेलन एक्स्प्लोरेशन, तसेच कॅपिटल गुड्स, चहा कॉफी, च्या शेअर्स मध्ये तेजी होती. कारण चहा कॉफीचे उत्पादन कमी झाले आहे.

बासमती तांदुळाच्या निर्यातीत २८% ने वाढ होऊन २४ लाख टन झाली, इतर प्रकारच्या तांदुळाची निर्यात १०२% वाढून ५१ लाख टन झाली तर गव्हाची निर्यात १९२% वाढून ३.५४ लाख टन झाली.

TTKप्रेस्टिजच्या खरडी प्लांटमध्ये कामगारांनी संप केल्यामुळे कंपनीने लॉकआऊट जाहीर केला. कंपनीने सांगितले की त्यांच्याजवळ यासाठी पर्यायी व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांच्या बिझिनेस वर परिणाम होणार नाही.

सद्यभाव इंजिनीरिंगला NHAI कडून २ रोड प्रोजेक्टसाठी Rs १५७० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

ITC ने गोल्ड फ्लेक सिगारेटचे दोन नवीन ब्रँड गोल्ड फ्लेक लक्झरी, आणि गोल्ड फ्लेक इंडिया मिंट या ६९ MMचे लाँच केले.

BPCL साठी वेदांताने प्रिलिमिनरी EOI सादर केली.

आज RBI ने लक्ष्मी विलास बँकेवर १ महिन्यासाठी मोरॅटोरियम लावले. बँकेचे ठेवीदार या मोरॅटोरियमच्या काळात कमाल Rs २५००० काढू शकतील. लक्ष्मी विलास बँकेचे DBS या सिंगापूर स्थित बँकेत मर्जर केले जाईल.लक्ष्मी विलास बँकेचे डीलीस्टिंग होईल. उद्या संध्याकाळी ६ वाजल्यापासून मोरॅटोरियम अमलात येईल. DBS चे व्याजाचे दर कमी आहेत त्यामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या ठेवीदारांना त्या दराने व्याज मिळेल. मनोहरन यांना ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही शक्य तितके ठेवीदार आणि शेअरहोल्डर्सचे हितरक्षण करण्याचा प्रयत्न करू. येस बॅंकेनंतर RBI च्या हस्तक्षेपामुळे सावरलेली लक्ष्मी विलास ही दुसरे खाजगी क्षेत्रातील बँक आहे.

चातुर्मास संपला दिवाळी झाली आता लोकांच्या आहारावरील बंधने कमी झाली. त्यामुळे कोंबडी,मटण अंडी याचे सेवन वाढेल. अंड्यांचा भाव आताच Rs ५ वरून Rs ७ वर गेला, आणि चिकनचे दर Rs १७० वरून Rs २८० वर गेले. त्यामुळे वेंकीज, वॉटरबेस, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, अवंती फीड्स तसेच मत्स्यखाद्य, इतर पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या उदा गोदरेज अग्रोव्हेट यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

DLF हा रिअल्टी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरचा समावेश DOW जोन्स SUSTAINABILITY इंडेक्सचा जो इमर्जिंग मार्केट्स हा विभाग आहे त्यात समावेश झाला. या इंडेक्समध्ये ११ भारतीय कंपन्या आहेत.

तेजस ट्रेनसाठी बुकिंग कमी होत असल्याने IRCTC वर मुंबई ते अहमदाबाद, लखनौ ते दिल्ली या सारख्या तेजस एक्स्प्रेस बंद करण्याची वेळ आली. आज IRCTC च्या शेअरमध्ये मंदी होती.

L & T ला टाटा स्टील या कंपनीकडून कोमात्सू मायनिंग इक्विपमेंटच्या ४६ युनिटसाठी ऑर्डर मिळाली.

स्पाईस जेटचे टार्गेट HSBC ने Rs २६ वरून Rs ८० केले. रेड्युसवरून रेटिंग बाय केले. कंपनीचा कार्गोट्राफिक चा बिझिनेस चांगला चालू आहे. एअर एशिया भारतातून बाहेर पडत आहे. कंपनी आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. त्यानुसार बांगला देश, UK येथे कंपनीने उड्डाणे जाहीर केली आहेत. 

HSIL मध्ये प्रमोटर्स स्टेक वाढवत आहेत. टॉपलाईन आणि मार्केट कॅपिटलायझेशन यामध्ये खूप फरक आहे.
सिप्लाने कोरोना स्पीड टेस्ट किट COVID – G साठी करार केला ही टेस्ट किट लाँच केले बेल्जीयमबरोबर लायसेन्सिंग करार केला.

इमामीने होम हायजिन प्रोडक्ट EMASOL लाँच केले.

मोल्ड टेक पॅकेजिंग ही कंपनी Rs १८० प्रती राईट्स या भावाने ५.५५ लाख राईट्स इशू करणार आहे.
सुप्रीम कोर्टाने व्याजावरील व्याजाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली.

टाटा आणि मिस्त्री यांच्यातील केसची सुनावणी आता २ डिसेम्बरला होईल.

आज मी तुम्हाला मिंडा कॉर्पोरेशन या ऑटो अँसिलिअरी क्षेत्रातील कंपनीचा चार्ट देत आहे. या मध्ये करेक्शन आणि

कन्सॉलिडेशन पूर्ण झालेले दिसत आहे. स्टॉक आता ब्रेकआऊट होण्याच्या मार्गावर आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४४१८० NSE निर्देशांक निफ्टी १२९३८ बँक निफ्टी २९७४९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १८ नोव्हेंबर २०२०

 1. सुनिल जाधव

  खुप छान माहिती देतात आज्जी.. अनेक धन्यवाद… पण blog वरील जी माहिती आहे ती उद्याच्या बाबतीतली असावी. किंवा त्यादिवशी सकाळी 9 च्या आत असावी. मार्केट पुर्ण झाल्यावर त्याचा फारसा उपयोग होत नाही .

  Reply
  1. संतोष सुतार

   होय उद्याचे मार्केट कसे असेल याबद्दल सूचक अंदाज सांगितला तर बरे होईल.

   Reply
 2. संतोष सुतार

  खुप छान आणि अगदी उपयुक्त माहिती दिली आहे आपण…
  आज पहिल्यांदाच मी आपल्या युट्युब चॅनल ला भेट दिली आणि चॅनल सबस्क्राइब ही केले.
  आता रोज आवर्जून आपल्या व्हिडिओ आणि ब्लाॅगला भेट देणार.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.